Agriculture Information in Marathi
शेती विषयक मराठी माहिती
महाराष्ट्रातील शेती, तिचे प्रकार आणि तंत्र :
- महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे, श्रीमंत आणि सर्वात प्रगत राज्य आहे. ते कृषि, माहिती व तंत्रज्ञान, वैज्ञानिक,कला, क्रीडा, साहित्य,शास्त्र,आर्थिक तसेच औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे.सर्वांगीण प्रगती हा महाराष्ट्राचा अजेंडा आहे आणि तो उंचावत जात आहे. महाराष्ट्राचा GDP २८ लाख कोटी रूपये इतका आहे जो इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.
- महाराष्ट्राच्या सीमा इतर ५ राज्यांनी वेढलेल्या आहेत. ती म्हणजे मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि छत्तीसगढ. महाराष्ट्राची भौगोलिक रचना इतर राज्यांच्या तुलनेत विविधतेने नटलेली आहे. कुठे ही नाही इतकी नैसर्गिक संपत्ति महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा पश्चिम भाग ७२० किलोमीटर लांब आणि ५० ते ६० किलोमीटर रुंद अशी किनार पट्टी आहे. मध्ये सह्याद्रीच्या रांगा आहेत. आणि त्यापुढे दख्खन चे पठार आहे. [western ghat] सह्याद्री मधून महाराष्ट्राला जल संजीवनी देणाऱ्या नद्या उगम पावतात. त्या म्हणजे गोदावरी, कृष्णा,तापी,भीमा,कोयना आणि बाणगंगा. त्यापैकी कृष्णा पूर्व वाहिनी असून बाकी सर्व पश्चिम वाहिनी आहेत. महाराष्ट्राचा ४५% भाग शहरीकरण झालेला आहे. तरीही खेडे आणि गाव हे मुख्यत: शेतीवरच अवलंबून आहेत.
विविध रंगी नटलेले हवामान :
- उष्ण कटिबंधात असल्याने महाराष्ट्रात उष्ण किंवा समशीतोष्ण हवामान आहे. पश्चिमेला समुद्र किनारा असल्याने तेथील हवा उष्ण व दमट आहे तर वरती दख्खनच्या पठारावर कोरडी आणि थंड हवा आहे. दक्षिण पश्चिम वाऱ्यामुळे कोकणात तुफान पाऊस पडतो.सरासरी २००cm इतका असतो.तर पठारावर ५०cm इतका असतो. उन्हाळा कडक असला तरी थंडीत पण १२ अंश ते ३४ अंश इतके तपमान असते. पण नाशिक,महाबळेश्वर, पुणे ह्या सारख्या जिल्ह्यांमध्ये ते ४ अंश ते ६ अंश इतके घसरते. त्यामुळे तेथे थंडीत पण पाऊस पडतो आणि गारा पण पडतात. पावसाळा जुन ते सप्टेंबर असतो आणि उन्हाळा मार्च ते जून पर्यंत असतो.
- विविध हवामानामुळे महाराष्ट्रात अतिशय वैविध्यपूर्ण धान्य आणि फळे पिकतात. महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने धान्य शेती, फळबागा, फुलांची शेती अशा सर्वांगीण शेतीचा प्रयोग महाराष्ट्रात झालेला आहे. त्यातही कोकण आणि घाटमाथ्यावर सारखे पीक नसते. भारतातील जवळजवळ सर्व प्रकारची पिके एकट्या महाराष्ट्रात उगवतात. आपण कोकण आणि घाटमाथा ह्या प्रत्येक ठिकाणच्या पिकांचा आढावा घेऊया.
कोकणातील शेती आणि तिचा विकास :
- ७२० किलोमीटर इतका विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असल्याने कोकण पाचू सारखे हिरवेगार दिसते. समुद्राजवळ नारळी, पोफळी, सुपारी ह्यांच्या बागा आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक केंद्रातून ५ वर्षात फळ देणाऱ्या मलबारी नारळ लावल्याने नारळांचे भरपूर उत्पन्न मिळते. तेथून संपूर्ण भारतात नारळ पुरविला जातो. तसेच सुपारी, ताडी, ताडगोळे आणि ह्या झाडांचे शोभेच्या वस्तु बनविण्यासाठी उपयोग केला जातो. वरच्या कोकणात दमट हवा आणि भरपूर पावसामुळे आंब्याचे उन्हाळ्यात भरपूर उत्पन्न मिळते. येथील हापूस आंबा हे एकूण निर्यातीतील ९० टक्के भाग ठरते. आंब्याबरोबर काजू,फणस, कोकम, जांभळे इत्यादि फळेपण खूप विकली जातात. येथे भातशेती हे मुख्य धान्य आहे आणि ते येथील लोकांना पुरेल इतकेच पिकते. थोडी नागली, वरई आणि चवळी पण पिकते. कोकण शेती विकासासाठी कोकण कृषि विद्यापीठ स्थापन झाले आहे. तसेच भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. त्यामुळे येथील शेतकरी नवे नवे प्रयोग करून उत्पन्न वाढवित आहेत. त्याच बरोबर समुद्र किनारा असल्याने मत्स्य शेती पण बहरते आहे.
