Skip to content

Harmonium Information in Marathi, हार्मोनियम माहिती

information about harmonium in marathi

Harmonium Information in Marathi

Indian Musical Instruments Harmonium (Peti) Info – हार्मोनियम माहिती

  • हार्मोनियम हे एक कीबोर्ड प्रकारचे संगीत वाद्य यंत्र आहे. ज्यात हवेचा प्रवाह होतो त्याच्यावरील वेगवेगळ्या चपट्या स्वर पटलांना दाबल्यावर त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बाहेर पडतात.
  • यात हात, पाय किंवा गुडघ्यांमार्फत भात्याद्वारे हवा भरून शिट्यांच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण केला जातो. भारतीय उपमहद्वीपात वापरल्या जाणाऱ्या हारमोनियमात प्रामुख्याने हातांचा वापर केला जातो.
  • हार्मोनियमचा शोध युरोपातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १८४२ मध्ये लावला. नंतर इ.स. १८९० मध्ये हे वाद्य युरोपीय लोकांनी भारतात आणले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत आणि युरोपमध्ये हे सर्वाधिक प्रसिद्ध वाद्य होते.
  • सांगिताला साथ देण्यासाठी हार्मोनियमचा वापर केला जातो. हार्मोनियमला बाजा, पेटी, संवादिनी अशीही नावे आहेत. हार्मोनियम हे एक अतिशय मनमोहक आणि सुंदर वाद्य आहे. हार्मोनियम शिकण्यासाठी खूप सरावाची आवश्यकता असते.
  • हार्मोनियम हे एखाद्या टेबलएवढे चौकोनी आकाराचे,लाकडी खोके असते आणि त्याला हँडल, बेलो, कीज, स्टॉप, रीड, कपलर, स्केल चेंजर असतात. उच्च प्रतीच्या हार्मोनियममध्ये 39 कीज असतात.
  • हार्मोनियमचे दोन प्रकार आहेत, पायाच्या सहाय्याने वाजविण्याचे हार्मोनियम आणि हाताने वाजविण्याचे हार्मोनियम. पायाच्या सहाय्याने वाजविण्यात येणाऱ्या हार्मोनियममध्ये शिलाई मशीन सारखी रचना असते ज्यावर पायाने दाब देऊन हवा भात्यामध्ये भरली जाते तर हाताने वाजवायच्या हार्मोनियममध्ये एका हाताने हार्मोनियमची मुठ मागे पुढे केली जाते आणि दुसऱ्या हाताने बटने दाबली जातात.
  • गोविंदराव पटवर्धन, पुरुषोत्तम वालावलकर, एम. धोलपुरी हे भारतातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत.
  • १९३० मध्ये इलेक्ट्रोनिक ऑर्गन पूर्वी चर्चमध्ये हार्मोनियम अतिशय प्रसिद्ध होते.
  • हाताने वाजविण्याच्या हार्मोनियमचा शोध द्वारकानाथ घोष यांनी लावला ज्यामुळे खाली बसून हार्मोनियम वाजविता येते.
  • पायाच्या सहाय्याने वाजविण्याचे हार्मोनियमना भारतात फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
  • हार्मोनियमचा वापर हिंदुस्तानी संगीत, सुफी संगीत, कव्वाली इत्यादी ठिकाणी होतो. बरेचसे हार्मोनियम वादक गायनही करतात. भजन आणि कीर्तन तर हार्मोनियम शिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही.
  • हार्मोनियमला मेलोडीओन, रीड ऑर्गन किंवा पंप ऑर्गन सुद्धा म्हणतात.
  • स्वरमंडल या हार्मोनियमचा शोध भीष्मदेव वेदी यांनी लावला. हा साधारण हार्मोनियमपेक्षा मोठा असतो. हे युरोपिअन हार्मोनियमचे भारतीय रूप आहे.
  • २२-श्रुती हार्मोनियम या हार्मोनियमचा शोध विद्याधर ओके यांनी लावला. ह्या हार्मोनियमवर अकोर्डीयन सारखा आवाज निर्माण करता येतो.
  • हार्मोनियम हे नाव ग्रीक शब्द हार्मनी पासून आले आहे.

Information about Harmonium in Marathi – Wikipedia Language

Harmonium Notations & Notes in Marathi / Few Lines

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *