Dengue Symptoms in Marathi
डेंग्यूची प्रमुख लक्षणे – माहिती
- डेंग्यूचे प्रमुख लक्षण आहे तीव्र ताप आणि त्या सोबतच डोकेदुखी आणि सांधेदुखी. ताप जवळपास १०४ डिग्री असतो म्हणूनच या तापाला हाडे-मोड ताप असे म्हणतात.
- डेंग्यूच्या तापामध्ये बरेचदा भरपूर थंडी वाजून ताप येतो. प्रचंड डोकेदुखी जाणवते. तसेच स्नायू आणि सांधे दुखू लागतात. प्लेटलेट्सची संख्या दिवसेदिवस कमी होऊ लागते.
- शरीर दिवसेदिवस कमजोर होऊ लागते. या रोगात भूक खूप कमी लागते किंवा काही खाल्ल्यावर मळमळल्या सारखे वाटू लागते.
- अन्नाला बिलकुल चव लागत नाही आणि घसा खवखवू लागतो किंवा थोडासा दुखू लागतो.
- रोग्याला खूप थकावट आणि अशक्तपणा जाणवू लागतो. काही वेळा अशक्तपणामुळे चक्कर आल्यासारखी वाटते किंवा चक्कर येते.
- शरीरावर लालसर – गुलाबी पुरळ येतो. खास करून चेहरा, गळा आणि छातीवर पुरळ येतो. कधीकधी हा पुरळ स्पष्ट असतो तर कधी अस्पष्ट असतो. कधीकधी व्रणही उठतात.
- डेंग्यूमध्ये होणारी डोकेदुखी साधारणत: पुढील भागात असते. तसेच काहीवेळा डोळ्यांच्या हालचालीनंतर डोळ्याच्या पाठील भागात दुखू लागते.
- डेंग्यू रक्तस्स्रावात्मक ताप हा सामान्य डेंग्यू तापापेक्षा थोडा जास्त गंभीर असतो. या प्रकारच्या तापामध्ये रक्तस्त्राव होऊ लागतो.
- हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. तसेच काही रोग्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव देखील होऊ लागतो. आतड्यांमधून रक्तस्त्राव होतो. प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते.
- छातीमध्ये किंवा पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. ज्यामुळे सतत तीव्र पोटदुखी होते आणि श्वास घेताना त्रास होऊ लागतो.
- त्वचा फिकट दिसू लागते तसेच स्पर्शाला थंड आणि चिकट वाटते.
- अंगावर पुरळ येऊन नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त येऊ लागते.
- काही वेळा रक्ताच्या किंवा बिना रक्ताच्या उलट्या होऊ लागतात.
- सतत झोप येते, अस्वस्थ वाटते. घशाला सारखी कोरड पडून तहान लागत राहते.
- नाडीचे ठोके सुद्धा जलद पडतात.
- अतिगंभीर डेंग्यू हा रक्तस्स्रावात्मक डेंग्यूचा पुढील टप्पा आहे जो खूप कमी लोकांना होतो.
- या रोगात वरील लक्षणांसोबतच रुग्णाची अस्वस्थता वाढते. शरीर थंड पडू लागते. नाडीचे ठोके मंदावतात. आणि रक्तदाबही कमी होतो.
Its mazor and helpful and exact information thanx sir
nice information
Nice information. Thank you it helped me a lot.