Chikungunya Symptoms in Marathi
चिकनगुनिया रोगाची लक्षणे – माहिती
- चिकनगुनिया या रोगाची लक्षणे सुद्धा काही प्रमाणात डेंगू सारखी असतात. चिकनगुनियाचा डास चावल्यानंतर सुमारे ३ ते ७ दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात.
- या रोगाच्या सुरवातीला तीव्र ताप येतो. ताप १०२ डिग्रीपासून १०४ डिग्रीपर्यंत असू शकतो.ताप जवळपास एका आठवडा किंवा जास्तीत जास्त दहा दिवस पर्यंत येतो. दिवसाच्या एका ठराविक वेळेस ताप खूपच जास्त असतो.
- या रोगाचे दुसरे प्रमुख लक्षण आहे प्रचंड सांधेदुखी. हि सांधेदुखी एवढी तीव्र असते की ज्यामुळे हात – पाय हलविताना देखील खूप त्रास होतो. हालचाल करणे खूपच त्रासदायक ठरते. हे लक्षण बरेच दिवस टिकते. काही वेळा सांधेदुखी सोबत सांध्यांना सूजही येते. काहीवेळा पाठदुखीचा त्रास सुद्धा सुरु होतो.
- या रोगामध्ये काही जणांना पुरळ सुद्धा येतो. सर्वांनाच येतो असे नाही. पुरळ शक्यतो चेहऱ्यावर, हातांवर आणि जांघांवर येतो.
- काहीवेळा रुग्णाला स्नायूंमध्ये खेचल्याप्रमाणे वाटतात व दुखतात. प्रचंड डोकेदुखी होते आणि त्यासोबतच भोवळ आल्यासारखी वाटते. काहीवेळा मळमळल्या प्रमाणे किंवा उलटी आल्याप्रमाणे जाणवते.
- काही रुग्णांना डोळ्यांच्या दुखण्याचा त्रास सुद्धा होतो किंवा प्रकाशामध्ये डोळ्यांना त्रास होतो. डोळे लाल होतात.
- या रोगामध्ये झोप कमी होते आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
- काहीवेळा रुग्णाला प्रचंड थंडी वाजून अंग थरथरायला लागते. तसेच जुलाबही सुरु होतात.
- चिकनगुनिया जास्त गंभीर असल्यास नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव होऊ लागतो.
- फारच क्वचित रुग्णांना तोंड येणे, त्वचा काळवंडणे किंवा त्वचेची सालपट निघण्यासारख्या समस्या उदभवू शकतात.
- लहान मुलांमध्ये बहुतेकवेळा आणि मोठ्या व्यक्तींना काहीवेळा प्रकाशाची भीती वाटू लागते आणि प्रकाशात पाहिल्यास डोळे दुखतात.