Babul Tree Information in Marathi
बाभूळ माहिती
- कुठेही, कसेही उगवणारे बाभूळ हे झाड म्हणजे survival of fittest ह्या उक्तीचे ज्वलंत उदाहरण आहे. संस्कृत मध्ये ह्याला दीर्घकंटका, हिंदीत बबूल आणि इंग्लीश मध्ये acacia असे म्हणतात. हे झाड वनस्पतिजाती मध्ये मिमोसी ह्या कुळात मोडणारे आणि acacia arabika ह्या नावाने ओळखले जाते.
- बाभूळ हे रेताड जमिनीत उगवणारे झाड आहे. त्याला समशीतोष्ण हवामान, कोरडी हवा, १५-२८ डिग्री सेल्सियस आणि २५० – १५०० मी.मी. वार्षिक पाऊस पुरतो. दुष्काळी किंवा कमी पावसाने बाष्पीभवन फार होऊ नये म्हणून याची पाने खात्यांमध्ये रूपांतरित होतात.
- बाभूळ सर्व भारतात कुठेही उगवतो. तो लावावा लागत नाही. हे झाड ‘झुडूप’ या वर्गामध्ये येते. म्हणून ते मध्यम उंचीचे असते. पण फांद्या आणि पानांचा पसारा खूप वाढतो. पाने अतिशय छोटी असतात आणि एका डहाळीवर खूप पाने येतात. फुले ग्रीष्म ऋतुत फुलतात. ती गोलाकार गुच्छाच्या स्वरूपात असतात. आणि शरदात त्याला मळकट पांढऱ्या रंगाच्या चपट्या शेंगांसारखे फळे लागतात. एका शेंगेत ८ ते १२ चपट्या बिया असतात. बाभळीच्या घनदाट पानांच्या पसाऱ्यामुळे आणि काट्यांमुळे त्याच्यावर खूप पक्षी सुरक्षेसाठी घरटे बांधतात.
- ‘अति परिचयात अवज्ञा’ या न्यायाने सुलभतेने हाताशी असलेल्या ह्या वृक्षाबद्दल कोणीही उपयोगाच्या दृष्टीने फारसा विचार करीत नाहीत. फक्त जळणासाठी त्याची प्रचंड वृक्ष तोड होते. आपल्या आयुर्वेदाने याचे महत्व ओळखले होते आणि त्या प्रमाणे औषधी ही बनविल्या आहेत, पण सर्व सामान्य जनतेला त्याचे मोल नाही.
बाभळीचे उपयोग :
- बाभळीत टॅनिन नावाचे द्रव्य असते ज्याने रोग प्रतिबंधक औषधे तयार करता येतात. बाभळीचे लाकूड मुबलक मिळत असल्याने ते स्वस्त असते; म्हणून फर्निचर, इमारतीचे बांधकाम, हत्यारं (टूल्स) यांचे दांडे आणि बोटीचे लंबर बनवण्यास त्याचा उपयोग होतो.
- दुसरा आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे बाभळीवर येणार गोंड किंवा डिंक. झाडातून निघणारा पिवळटसार रंगाचा द्राव वाळला कि त्याचे अंड्यासारखे पिवळसर डिंक तयार होते. ते पाण्यात विरघळणारे असते. डिंकामध्ये ५२ टक्के कॅल्शियम आणि २० टक्के मॅग्नेशियम असते.
- भारतीय बाभळीचा डिंक औषध तसेच चिकटवण्यासाठी वापरतात. तसेच थंडीमध्ये बदामाबरोबर खाण्यासाठी म्हणून सुद्धा उपयोग होतो. तसेच तुपात तळून खाल्ल्याने पण शक्ती मिळते. औषधी डिंक रक्तस्राव बंद करण्यासाठी पोटात घेण्याच्या औषधांमध्ये उपयोगात आणतात. त्यामुळे रक्त अतिसार व मासिक पाळी याच्यावर उपाय होतो.
- बाभळीचे इतर अंग जसे फुले, फळे, फांद्या इत्यादी सर्व प्रकार दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्यांसाठी वापरतात. म्हणून बाभळी ही टाकाऊ नसून टिकाऊ आहे. टूथपेस्ट मध्ये पण बाभळीचा उपयोग केला जातो. असा हा बाभळीचा वृक्ष काटेरी, पण प्रेमळ.
मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे माझी। मुत्ताई फाउडेशन। नावाने(NGO) सस्थापन केलेली आहे सध्या जैवविविधता या विषयावर संस्थेचे PBR (लोक जैवविविधता नोंद वही) तयार करण्याचे काम हिगोली जिल्ह्यात. चालू आहे आपली माहिती अतिशय उपयुक्त वाटली धन्यवाद.
Khhoopch chhan mahit milali