Anjali Bhagwat Information in Marathi
अंजली भागवत माहिती :
- अंजली भागवत यांना तर आपण सर्व ओळखतोच. एक भारतीय नेमबाज जिने भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये पसरवले, क्रीडा क्षेत्रातील एक मराठमोळं नाव, अतिशय हुशार आणि शिस्तबद्ध, कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कुठेही कमी नाहीत हे तिने दाखवून दिले.
- जगातील पहिल्या क्रमांकाची नेमबाज म्हणून ओळख मिळवणाऱ्या अंजली भागवतचा बालपणापासून ते नेमबाज बनण्यापर्यंतचा सगळा प्रवास आज आपण बघणार आहोत
सुरवातीचे आयुष्य :
- अंजली यांचे पूर्वाश्रमीचे म्हणजेच माहेरचे नाव अंजली रमाकांत वेदपाठक असे आहे, त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६९ मध्ये मुंबई येथे झाला.
- राजा शिवाजी या माटुंगा येथील शाळेमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कीर्ती महाविद्यालयामधून बी कॉम ची पदवी घेतली. शाळेत असल्यापासूनच त्यांना खेळामध्ये अतिशय रुची होती.
- कॉलेज मध्ये असताना त्यांनी NCC (एन सी सी) मध्ये भाग घेतला, तेव्हा रायफल शूटिंग हा त्यांच्या प्रशिक्षणामध्ये एक भाग होता. त्या सांगतात कि तेव्हाच त्यांच्या मनामध्ये रायफल शूटिंग बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि यामध्येच करियर करायचे असे त्यांनी ठरवले व त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु केले. त्यांच्या या निश्चयामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले असे त्या सांगतात. वरळी शूटिंग रेंज मध्ये त्यांनी सरावास सुरवात केली.
- अंजली याना २ भावंडे आहेत, सन २००० मध्ये त्यांनी श्री. मंदार भागवत यांच्याशी विवाह केला आणि मग त्या अंजली भागवत म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मंदार हे एक व्यावसायिक इंजिनिअर आहेत.
- लग्नानंतरचा काळ खरेतर त्यांच्या साठी अत्यंत महत्वाचा होता, यामध्ये त्यांच्या पतीने त्यांना संपूर्ण साथ दिली, त्यांच्या स्पर्धांचे वेळापत्रक ठेवणे, रेंजची काळजी घेणे, रेंज तयार करणे त्याच्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमवणे असे एक ना अनेक गोष्टी मंदार अंजलीसाठी करत असतात.
- मंदार यांनी लग्नानंतर घरातच अंजली यांना सराव करता यावा यासाठी एक छोटी शूटिंग रेंज उभी केली होती. मंदार आणि अंजली यांना आराध्य नावाचा एक मुलगादेखील आहे.
- क्रीडा क्षेत्रातील उपलब्धीच्या अभावी त्यांनी २००६ मध्ये मुंबई वरून पुणे येथे स्थलांतर केले. एक गोष्ट त्या नेहमी सांगतात कि त्या खूपच भाग्यवान आहेत त्यांना जो पाठिंबा माहेरी त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाला तो त्यांना सासरीपण नेहमी मिळत आला आहे.
प्रशिक्षक आणि प्रवास :
- प्रत्येक खेळाडूसाठी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक अत्यंत गरजेचा असतो, त्याचप्रमाणे अंजलीचे देखील आहे. श्री.विश्वराज बाम हे तिचे प्रशिक्षक आणि गॉडफादर, खेळासाठी लागणारा मानसिक कणखरपणाचे धडे यांच्याकडूनच अंजलीला मिळाले. तसेच या खेळासाठी लागणारे संपूर्ण टेक्निकल ज्ञान तिला श्री. संजय चक्रवर्ती यांच्याकडून मिळाले आणि त्यामुळेच ती नेहमी अव्वलस्थानी राहिली.
- तिच्या यशामध्ये मुंबई रायफल असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांचा खूप मोठा वाटा आहे असे त्यांना वाटते यांच्या प्रयत्नांमुळेच अंजली आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचली.
- ११९५ मध्ये त्यांनी प्रथमच आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. रायफल शूटिंगमध्ये संपूर्ण तयार होण्यासाठी तिला ५ वर्षांचा कालावधी लागला आणि नंतर १९९८ मध्ये तिने पहिल्यांदा राष्ट्रीय चॅम्पिअनशिपमध्ये सहभाग घेतला आणि तेव्हा ती महाराष्ट्र संघाकडून खेळत होती. या स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक पटकावले होते.
