Duck Information in Marathi
Badak बदक माहिती
- बदक हा उभयचर पक्षी आहे जो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बदक सामाजिक प्राणी आहे आणि थवा तयार करून एकत्र रहातात.
- अंटार्क्टिका सोडून इतर सर्व ठिकाणी बदक आढळतात.
- बदक हंस आणि बगळ्यांशी संबधित आहेत. पाळीव बदकांच्या ४० हून अधिक प्रजाती आहेत. सुमारे ५०० वर्षापासून बदकांना पाळण्यात येत आहे.
- बदकाची शरीरयष्टी थोडीशी स्थूल असते आणि इतर उभयचर पक्षांच्या मानाने त्यांचे पाय व मान आखूड असतात. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात ज्याचा उपयोग पोहताना व्हल्याप्रमाणे होतो.
- बदकाची चोच रुंद, चपटी आणि पिवळसर रंगाची असते.
- बदकाच्या पिसांवर तेलाचा थर असतो ज्यामुळे पिसे कधीच ओली होत नाहीत. दरवर्षी बदकांची जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात. बदकांच्या तेलकट पिसांखाली बारीक पिसे असतात जी त्यांना थंडीत ऊब सुद्धा देतात.
- बदक चोच पंखांवर वारंवार फिरवून त्यांना स्वच्छ ठेवतात. नवीन पिसे येण्याच्या काळात बदक कमजोर असतात व स्वतःचे रक्षण करण्यात असमर्थ असतात. अशा वेळीस ते सर्व संरक्षणाच्या दृष्टीने एकत्र रहातात.
- बदक उत्तम पोहू शकतोच परंतु उत्तम उडू पण शकतो. बदक जमिनीवर किंवा झाडाच्या ढोलीत घरटी बनवितात. घरटी बनविण्यासाठी गवत, काड्या, पाने व स्वतःची पिसे यांचा उपयोग केला जातो.
- मादा एका वेळीस ५ ते १२ अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असतात. एका महिन्यानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. जन्मतःच त्यांच्या अंगावर पिसे असतात.
- अंड्यातून बाहेर आल्यानंतर काही तासातच बदकाची पिल्ले चालू शकतात ज्यामुळे त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण होते. तसेच पिल्ले काही तासातच पोहू सुद्धा शकतात.
- कोंबड्यांप्रमाणे बदकाचे मांस आणि अंडी सुद्धा खातात म्हणून त्यांना पाळले जाते परंतु मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन होत नाही.
- बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.
- नर बदकापेक्षा मादा बदक जास्त आवाज करते. नर बदकाची पिसे चमकदार असतात व मादा बदकाची पिसे काहीशी निस्तेज असतात.
- बदकाच्या पायाच्या तळव्यांमध्ये रक्तवाहिन्या आणि नसा नसतात ज्यामुळे बदक थंड पाण्यामध्ये पोहू शकतात किंवा थंड पृष्ठभागावरून चालू शकतात.
- बदकाच्या डोळ्यामध्ये तीन पापण्या असतात आणि ते पाण्याखाली उत्तम रीतीने पाहू शकतात.
- काही बदक एका दिवसात ३०० मैलाचे अंतर उडून पार करू शकतात.
- बदक दोन ते बारा वर्षापर्यंत जगू शकतात.
Very nice and very informative
very very nice information for activity
Very informative and also nice