घाटमाथ्यावरील शेती आणि तिचा विकास :
- कोकणापेक्षा सखल भाग, कोरडी हवा आणि योग्य प्रमाणात पाऊस असल्याने आणि नद्यांच्या पाण्यामुळे घाटमाथ्यावर मुबलक शेती उत्पन्न येते. घाटमाथ्यावर भात,ज्वारी,बाजरी,गहू, ही धान्ये आणि सूर्यफूल, सोयाबिन, शेंगदाणा, करडई अशा तेलबिया तसेच उस ,कापूस, हळद, कांदे, टोमॅटो अशी नगदी पिके पण घेतली जातात. फळांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. नाशिकची द्राक्षे आणि त्या पासून वाईन ही निर्यातीचे मुख्य साधन आहे. त्यात संशोधनाने सिडलेस द्राक्षे ही खूप निर्यात होतात. जळगावची केळी,नागपूरची संत्री ही पण खूप उत्पन्न देणारी फळे आहेत. निर्यातीसाठी सरकार तर्फे फळांवर प्रक्रिया करून [irradiation] ते निर्याती योग्य बनविण्याची केंद्रे सुरू केलेली आहेत. त्यामुळे नाशिवंत फळे चांगली टिकून निर्यात करता येतात.
शेतीसाठी पाणी पुरवठा :
- जरी शेती पावसावर अवलंबून असली तरी जल सिंचनामुळे शेतीत खूप उत्पन्न काढता येते. म्हणून जवळ जवळ 33500 चौ.किलोमीटर इतक्या भू भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्याच बरोबर महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त धरणे बांधलेली आहेत आणि शेत तळे, बोअरवेल, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ह्या आवाहनामुळे आता पाण्याचे संकट दूर झाले आहे. ठिबक सिंचन पद्धतीमुळे खूप फायदा होत आहे. दुष्काळी जिल्हे ओळखून त्यांच्यासाठी नवीन योजना आखल्या जात आहेत.
सरकारचा सहभाग :
- आज महाराष्ट्र उस, द्राक्षे, आंबे ह्या नगदी पिकांमुळे देशात आघाडीवर आहे. साखर कारखाने, वाईन उद्योग ह्यामुळे खूप लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. पण हे चुटकी सरशी होत नाही. सरकारने यासाठी ठोस पावले उचलली आहेत म्हणून आज हे चित्र दिसत आहे. १९६५-७० ह्या काळात हरित क्रांतीचा उपक्रम राबवण्यात आला आणि पंच वार्षिक योजनांमधून योजनाबद्ध रीतीने हा विकास करण्यात आला. त्यात अल्प भू धारक शेतकऱ्यांसाठी कमी दराने किंवा बिन व्याजी कर्ज, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषि विद्यापीठांची स्थापना, सुधारित जातींसाठी संशोधन केंद्र, शेतमालाला भाव मिळावा म्हणून APMC ह्या मार्केटची स्थापना, विहीर, ट्रॅक्टर, इत्यादी साठी अल्प दराने कर्ज अशा अनेक सुधारणा केल्या गेल्या. तसेच Agri Export zone ची स्थापना करून निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले. Eurogap, barcoding, residue monitoring अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. बी बियाणे ह्यासाठी कंपनी स्थापन केली आणि उत्कृष्ट जातीच्या संकरित बियांची अल्प दरात विक्री केली. शेतीबरोबर जोड धंदे विकसित व्हावे म्हणून गो पालन ,पशु पालन, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय ह्यासाठी योजना आखल्या व प्रशिक्षणाची सोय केली.
अशा तऱ्हेने देवाने दिलेल्या ह्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्राने योजनाबद्ध विकासामुळे दुधात साखर पडली आणि शेतीमुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला.
Sheti Vishayak Mahiti in Marathi Wikipedia
Organic Farming in Marathi Language Wiki
Related posts
Sheli Palan Mahiti Marathi | Goat Farming Information, Bakri Palan Project
Sweet Potato Information in Marathi, Ratale Recipe, Nutrition, Benefits
Rice Information in Marathi | Rice Crop & Farming, Recipes
Laghu Udyog List in Marathi, Maharashtra Laghu Udyog Information
Pineapple Information in Marathi | