Bachelor of Business Administration Information in Marathi
BBA Info : बॅचलर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) माहिती :
- बीबीए (बॅचलर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) हा कोर्स सध्या सर्वात जास्त महत्व असलेला आणि विद्यार्थ्यांचा कौल असलेला कोर्स आहे. बीबीए हा एक बॅचलर डिग्री कोर्स आहे. यामध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापनाबद्दल शिक्षण दिले जाते. व्यवसाय उद्योगासाठी अतिशय उपयुक्त असा हा कोर्स आहे.
- अनेक नोकरीच्या संधी आपल्याला हा कोर्स करून उपलब्ध होऊ शकतात. आपण जर १२ वी मध्ये असाल, नुकतेच १२ वी पास झालेला आहात किंवा अशा पाल्याचे पालक असाल तर आपल्याला हि माहिती नक्कीच अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
- चला तर मग बघुयात बीबीए कोर्स बद्दलची सविस्तर माहिती.
पात्रता :
- आपण जर १२ वी पास आहेत आणि चिन्ता करत असाल कि बाकीच्या कोर्सेस प्रमाणे बीबीए कोर्सला देखील कोणत्या विशिष्ठ शाखेतून उत्तीर्ण होणे गरजेचे आहे तर चिंता, काळजी अगदीच सोडून द्या कारण कि तुम्ही विज्ञान शाखेचे असा, वाणिज्य किंवा कला शाखेचे असाल तर तुम्ही निश्चितच बीबीए कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता.
- बीबीए साठी तुम्हाला १२ वी परीक्षेत किमान ५०% गुण हवेत.
- काही कॉलेजेस आणि संस्था मिळून सामूहिक पद्धतीने प्रवेश परीक्षा देखील घेतात ती तुम्ही पास करणे आवश्यक असते. प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही थोडे आधी याच्या तारखांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. या प्रवेश परीक्षेच्या निकालावरून तुम्हाला मिळणारे कॉलेज ठरत असते.
- तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला नोकरी करून शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही मुक्त विद्यापीठात देखील ऍडमिशन घेऊ शकता. महाराष्ट्रात आणि भारतात देखील अशी अनेक विद्यापिठे आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे मुक्त विद्यापीठ आहे. तसेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी देखील आहे.
कालावधी आणि फी (Fees) :
- बीबीए कोर्स हि एक बॅचलर डिग्री आहे. याचा कालावधी हा ३ वर्षे एवढा असतो. यामध्ये सेमिस्टर पद्धतीने अभ्यासक्रम असतो ज्यामध्ये वार्षिक परीक्षा नसून प्रत्येक ६ महिन्याला सत्र परीक्षा असते. यामध्ये तुम्ही पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ अशा पद्धतीने तुमची पदवी पूर्ण करू शकता.
- या कोर्सची ३ वर्षांची फी हि सरासरी १ लाख ते २.५ लाख असू शकते. फी मध्ये विद्यापीठांनुसार थोडा बदल असू शकतो. तुम्ही एकदम किंवा टप्प्यांमध्ये देखील फी भरू शकता. बीबीए कोर्स हल्ली जवळपास सर्व कॉलेज मध्ये घेतला जातो. त्यामुळे जर तुम्हाला आपले गाव आणि घर सोडून जाण्याची इच्छा नसेल तरी देखील तुम्ही जवळच्या कॉलेज मधून बीबीए कोर्स करू शकता.
अभ्यासक्रम :
- बीबीए कोर्स मध्ये संगणक विषयी अभ्यास, व्यवस्थापन, उद्योग, व्यवसाय, गणित, व्यवसाय व्यवस्थापन, अकाउंटिंग, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यापार, संभाषण कौशल्य, जनसंपर्क, पर्यटन आणि आतिथ्य, आरोग्य सेवा, शासकीय सेवा असे अनेक विषय शिकवले जातात. तसेच व्याख्याने, प्रात्यक्षिके यांनी त्यांचे ज्ञान वाढवले जाते. १ सेमिस्टर मध्ये किमान २ चाचणी परीक्षा असतात. तसेच सबमिशन तर असतेच असते. अभ्यासक्रमात संगणक विषयी अभ्यासावर जास्त भर दिला जातो.
- या ३ वर्षाच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्याला ६ परीक्षांना बसावे लागते. त्याबरोबरच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा देखील असते यावरून त्याची वार्षिक गुणवत्ता ठरवली जाते. तसेच तुमचे संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास यावर देखील भर दिला जातो.
नोकरीच्या संधी :
- बीबीए कोर्स केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. खाजगी आणि सरकारी क्षेत्रातही नोकरीच्या संधी आहेत.
- परंतु चांगली नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पदवीमध्ये चांगले गुण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुम्हाला शिकवलेले अभ्यासक्रम आणि कौशल्य तुम्ही आत्मसात केलेले असायला हवे.
- बँकिंग, फायनान्स, व्यवस्थापन,जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, इन्शुरन्स, प्रोडक्शन अशा अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी बीबीए कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
- बीबीए कोर्स नंतर मिळणारा पगार किमान १० हजार ते १५ हजार मध्ये असू शकतो. सुरवातीला जरी हा पगार जास्त वाटत नसला तरीही तुमच्या कामामुळे आणि कामातील सातत्यामुळे तो नक्कीच वाढू शकतो.
- अनेक कंपनी त्यांच्या उत्पादनांचे प्रसार करण्यासाठी नवीन तरुणांच्या शोधात असतात. अशा ठिकाणी बीबीए कोर्स केलेल्या तरुण तरुणींना मोठी मागणी असते.
- तसेच जर तुम्हाला नोकरी करावयाची नसेल आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर या शिक्षणाच्या आधारे तुम्ही ते नक्कीच करू शकता. तसेच बिसिनेस कंन्सल्टंट, प्रोसेस अनॅलिस्ट, फायनान्स ऍडव्हायझर देखील होऊ शकता. फ्रीलांसिन्ग हे एक मोठे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी बीबीए कोर्स मुळे खुले होते. यामध्ये तुम्हाला फक्त एखाद्या गोष्टीचे उत्तम ज्ञान हवे. फ्रीलांसिन्ग ही अशी गोष्ट आहे जिथे तुमचे बॉस तुम्हीच असता. तुम्हाला काम करण्यासाठी कोणत्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही, तुम्ही घरून, बाहेरून, बागेतून, कुठूनही आणि कधीही काम करू शकता.
- बीबीए कोर्स नंतर नोकरी न करता पुढील शिक्षण घेणे हा देखील एक उत्तम मार्ग असू शकतो.
पुढील शिक्षणाच्या संधी :
- बीबीए कोर्स केल्यानंतर केला जाणारा सर्वात प्रसिद्ध कोर्स म्हणजे एमबीए हा आहे. एमबीए करण्यासाठी आपण विविध पर्याय निवडू शकतो जसे एमबीए फायनान्स, एमबीए मार्केटिंग, एमबीए ह्युमन रिसोर्स, एमबीए इन हॉस्पिटॅलिटी, एमबीए ऑपरेशन्स मॅनेंजमेंट, एमबीए इन इन्फॉर्मेशन सिस्टिम. बीबीए कोर्स केल्यानंतर एमबीए करण्यासाठी प्रवेश परीक्षा असते. तुम्ही बीबीएच्या शेवटच्या वर्षाला असताना ही परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये येणाऱ्या रँक वरून तुम्हाला कोणत्या कॉलेजला आणि एमबीए मध्ये कोणत्या पर्यायाला ऍडमिशन मिळणार आहे ते ठरेल.
- मास्टर इन मॅनेंजमेंट स्टडी, पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मॅनेंजमेंट, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यास असे बाकीपण पर्याय बीबीए कोर्स केल्यानंतर उपलब्ध आहेत. तसेच मास्टर ऑफ कॉम्पुटर सायन्स मध्ये देखील पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता.
बीबीए च का ? :
- जसे इंजिनीरिंग करण्यासाठी डिप्लोमा अत्यंत फायदेशीर असतो तसेच एमबीए करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी बीबीए ही पहिली पायरी आहे. बीबीए हा एमबीए चा पाया आहे असे म्हटले तर त्यात काही चूक ठरणार नाही.
- तसेच स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम कोर्स आहे. तसेच उद्योग विकासासाठी लागणारे दृष्टिकोन आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.
- बीबीए कोर्सचा मूळ उद्देश फक्त पुस्तकी अभ्यास न करता प्रात्यक्षिक ज्ञान देणे हा आहे. म्हणूनच ३ वर्षांच्या या पदवी कोर्समध्ये व्यवस्थापन, संगणक, मार्केटिंग या सर्वांचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते.
BBA Course Degree Info in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia
Related posts
NDA Information in Marathi | National Defence Academy Mahiti एन.डी.ए.
IPS Officer Information in Marathi | आय पी एस ऑफिसर माहिती |
IAS Officer Information in Marathi | आय ए एस ऑफिसर माहिती
Indian Navy Information in Marathi | भारतीय नौदलाची माहिती |
Indian Airforce Information in Marathi | भारतीय वायुदल माहिती |
NEET Exam Information in Marathi Language | नीट परीक्षेची माहिती
IIT Information in Marathi || आय आय टी माहिती