Lion Information in Marathi
सिंहाची माहिती
- सिंह मार्जार कुळातील मोठा प्राणी आहे आणि सिंहाचे अस्तित्व सध्या फक्त आफ्रिका खंडातील सहारा मध्ये आणि भारतात गुजरातच्या गीरच्या जंगलामध्ये आहे.
- सिंहाला प्राण्यांचा राजा समजले जाते आणि काही सिंहांचे वजन २५० किलो पर्यंत भरू शकते.
- सिंहाची सरासरी लांबी २७५ सेमी असते व शेपटी ६० ते ९० सेमी असते.
- सिंह सहसा संध्याकाळच्या वेळेस शिकार करतात व शिकारीला निघण्यापूर्वी गर्जना करतात. सिंहाची गर्जना ८ किलोमीटर पर्यंत ऐकता येऊ शकते.
- सिंह सुमारे ताशी ८१ किलोमीटर वेगाने पळू शकतो परंतु फार काळ पळू शकत नाही.
- सिंह हत्ती, गेंडा, पाणघोडा या व्यतिरिक्त इतर प्राण्यांची शिकार करतात. शक्यतो सिंहीणच सावजाला ठार करते.
- सिंहाला दिवसाला सात किलो आणि सिंहिणीला पाच किलो मांस लागते. सिंह आठवड्यातून एकदाच पोटभर खाऊन राहू शकतात व शिकार न मिळाल्यास मेलेल्या जनावरांना खाऊन भूक भागवतात. सिंह चार पाच दिवस पाणी प्यायल्याशिवाय राहू शकतात.
- सिंहाच्या मादीला सिंहीण म्हणतात व पिल्लाला छावा म्हणतात. सिंहाला चेहऱ्याभोवती मानेजवळ खूप केस असतात ज्याला आयाळ म्हणतात. सिंहिणीला आयाळ नसते.
- सिंहिणीला दोन वर्षाच्या कालावधीनंतर पिल्ले होतात व एकावेळी दोन किंवा तीन पिल्ले होतात. कळपातील एका पेक्षा जास्त सिंहिणी एकाच वेळी पिल्लांना जन्म देतात आणि सर्व पिल्लांना एकत्रच मोठे करतात.
- जन्मतः पिल्लांचे डोळे बंद असतात आणि नऊ दिवसानंतर उघडतात. पिल्लांच्या अंगावर काळे ठिपके असतात जे दहाव्या महिन्यानंतर नाहीसे होतात.
- सिंह कळपाने रहातात ज्यात मादा आणि पिल्ले आणि लहान नर असतात. एका कळपामध्ये १० ते १५ प्राणी असतात.
- पिल्ले जेव्हा मोठी होतात तेव्हा नरांना कळपातून हाकलून दिले जाते पण मादा राहू शकतात. हे नर कळप बनवून एकत्र रहातात व अधिक मोठे झाल्यावर इतर सिंहाच्या कळपाचा ताबा मिळवितात.
- मादा सहसा कळपाने शिकार करतात आणि सिंह कळपाचे रक्षण करतात. शिकार वाटून खाल्ली जाते परंतु सर्वात पहिले सिंह आपला वाटा घेतात, नंतर सिंहिणी आणि सर्वात शेवटी पिल्ले वाटा घेतात.
- सिंह घनदाट जंगलात, वाळवंटात किंवा दलदल असलेल्या परिसरात रहात नाहीत. सपाट गवताळ प्रदेश किंवा विरळ जंगलांचा प्रदेश हे सिंहांचे वास्तव्यस्थान आहे. सिंह उत्तम प्रकारे पोहू शकतात.
- सिंह दिवसाचे वीस तास विश्रांती घेतात.
- सिंहाचे आयुष्य सुमारे १२ ते १६ वर्षे असते परंतु पिंजऱ्यातील सिंह वीस वर्षापर्यंत जगू शकतो.
Information of Lion in Marathi / Few Lines
Related posts
Dog Information in Marathi, माझा आवडता प्राणी कुत्रा
Cow Information in Marathi, गाईची माहिती, निबंध
Tiger Information in Marathi : Wild Animal Tiger Essay
Elephant Information in Marathi, Elephant Essay Nibandh हत्ती माहिती
Rabbit Information in Marathi, Pet Rabbit Essay Nibandh
Horse Information in Marathi : घोडा माहिती
It is very nice
Very helpful information
Good nice great