Carnation Flower Information in Marathi
कार्नेशन फ्लॉवर हृदयातील भावना व्यक्त करणारे फुल
आपल्या आकर्षक रंग आणि आकाराने माणसाचे मन मोहून टाकणारी फुले बागेत अनेक असतात. जसे कोणीतरी म्हटले आहे “बाग में हर तरह के फुल होते है,हर एक को अपनी अपनी महक अपना अपना रूप होता है|” प्रपोज करताना लाल गुलाब देतात, लग्न समारंभ आणि राजकीय स्वागतात गुलाब, लिली अशा फुलांचा बुके देतात. फुलांनी भावना व्यक्त करण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण एक असे फुल आहे की त्याच्या प्रत्येक रंगाद्वारे एक एक भावना व्यक्त करण्याची रीत पाश्चिमात्य देशात प्रचलित आहे. त्याचे नाव कार्नेशन फ्लॉवर.
History of Carnation Flower / कार्नेशन फ्लॉवर इतिहास :
- हे फुल 2000 वर्षांपूर्वीपासून मानवाचे लाडके फुल होते. १८८५ मध्ये फ्रांसहून अमेरिकेला जहाजातून गेले आणि त्यांचेच होऊन बसले.
- ह्याच्या जितक्या कथा सांगाव्या तेव्हड्या कमीच आहेत. ह्याला दैवी फुल मानतात.
- जिझस आपला क्रॉस नेत असतांना व्हर्जिन मेरीच्या डोळ्यातून जे अश्रू टपकले ते जमिनीवर पडून त्यांची हि फुले झाली. म्हणून ह्या फुलाना व्हर्जिन मेरीचे अश्रू म्हणतात.दुसरे ह्याच्या नावात कॅरोना, म्हणजे गारलँड फ्लॉवर म्हणजे हाराची फुले असे म्हणतात.
- ग्रीस मध्ये राज्याभिषेकाला ह्यांचा उपयोग करीत. तसेच कार्निश म्हणजे गुलाबी किंवा इन्कारनेशन म्हणजे देवाचा पुनर्जन्म असेही नाव आहे.
- आणखी एक गोष्ट आहे ती डायना ह्या देवतेची.ती पृथ्वीवर आली असता एका मेंढपाळाच्या प्रेमात पडली पण त्याने तिचे प्रेम अव्हेरले.
- त्यामुळे चिडून तिने त्याचे डोळे काढले आणि जमिनीवर फेकून दिले .त्याची हि फुले झाली म्हणून ह्याच्या जातीला डियानथस असे नाव आहे.
Carnation Flower Information / कार्नेशन फ्लॉवरची माहिती :
- ह्या फुलाचे कुटुंब करिओफिलेस आणि जीनस डियानथस आहे. ह्याची जात डी.करिओफालस ही आहे. हे फुल मुख्यत: क्रोशीया, ग्रीस(सिसिली,सार्डीनिया), इटली, आणि स्पेन मध्ये आहे. ह्यांना क्लोव्ह जिल्ली असेही म्हणतात.
- ह्या फुलांना सूर्यप्रकाश खूप लागतो, त्याशिवाय त्यात रंग भरत नाही. तसेच जराशी अल्कधर्मी असलेली जिराईत जमीन लागते आणि कमर्शियल खते लागतात. ह्याची पाने ग्रेयीश ग्रीन रंगाची असतात आणि झाड 15 से.मी. चे लवचिक खोडाचे असते.
- ह्यावर एकच किंवा 5 फुलांचा गुच्छ असतो. त्याचा 3 ते 5 से.मी. व्यास असतो, वास मसालेदार असतो. हे झाड वार्षिक, बारमाही किंवा द्वैवार्षिक पण असतात.
- हे फुल में मध्ये उमलते आणि त्याला बहर येतो. ह्या झाडांना एक मोठे फुल किंवा 20-25 पाकळ्यांचे फुल असे अनेक प्रकारची फुले येतात.
- आणि फुलांचा देठ लहान असतो. हि फुले मुख्यत: बुके तयार करण्यास वापरतात. ह्या झाडांना व्हास्कुलर विल्ड बक्तेरीयाल विल्ट आणि फ्लॉवर रॉट असे इन्फेक्शन आणि थ्रीप, स्पायडर माईटबड बोअरर असे कीटक नाश करतात.
Types and Colors of Carnation Flower / कार्नेशन फ्लॉवरचे प्रकार आणि रंग:
- ह्याचे रंग लाल, पांढरा, गुलाबी, पर्पल, हलका लाल, ग्रीन असे आहेत. त्यापैकी प्रत्येक रंगाचा एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे कुठल्या प्रसंगाला कुठली फुले न्यावी ह्याची परंपरा आहे, ती अशी:
- व्हाईट- पांढरा रंग शुद्ध प्रेम आणि चांगले नशीब दर्शवितो. ह्या रंगाची फुले प्रेमाचे, आदराचे प्रतिक म्हणून देतात. तसेच फ्युनरल्स साठी पण हि फुले नेतात.
- हलका लाल- प्रशंसा दर्शविते.
- गडद लाल- गाढ प्रेम, स्नेहभाव दाखवतो.
- लाल रंग सामाजिकता पण दर्शवितो. आणि कामगार दिनाला, तसेच कामगार चळवळीला ह्या फुलांचा उपयोग करतात.
- पर्पल- लहरीपणा दाखवतो.
- गुलाबी- आईचे अमर्याद प्रेम, जे व्हर्जिन मेरीच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या अश्रूंच्या रुपात आले. हे आई जिवंत असेल तर लाल कार्नेशन देतात आणि नसली तर तिच्या आठवणीत पांढरी फुले तिच्या समाधीवर मदर्स डे ला वाहतात. तसेच “I miss you” हे सांगण्यासाठी पण देतात.
- पिवळा -प्रेमात निराशा, द्वेष किंवा प्रेम लाथाडले, हे हि फुले दर्शवितात.
- हिरवा – संत पॅट्रीक डे साठी ह्या रंगाची फुले नेतात.ऑस्कर वाईल्ड ह्या आयरिश लेखकाने हि धारण केली होती.
Uses of Carnation Flower / कार्नेशन फुलांचा वापर:
- तसेच झेकोस्लावाकीया व पोलंड मध्ये वूमन्स डे ला हि फुले आणि जरुरीचे सामान (जे नेण्यास बंदी आहे) देतात.
- युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड मध्ये परीक्षेसाठी हे फुल प्रतिक म्हणून वापरतात.
- पहिल्या परीक्षेसाठी पांढरे फुल, परीक्षेच्या मध्यावर गुलाबी आणि शेवटी लाल.ह्याचे कारण असे की कोणीतरी लाल शाईच्या बाटलीत पांढरी फुले ठेवली आणि परीक्षा संपतांना ती लाल झाली .त्यामुळे हा प्रघात पडला.
- ह्या फुलांना खूप मान आहे. स्पेन, मोनाको, स्लोविणीस आणि बलेरिक आयलंड चे राष्ट्रीय फुल आहे तर स्टेट ऑफ ओहीओचे स्कार्लेट हे स्टेट फुल आहे. जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी कार्नेशन फुल प्रतिक आहे तर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी हे प्रतिक म्हणून वापरतात.
- इतक्या रंगांची उधळण करणारे आणि माणसांच्या भावना दर्शविणारे हे फुल माणसाला त्याचा सखा वाटेल ह्यात नवल नाही.