Cosmos Flower Information in Marathi
कॉसमॉस फ्लॉवर माहिती
Introduction / परिचय :
- कॉसमॉस हि एक रंगीबिरंगी आणि आकाराने लहान असणाऱ्या आकर्षक फुलांची जात आहे. कॉसमॉस हा जनुस अस्टेरासी या कुटुंबातील एक भाग आहे. हे एक बारमाही वनस्पती आहे आणि यांच्या सुमारे २० उपजाती आहेत.
- सूर्यफूल, झेंडू आणि डेझी हे सर्व याच कुटुंबामधील सदस्य आहेत. हे एक अत्यंत आकर्षक फुले असणारे कुटुंब आहे, सर्वच फुलांचा आकार हा मध्यम असतो आणि सामान्यपणे ही फुले कुठेही आढळून येऊ शकतात.
- अनेक बागांमध्ये आपण या फुलांची केलेली विशेष सजावट बघू शकतो. समारंभात सजावटीमध्ये या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Description / वर्णन :
- कॉसमॉसच्या प्रजातींमध्ये भिन्न भिन्नता आढळून येते, या फुलांचा व्यास साधारणतः २ ते ४ इंच इतका असतो.
- यामध्ये अनेक विविध रंग उपलब्ध आहेत जसे पिवळा, गुलाबी, पांढरा. याला अनेक पाकळ्या असू शकतात ज्यांची काही निश्चित संख्या नसते. पाकळ्या अतिशय चमकदार परंतु नाजूक असतात. विविध प्रजातीनुसार त्यांचे रंग अगदीच भिन्न असू शकतात.
- हे एक वनौषधी आहे, यांच्या झाडाची उंची साधारणपणे ३ ते ६ फूट एवढी असू शकते. या फुलांना वर्षातून दोनदा बहर येतो तर हंगामात केवळ एकदा बहर येतो. या वेळेत हि फुले खूप बहरतात आणि ते दृश्य अगदी मनमोहक असते
Name and Clan / नाव आणि कुळ :
- कॉसमॉस हे नाव या फुलाला ग्रीक भाषेमधून मिळालेले आहे आणि याचा अर्थ “संतुलित विश्व” असा होतो. जगामध्ये या कॉसमॉसच्या अनेक प्रजाती बघावयास मिळतात. परंतु याचे मूळ मेक्सिको आणि अमेरिका येथे आहे. अँग्लो बोअर युद्धाच्या वेळी या फुलांची सर्वाना ओळख झाली.
- या कॉसमॉसच्या कुळामध्ये शेवंती, सूर्यफूल यांसारख्या फुलांचा समावेश असतो.
- त्यांच्या रचनेवरून आपण हा अंदाज बांधु शकतो. भारतातील पिवळे कॉसमॉस, जपानमधील गुलाबी कॉसमॉस, कोरियामधील कॉसमॉस, चॉकोलेट कॉसमॉस असे सर्वच ठकाणी आढळून येतात.
Planted and Hybrid Varieties / लागवड आणि संकरित जाती :
- कॉसमॉसला देखील बाजारपेठेमध्ये बरीच मागणी असते. त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक पद्धतीने यांची लागवड केली जाऊ शकते. कॉसमॉसची फुले संपूर्ण जगभरातील कोणत्याही प्रदेशात अत्यंत जलद गतीने आणि यशस्वीरीत्या लागवड केली जाऊ शकतात. हे बियाणे जगातील सर्वात वाढीव बियाणे आहे. हे बीज अत्यंत लवकर अंकुरते त्यामुळे हे एक सोपे पीक आहे.
- संकरित प्रजातीमध्ये या फुलांना चॉकोलेट, वॅनिला, रोझ असे विविध सुगंध देखील गेले आहेत. जेव्हा या फुलांना बहर येतो तेव्हा संपूर्ण वातावरण त्या सुगंधाने भरून जाते. हंगामामध्ये हे झाड साधारणपणे ४ ते ५ फुटांपर्यंत वाढते.
- या झाडाला हंगामामध्ये अनेकदा बहर येत असतो त्यामुळे वेळेवर फुलांची कापणी देखील आवश्यक असते. तसे न केल्यास फुलांच्या बहरावर परिणाम होऊन फुलांची संख्या कमी होऊ शकते.
Thank you very much for the information.