Skip to content

Kho Kho Information in Marathi, Game Kho Kho Rules l खो-खो खेळाची माहिती

kho kho game information in marathi

Kho Kho Information in Marathi

खो-खो माहिती

KhoKho Game Information History / खेळाची ओळख

  • खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. खो-खो खेळाच्या सुरुवाती बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु हे मात्र नक्की की या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळात काही सुधारणा करून या खेळाची निर्मिती केली गेली असावी असे समजले जाते.
  • विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात या खेळामध्ये नियमबद्धता आणि शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले गेले. १९१४ साली पुण्याच्या जिमखान्या मध्ये खो-खो खेळाबद्दलचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.
  • परंतु खो-खो खेळाबद्दलची पहिली नियमावली १९२४ साली बडोदा जिमखान्याने सादर केली.
  • १९३५ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने खो-खो चे नियम छापून त्यांना प्रसिद्ध केले व हेच नियम आता सर्वमान्य झालेले आहेत.
  • हा खेळ अतिशय सोपा असतो व यासाठी इतर कुठल्याही साधनांची गरज नसते. हा खेळ पूर्णपणे गतीवर आधारित आहे. या खेळात चपळता आणि गतीचा कस लागतो.

Kho Kho Ground Information : खेळाचे मैदान

  • खोखोचे मैदान सुमारे १११ फूट म्हणजेच ३३.६ मीटर लांब व ५१ फूट म्हणजेच १५.५ मीटर रूंद असते.
  • मध्यपट्ट्याची रूंदी १ फूट किंवा ३० सेमी आणि लांबी ८१ फूट किंवा २४.६८ मीटर असते.
  • खोखो मध्ये मैदानाच्या दोन्ही टोकांना दोन खांब रोवावे लागतात. या खांबांची ऊंची ४ फूट म्हणजे १.३६ मीटर व परीघ १३ ते १६ इंच म्हणजे ३३.०२ ते ४०.६४ सेमी इतका असतो.
  • दोन्ही खांबांपासून पहिल्या पाटीचे अंतर सुमारे ८ १/२  फूट म्हणजे २.५४ मीटर असते. इतर सर्व पाटयांमधील अंतर ८ फूट म्हणजे २.४३ मीटर असते.
  • खांबांच्या दोन्ही बाजूला १५ इंच बाय ५१ इंच किंवा ४.५६ मीटर. बाय ८१५.५४ मीटर मापाचे चौकोन असतात.

Kho Kho Rules in Marathi / खेळाचे नियम

  • खो-खो हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात.
  • मैदानात मात्र नऊ खेळाडूच उतरू शकतात बाकीचे तीन खेळाडू हे राखीव असतात. खेळा दरम्यान कोणा खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्या जागी राखीव खेळाडूला उतरवले जाते.
  • खो-खो हा खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये पाच मिनिटांची विश्रांती असते.
  • प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ दुसऱ्या संघाचा पाठलाग करतो आणि दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो आणि दुसरा संघ पहिल्या संघाचा पाठलाग करतो.
  • दोन्ही उपभागांमध्येही २ मिनटे विश्रांतीचा कालावधी असतो. संपूर्ण खेळाचा कालावधी साधारणतः ३७ मिनटे (७+२+७+५+७+२+७) असतो.
  • एखाद्या संघाकडे प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ जास्त गुण असतील तर तो संघ प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा पाठलाग करण्यास सांगू शकतो.

How to Play Kho Kho in Marathi / खेळाची पद्धत

  • सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील अंतरात आखलेल्या आठ चौकोनाच्या मध्ये आलटून पालटून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसतात.
  • नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.
  • हा खेळाडू मैदानात उतरल्यावर बचाव करणाऱ्या संघाच्या खेळाडूपैकी तीन खेळाडू मैदानात उतरविले जातात.
  • खेळ सुरु झाल्याचा इशारा होताच पाठलाग करणाऱ्या संघाचा नववा खेळाडू जो खांबाजवळ उभा असतो तो बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतो.
  • पाठलाग करणाऱ्या खेळाडूसाठी काही नियम असतात. एकदा पळायची दिशा पकडल्यानंतर तो आपली दिशा बदलू शकत नाही. मात्र कोणत्याही एका खांबाला स्पर्श केल्यानंतर तो आपली दिशा बदलू शकतो.
  • पाठलाग करणारा खेळाडू दोन खांबांना जोडणारी रेषा ज्या रेषेत पाठलाग करणारे खेळाडू बसतात ती रेषा ओलांडू शकत नाही.
  • दिशा बदलण्यासाठी तो बसलेल्या खेळाडूला खो देऊ शकतो. खो दिलेला खेळाडू मग पाठलाग सुरु करतो. परंतु खो फक्त बसलेल्या खेळाडूच्या पाठीमागूनच देऊ शकतो, समोरून नाही.
  • खो देण्यासाठी पाठीवर हाताने थाप मारून ‘खो’ असे बोलावे लागते. खो घेतलेला खेळाडू मग पळणाऱ्या खेळाडूला पकडण्यासाठी कोणत्याही एका दिशेने पळू शकतो.
  • पहिले पाठलाग करणारा खेळाडू खो दिलेल्या खेळाडूची जागा घेतो.
  • बचाव करणाऱ्या खेळाडूवर पळताना कोणतेही निर्बंध नसतात. तो बसलेल्या खेळाडूंच्या मधून जाऊ शकतो किंवा आपली दिशा कधीही बदलू शकतो.
  • बचाव करणाऱ्या खेळाडूस जर पकडणाऱ्या खेळाडूचा स्पर्श झाला तर तो आउट होऊ शकतो.
  • बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेला तरी त्याला बाद समजले जाते तसेच बचाव करणारा खेळाडू मैदानात उशिरा उतरल्यासही बाद समजण्यात येते.
  • बचाव करणाऱ्या संघाच्या खेळाडूपैकी तीनही खेळाडू बाद झाल्यानंतरच पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करू शकतात.
  • खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधीच मैदानात उतरणे आवश्यक असते जर कोणा खेळाडूने उशीर केला तर त्याला बाद ठरवण्यात येते. बाद झालेल्या खेळाडूच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो.
  • पहिल्या भागाच्या समाप्तीनंतर प्रत्येक संघाचे गुण मोजले जातात. ज्या संघाचे गुण जास्त असतात त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी गृहीत धरली जाते. दुसऱ्या भागाच्या समाप्तीनंतर, जो संघ आघाडीवर असतो तो संघ प्रतिस्पर्धी संघावर मात करतो व त्या संघाला विजेता संघ घोषित केले जाते.

Wikipedia Information about Kho Kho in Marathi / Few Lines

5 thoughts on “Kho Kho Information in Marathi, Game Kho Kho Rules l खो-खो खेळाची माहिती”

  1. Ashutosh Suresh Vengurlekar

    एका संघाला धावण्याची वेळ किती मिनिटांची असते? आणि सम्पूर्ण खेळ किती मिनिटांचा असतो ?

  2. Anil Sadashiv Mhaske

    एका संगला 7 मिनिटांची वेळ असते

    संपूर्ण खेळ 14 मिनिटातच असतो

  3. Anil Sadashiv Mhaske

    मला खो खो खेळण्याची खूप आवड आहे
    मी शलेतरापे केलायचो
    मला महाराष्ट्र कडून केलायचे आहे
    असं मी मनिय मोदी जिना विनंती करतो

    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *