Butterfly Information in Marathi
फुलपाखरू माहिती
- फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचे पंख असलेला किटकाचा प्रकार आहे. अंडी, अळी, कोश व कीटक या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत.
- फुलपाखराच्या आकर्षक रंगांच्या पंखांमुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते विशेषतः लहान मुलांना ती अतिशय आवडतात.
- जगभरात फुलपाखरांच्या अनेक प्रकारच्या जाती आढळतात त्यातील मोनार्क जातीची फुलपाखरे लांबच्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. ‘सदर्न बर्डविंग’ हे भारत देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे.
- फुलपाखरू हा दिवसा उडणारा कीटक आहे परंतु नॉर्दन पर्ली आय सारखी काही फुलपाखरे रात्रीची उडतात.
- फुलपाखरांच्या जगभरात जवळजवळ १६०,००० वेगवेगळ्या प्रजाती आहेत.
- फुलपाखरू ताशी १२ मैल वेगाने उडू शकते. फुलपाखरांच्या शरीराचे तापमान ८६ डिग्रीपेक्षा कमी असल्यास त्यांना उडता येत नाही.
- गंधक फुलपाखराचे आयुष्यमान सर्वात जास्त ९ ते १० महिने असते.
- बिबळ्या कडवा जातीची फुलपाखरे रुईच्या पानांवर अंडी घालतात. ६ ते ८ दिवसानंतर अंड्यातून अळी बाहेर पडतात. त्यांना सुरवंट म्हणतात.
- भारतातील महाराष्ट्र राज्याने ‘ब्लू मॉरमॉन’ म्हणजेच राणी पाकोळी हे “राज्य फुलपाखरू” म्हणून घोषित केले आहे. हे फुलपाखरू आकाराने मोठे असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखावर निळ्या चमकदार रंगाच्या खुणा असतात.
- महराष्ट्रात २२५ प्रजातींची फुलपाखरे आढळून येतात. देशातील १५ टक्के फुलपाखरे ही महाराष्ट्र राज्यात आढळून येतात.
- ईशान्य भारत हे फुलपाखराचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
- फुलपाखरू ऐकू शकत नाहीत परंतु ते स्पंदने अनुभव करू शकतात. तसेच पायांच्या सहाय्याने चव ओळखतात आणि अँटीनाच्या सहाय्याने वास घेतात.
- फुलपाखरांना फुप्फुसे नसतात आणि ते पोटावरील छीद्रांच्या सहाय्याने श्वसन करतात.
- मादा फुलपाखरू नरापेक्षा मोठे असते आणि नरापेक्षा जास्त जगते.
- न्यू गिनीचे एक फुलपाखरू एवढे मोठे असते की त्याच्या पंखांचा विस्तार २७ सेमी एवढा असतो.
- बऱ्याच फुलपाखरांच्या अळ्यांच्या अंगावर विषारी केस असतात.
- फुलपाखराच्या पंखांवर मोठे गोल असतात जे शिकाऱ्यांना डोळ्याप्रमाणे भासतात.
- मोनार्क नावाचे फुलपाखरू सुमारे ३००० किलोमीटर पर्यंत स्थलांतर करू शकतात.
- फुलपाखरांच्या डोळ्यात सुमारे ६००० लेन्स असतात आणि ते अल्ट्रावायलेट प्रकाश सुद्धा पाहू शकतात.
- बरीच वयस्क फुलपाखरे विष्ठा टाकत नाहीत.
- त्यांचे पंख पारदर्शक असतात व पंखावरील छोट्या खवल्यांमुळे त्यांना रंग प्राप्त होतो.
- फुलपाखरे त्यांचे पंख इंग्रजी ८च्या आकारात हलवितात.
Nice one
Nice mahiti
Very nice
Nice
nice
very very nice