- १९९९ मध्ये लॅझलो स्झुस्कॅक हे भारताच्या नेमबाजी संघाचे प्रशिक्षक होते, त्यांच्या अंतर्गत तिने तत्कालीन प्रशिक्षण घेतले. २००८ साली स्टॅनिस्लाव लापीडस यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले आणि अंजली यांनी काही काळ त्यांच्याकडून देखील प्रशिक्षण घेतले. नेमबाजीचे पहिले किट त्यांना १९९३ मध्ये अभिनेता नाना पाटेकर यांनी दिले होते.
- हिंदुजा फॉउंडेशन, मित्तल चॅम्पियन ट्रस्ट, हुंदाई कोर्पोरेशन यांनी आतापर्यन्त अंजली यांना आपला पाठिंबा दिला आहे आणि स्पॉन्सर देखील केले आहे.
स्पर्धा आणि पदके :
- आतापर्यंत अंजली यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५५ सुवर्ण, ३५ रौप्य व १६ कांस्यपदके जिंकली आहेत.
- अंजली वेदपाठक – भागवत यांना सन २००० साली भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असणाऱ्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच राजीव गान्धी खेळरत्न पुरस्काराने देखील त्यांना याच वर्षी सन्मानित केले गेले.
- ‘हिसा स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर,’ ‘हिसा शूटर ऑफ द इयर,’ ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार,’ ‘श्री शिव छत्रपती पुरस्कार,’ ‘टाईम्स ग्रुप महाराष्ट्र शान’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. अनेक नवीन रेकॉर्ड देखील त्यांनी त्यांच्या नावावर केलेले आहेत.
- १९९९ मध्ये ऑकलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये त्यांनी ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटकावले, भारतासाठी पदके आणि विश्वचषक जिंकणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे.
- २००० साली सिडनी येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मध्ये त्या अव्वल ठरल्या. जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाच्या नेमबाज ठरल्या. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स नावाने ओळखली जाणारी आणि ऑलम्पिक पेक्षा जास्त महत्व असणारी हि चॅम्पियनशिप त्यांनी २००२ मध्ये जिंकली. त्यांच्या आयुष्यामधला हा सर्वोच्च काळ होता अन चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स जिंकणारी ती अद्यापही एकमेव भारतीय आहे.
- अंजली आपल्या एअर रायफल साठी जर्मन बनावटीच्या फेनवर्कबाऊचा(Feinwerkbau)वापर करतात, १० मीटर साठी देखील त्यांना हेच आवडते, तर ५० मीटर साठी त्या .22 वाल्थरचा(Walther) वापर करतात.
- अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार अशा काही पुरस्कारांच्या निवड समितीवर देखील त्यांची निवड झालेली आहे.
- २०१६ साली त्यांनी आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून ऑलिम्पिकचे समालोचन केले होते.
सामाजिक आयुष्य :
- अंजली या एक उत्तम खेळाडू आहेत यामध्ये काहीच संशय नाही परंतु त्या एक अत्यंत चांगल्या व्यक्ती देखील आहेत.
- नाटक सिनेमा फारसे आवडत नाहीत असे त्या म्हणतात परंतु काही निवडक हिंदी किंवा मराठी सिनेमे बघायला त्यांना आवडते. बोक्या सातबंडे या मराठी सिनेमामध्ये त्यांनी पाहुणे कलाकाराची भूमिका केलेली आहे.
- त्यांना विचारल्यास त्या सांगतात कि पी. टी. उषा या त्यांच्या आवडत्या खेळाडू आहेत.
- त्या मासिक किंवा वृत्तपत्रासाठी लेख लिहीत असतात, तसेच त्यांनी २ वेळा रॅम्पवॉक देखील केलेला आहे. त्यांना क्रिकेट आणि टेनिस दोन्ही आवडते, अनेक सामाजिक कार्यातून त्या खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात.
- आईवडिलांसाठी त्या खास सांगतात कि आपली मुले आजकाल सतत टीव्ही बघत असतात अशा वेळेस त्यांना खेळाकडे वळवणे आणि आवड निर्माण करणे हि आपली जबाबदारी आहे.