Kite Information in Marathi
घार पक्षाची माहिती
- घार हा शिकारी पक्षी आहे. जगभरात घारीच्या सुमारे २२ जाती आहेत. भारतात ब्राम्हणी घार आणि परैया घार या दोन प्रकारच्या घारी आढळतात.
- घारीचा रंग तपकिरी असतो. तिची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि आकाशातून जमिनीवरील सावज सहज हेरु शकते.
- बेडूक, मासे, सरडे किंवा छोटी पिल्ले हे घारीचे खाद्य आहे. घार बराच काळ आकाशातून घिरट्या घालण्यात व्यतीत करते. घारीच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे उडत असलेल्या घारीला सहज ओळखता येते.
- बऱ्याच घारी एकाच जागी वास्तव्य करतात परंतु काही घारी स्थलांतर सुद्धा करतात. घारी अंटार्क्टिका वगळता इतर सर्व प्रदेशात आढळतात.
- घारींचे पंख लांब आणि मजबूत असतात पण पाय मात्र कमजोर असतात.
- लाल घार सुमारे २४ ते २८ इंच लांब असते आणि तिच्या पंखांचा विस्तार ७० ते ८९ इंच इतका असतो.
- घारी मोठ्या असल्या तरी आकाराच्या मानाने फार शक्तिशाली नसतात.
- घारी वजनाला हलक्या असतात. वयस्क घारीचे वजन सुमारे ९०० ग्राम असते.
- त्यांचे डोके शरीराच्या मानाने छोटे असते आणि चोच छोटी पण मजबूत असते.
- घारी गवताळ प्रदेशाच्या आजूबाजूला रहातात. त्यांना सपाट जमिनीवरून सावज हेरणे आणि शिकार करणे सोपे जाते.
- घारी उंच झाडावर जमिनीपासून १२ ते २० मीटर उंचीवर, काट्या – कुटक्यांच्या, गवताच्या सह्हायाने घरटे बनवितात आणि अंडी देण्यापूर्वी दोन तीन दिवस आधी लोकरीचा थर लावतात.
- घार मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान एक ते चार अंडी देते. प्रत्येक अंड तीन दिवसांच्या अंतरावर दिले जाते. अंडी पांढरी असून त्यावर लाल तपकिरी ठिपके असतात.
- मादा वर्षातून एकदाच अंडी देते. परंतु काही कारणास्तव अंडी फुटल्यास पुन्हा देते.
- अंडे उबविण्याच्या काळात मादा सहसा घरटे सोडत नाही आणि नर तिला खाद्य पुरवितो.
- सुमारे एक महिन्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले कमजोर असतात आणि मादा त्यांचे रक्षण करते. नरच मादा आणि पिल्ले, सर्वांसाठी खाद्य पुरवितो.
- घारीची पिल्ले आठवड्यातच भावंडासोबत भांडू लागतात. पिल्ले ५० ते ७० दिवसातच उडण्यायोग्य बनतात.
- घारी सात आठ दिवस अन्नावाचून जगू शकतात आणि त्यांचे आयुष्यमान सुमारे १५ ते २० वर्षे आहे.
Information of Kite in Marathi / Ghar Bird Mahiti Wikipedia
Related posts
Pigeon Information in Marathi, Essay on Pigeon, Kabutar Mahiti
Peacock Information in Marathi, Essay Peacock मोर
Parrot Information in Marathi, Popat My Favourite Bird Parrot Essay
Duck Information in Marathi | बदक माहिती
Sparrow Information in Marathi : Bird Sparrow Essay Nibandh
Eagle Information in Marathi : गरुड माहिती
Khup chhan