Skip to content

Dolphin Information in Marathi || डॉल्फिन माशाची माहिती

dolphin nibandh mahiti

Dolphin Information in Marathi

डॉल्फिन माहिती

डॉल्फिनला माणसांचा मित्र मानतात. अशी वंदता आहे की काही पाणबुड्यांना शार्क पासून डॉल्फिनने वाचविले. अर्थात यामध्ये तथ्य कितपत खरे आहे माहित नाही. पण डॉल्फिन पुष्कळसा माणसां सारखा सामाजिक रित्या वागतो.

डॉल्फिन प्राणी जगातील फायलम कॉर्डेटा क्लास ममालिया या वर्गात मोडतो. हा समुद्रातील सस्तन प्राणी आहे. त्यामुळे त्याचे बरेचसे स्वभाव आणि जीवनमान माणसांसारखे आहे. डॉल्फिन १.७ मीटर पासून ९.५ मीटर पर्यंत मोठे असतात. आणि ५० किलोग्राम पासून १० टन (किलर व्हेल) पर्यंत त्याचे वजन असते.

डॉल्फिन ४९ मिलियन वर्षांपासून अस्तित्वात आहेत. डॉल्फिन समुद्रात, तसेच नदीच्या पात्रात सुद्धा आढळतात. उदाहरणार्थ गंगेतील, ब्रह्मपुत्रेतील किंवा अमेझॉन नदीतील डॉल्फिन. याचे पुढचे आणि मागचे पाय फ्लिपर मध्ये रूपांतरित झालेले असतात. आणि त्यांना अतिशय विकसित असे ऐकण्याचे अवयव असतात त्यामुळे हवेतील किंवा भक्ष्याची माहिती त्यांना व्यवस्थित मिळते. डॉल्फिनच्या त्वचेखाली ब्लबर नावाची चरबी असते जिच्यामुळे डॉल्फिनला पाण्यात उष्ण राहायला मदत होते. डॉल्फिनच्या जठरामध्ये दोन कप्पे असतात. डॉल्फिनला १०० ते १२० त्रिकोणी आकाराचे दात असतात. डॉल्फिन ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये साठवून ठेवतात आणि खोल पाण्यात बुडी मारताना हृदयाचे ठोके कमी करतात आणि ऑक्सिजन परत उलटे फिरवू शकतात. डॉल्फिनच्या ६ जाती आहेत – किलर व्हेल, मेलन हेडेड व्हेल, पिग्मी किलर व्हेल, पायलट व्हेल, हायब्रिड वोल्फिन. डॉल्फिनच्या नराला बुल म्हणतात, मादीला काऊ म्हणतात आणि पिल्लाला काफ म्हणतात. किलर व्हेल डॉल्फिन चा मेंदू सर्व प्राण्यांमध्ये मोठा आहे.

पुनरुत्पादन :

डॉल्फिन सस्तन प्राणी असल्यामुळे नर-मादीच्या संयोगाने एकच पिल्लू जन्माला येते. आई पिल्लाचा सांभाळ करते. प्रसंगी स्वत: उपाशी पण राहते. साधारणतः वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात पैदास होते.

खाणे :

डॉल्फिन स्वीड आणि इतर मासे खातो. किलर व्हेल सील सारखे मोठे सस्तन प्राणी पण खातो.

डॉल्फिनचा माणसाबरोबर संबंध आणि करामती :

डॉल्फिन हा माणसासारखा सामाजिक प्राणी आहे. तो एक हजाराच्या झुंडी मध्ये ज्याला पॉड म्हणतात, समुद्रात वावरतो. त्याला माणसांसारखेच इतरांना मदत करण्याची भावना आहे. झुंडीतल्या कमकुवत दुबळ्या घटकाला सांभाळून त्याच्याभोवती गोल करून सांभाळतात. लहान पिल्लांचे शार्क पासून असेच कडे करून संरक्षण करतात. असे पण आढळून आले आहे की डॉल्फिन इतर प्राण्यांना पण उथळ समुद्रात मार्गदर्शन करतात. कोळ्यांना मासेमारीला मदत करतात आणि ग्रीक पुराणकथेमध्ये डॉल्फिनने आपल्या पाठीवर बऱ्याच नायकांना पाठीवरून समुद्र पार करून दिल्याच्या कथा आहेत.

गम्मत म्हणजे डॉल्फिन तऱ्हे तऱ्हेचे आवाज काढू शकतात. त्यात किल्क आणि शीळ पण घालतात. त्यामुळे ज्या प्राणी संग्रहालयात डॉल्फिन ठेवलेले असतात, तिथे लहान मुलांचे ते खूप मनोरंजन करतात. ते तऱ्हे तऱ्हेचे खेळ पण करून दाखवतात. त्यांच्या उड्या मारण्यामुळे त्यांना पोहायला त्रास कमी पडतो आणि दिसायला पण लोकांना मजा वाटते. त्यामुळे प्राणी संग्रहालयात डॉल्फिनच्या बाजूला प्रेक्षकांची खूप गर्दी असते. डॉल्फिनच्या पिल्लांना अन्न भरवणे, साहित्य वापरणे अशा गोष्टी सुद्धा शिकवतात. शक्यतो आई शिकवते, कधी कधी वडील पण शिकवतात.

डॉल्फिनला माणसांसारखेच जंतु संसर्गाचे रोग होतात जसे – न्यूमोनिया आणि टाईप-२ डायबीटीस. डॉल्फिनच्या या मानव मैत्रीमुळे बऱ्याचशा सैनिकी गणवेशात तो विराजमान झालेला आहे, जसे रोमानिया, बार्बाडोस आणि साउथ फ्रांस. हेच काय, तर एका सरदार कुटुंबाचे आडनाव सुद्धा डॉल्फिन आहे. हिंदू धर्मात सुद्धा त्याला डॉल्फिन देव मानतात. नेव्हीमध्ये पण डॉल्फिनचा हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी उपयोग करून घेतात.

एवढे जरी असले तरी डॉल्फिनला नामशेष होण्याची भीती आहे. कारण त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असते. जपान, सोलोमन आयलंड आणि पेरू या देशांमध्ये डॉल्फिन ड्राइव्ह म्हणून मुद्दाम त्यांच्या शिकारीचा खेळ खेळला जातो. नंतर डॉल्फिनला समुद्रातले प्रदूषण, प्लास्टिकचे विष आणि पेस्टीसाईड, हेवी मेटल यांच्यामुळे तसेच बोटींशी झालेल्या धडकांमुळे बरेचसे डॉल्फिन मरतात.
म्हणून काही पर्यावरण प्रेमी मंडळींनी डॉल्फिन-सेफ या संस्थेचे निर्माण केले आहे.

Wikipedia Essay, Information of Dolphins in Marathi Language

1 thought on “Dolphin Information in Marathi || डॉल्फिन माशाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *