Elephant Information in Marathi
हत्ती माहिती
- हत्ती हा एक विशाल प्राणी आहे. त्याची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटर इतकी असते. हत्ती करड्या रंगाचा असतो. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे हत्तीही आढळतात.
- लांबसडक सोंड, खांबासारखे पाय, सुपासारखे कान, छोटे डोळे आणि डोकदार सुळे अशी हत्तीची रचना असते.
- भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू इत्यादी राज्यांत हत्ती मोठया प्रमाणात आढळून येतात.
- भारतातील हत्तींमध्ये फक्त नर ह्त्तीलाच मोठमोठे सुळे असतात. मादी हत्तीला अगदी लहान सुळे असतात. सुळे नसलेल्या नर हत्तीला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकन हत्तींमध्ये नर आणि मादी दोघांनाही मोठे सुळे असतात. आफ्रिकन ह्त्तीची पाठ चपटी असते तर भारतीय हत्तींची पाठ फुगीर असते.
- पाच ते सहा टन वजन असूनसुद्धा हत्ती पाण्यात पोहू शकतात.
- जंगली प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. हत्तीला शिकवल्याप्रमाणे ते कृती करतात. त्यासाठी लहान हत्तींना पकडून त्यांना शिक्षण द्यावे लागते. ते सोंडेने ओंडके उचलतात, गाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी युद्धात हत्तीचा उपयोग होत असे. तसेच राजे अंबारीत बसून हत्तीवरून मिरवणूक काढत. हत्ती सर्कशीतही काम करतात.
- हत्ती जंगलात कळपाने राहतात. एका कळपात २०-२५ हत्तींचा समावेश असतो. कळपात मादा हत्ती आणि लहान पिल्ले असतात. नर हत्ती कळपात राहत नाहीत. कळपातील सर्वात म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे कळपाचे नेतृत्व असते. सर्व कळप तिच्या आज्ञेत असतो. कळपात मध्यम वयाचे हत्तीही असतात.
- हत्तीच्या सुळ्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. त्यांना मोठया प्रमाणावर मागणी असते. ह्स्तीदन्त्तांपासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, पेट्या, शोभेच्या वस्तू, फुलदाण्या इत्यादी बनवले जाते.
- वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी ठराविक वेळेत मदावर(माजावर) येतात. अशा हत्तींना मदमस्त हत्ती म्हणतात. असे हत्ती फारच बेभान असतात. हत्तीच्या डोक्याच्या भागाला ‘गंडस्थळ’ संबोधले जाते. जेव्हा हत्ती मदमस्त होतो तेव्हा या गंडस्थलळातून पातळ रस वाहू लागतो. याला मद असे म्हणतात. माजावर आलेला हत्ती खूप ताकदवर आणि रागिष्ठ असतो. अशा हत्तीच्या संपर्कात आल्यास त्याची धडगत नसते. मदमस्त हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतो. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वस्थितीत येतो.
- हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा स्तनधारी प्राणी आहे. हत्तीचा गर्भकाळ २२ महिन्यांचा असतो जो कि जमिनीवरील जीवांमध्ये सगळ्यात लांबचा काळ आहे. जन्माच्या वेळी हत्तीचे वजन १०५ किलो असते.
- हत्ती ५० ते ७० वर्षे जगतो, सगळ्यात दीर्घायुष्यी हत्ती ८२ वर्षाचा नमूद केला गेला आहे.
- हत्तीची त्वचा ही २.५ सेंटीमीटर जाडी असते.
Its nice
information is very important
Beautiful information