Christmas Information in Marathi
नाताळ माहिती
- ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त २५ डिसेंबरला नाताळ सण साजरा केला जातो.तर काही जागी नाताळ हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन मान्यते नुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
- वेगवेगळे शुभेच्छापत्रे, भेटवस्तू एकमेकांना देऊन या सणात परस्परांचे अभिनंदन करण्यात येते. रोषणाई करून या काळात आपापल्या घरांना सजवण्याची प्रथा आहे. सूचिपर्णी झाड ख्रिसमस वृक्ष म्हणून सजवले जाते. रात्री सांताक्लॉज याच दिवशी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू वाटत असतो असा जनमानसात समज प्रस्थापित आहे.बायबलमध्ये ख्रिस्ती लूक आणि मॅथ्यू दोन्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माचे संदेश देतात. बायबल नुसार जुडियाच्या बेथलेव्हेंम या जागी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता.एका गोठयात येशूख्रिस्ताचा जन्म झाला.असा समज आहे कि ख्रिस्तमसच्या दिवशी देवदूताने येशू ख्रिस्ताला मसिया म्हणून संबोधले व आजू-बाजूच्या भागातील सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. संत मॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन महाराजे येशू ख्रिस्ताला भेटायला गेले होते.तसेच त्यांनी येशूला भेटवस्तू दिल्या. त्यावेळीच्या राजा हेरॉडने मात्र येशूच्या जन्माचा संदेश मिळताच सगळ्याच दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. या आदेशामुळे येशूचे कुटुंबिय ईजिप्तला गेले होते.
भेटवस्तू देण्याची प्रथा
- नाताळ च्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याचे फार महत्वाचे समजले जाते. दुकानदारांच्या व अन्य विक्रेत्यांच्या धंद्याची हि तर पर्वणीच असते. लहान मुलांना हा सण खूप आनंद देतो.घरातील वडीलधारी व्यक्ती लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेशात येऊन भेटवस्तू देतात.
भारतातील नाताळ
- या दिवशी भारतात सुट्टी दिली जाते.या दिवशी सर्व लोक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात.सर्व ख्रिस्ती बांधव आपापली घरे सजवतात, गोड पदार्थ आणि खाण्याच्या पदार्थांचे गरिबांना वाटप करतात.या दिवसाला भारतात बिग डे असेही संबोधले जाते.
- इंग्रजी कॅलेंडर नुसार २१ डिसेंबर हा दिवस संपूर्ण वर्षातील सर्वांत छोटा दिवस असतो. तसेच रात्र मात्र मोठी असते. त्यानुसारच नाताळ म्हणजेच २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने बरीच मोठी असते. हि रात्र मोठी असल्यामुळे या रात्री मेणबत्त्या पेटवून, आनंदोत्सव साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून मानला जात असला तरी या पूर्वी मात्र येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी आहे असे मानले जात होते. ख्रिसमसचा सण जगात बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही अनुयायी व काही पंथ हा आनंदोत्सव मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी साजरा करतात.
- काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भीतीदायक वाटत असतो जसं काही तो आपला शत्रू आहे. अशा अंधाराला दूर करण्यासाठीच मेणबत्या लावण्याची प्रथा आहे.
- सर्व गिरिजाघरात या दिवशी प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ आशीर्वाद आणि कामना पत्रकांचे घेवाण देवाण होते. ख्रिश्चन लोक नाताळच्या सुरु होण्याअगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करण्याच्या प्रथेचे पालन करतात.जगभरातल्या सर्वच गिरीजाघरांमध्ये येशु ख्रिस्ताच्या जन्माच्या गाथा वेगवेगळ्या रूपात प्रदर्शित केल्या जातात. आरती व पुजा पाठास चोवीस डिसेंबरच्या मध्य रात्री पासूनच सुरूवात होते.
- एक दुसऱ्यांची गळाभेट घेवून ख्रिश्चन बांधव शुभेच्छांचे आदान प्रदान करत असतात. नाताळला आजकाल धार्मिकते सोबत सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. नाताळच्या दिवशी विशेष प्रकारच्या पुडिंग व केक इत्यादी गोड पदार्थ बनवून वाटल्या जातात.परंतू या दिवशी भारतातील आदिवासी आणि खेड्या पाड्यांच्या लोकांचे खानपान मात्र वेगळे असते. ते लोक तांदुळाच्या रव्या पासून बनविलेले केक व केळी तयार करून सेवन करतात. तसेच गरीब लोकांना वाटप करण्यात येतात. पायस हा पदार्थ दक्षिण भारतात काही भागात वाटण्यात येतो.