Breast Cancer Symptoms in Marathi
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे – माहिती
- स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगा पैकी सुमारे ३० टक्के स्तनाच्या कर्करोगाचे पेशंट असतात. स्तनांमध्ये होणाऱ्या गाठी पैकी फक्त १० टक्के गाठी कर्करोगाच्या असतात.
- स्तनांच्या कर्करोगाचे सर्वात मुख्य लक्षण आहे स्तनांमध्ये गाठ तयार होणे. स्तनांच्या आजूबाजूला थोडे दाबून पाहिल्यास हि गाठ जाणवू शकते.
- कधी कधी स्तनांमध्ये खळ्या किंवा खड्डे दिसू शकतात.
- बहुतेक वेळा स्तनांच्या त्वचेचा रंग किंवा स्तनांच्या त्वचेचा पोत सुद्धा बदललेला आढळतो.
- स्तनांच्या बोंडशी मध्ये म्हणजे निपलमध्ये सुद्धा बदल दिसतो. कधी कधी निपल एका बाजूस वळलेले दिसतात किंवा आत खेचल्यासारखे वाटतात.
- निपलमधून रक्त किंवा इतर कुठला तरी द्रव स्त्रवू लागतो. स्तन दुखू लागतात. निपल लाल होते.
- स्तनांच्या टोकावर भेगा पडतात आणि वेदना होऊ लागतात. तसेच स्तनांच्या टोकाला खाज येऊ लागते.
- स्तनांचा आकार अचानक वाढतो किंवा अचानक कमी होतो. स्तन घट्ट भासतात, हि लक्षणे दोन्ही स्तनांमध्ये एकदम न दिसता फक्त एकाच स्तनामध्ये दिसून येतात.
- स्नायूंच्या वेदना होऊ लागतात आणि पाठदुखी सुद्धा उद्भवते.
- या लक्षणांशिवाय हा कर्करोग झालेल्या महिला कमजोर होऊ लागतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो.
- बऱ्याचदा स्तन इतर शरीरापेक्षा थोडे जास्त गरम भासतात आणि थोडेसे सुजलेले दिसतात.
- स्तनांचा फक्त काही भाग जाड झाल्याप्रमाणे किंवा फुगल्याप्रमाणे वाटतो. स्तनांवर लाल रंगाचा पट्टा दिसतो.
- जर रोग जास्त गंभीर असेल तर हाडांमध्ये वेदना होऊ लागतात. लसिका ग्रंथीना सूज येते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि स्तनांची त्वचा पिवळसर दिसते.
- कधी कधी स्तनांच्या त्वचेवरील रोमछिद्रे मोठी होतात व संत्र्याच्या सालीवरील छिद्रांप्रमाणे दिसतात.
- काही वेळा निपलवरती पुरळ येतो किंवा खवले आल्याप्रमाणे भासतात.
Breast cancer best hospital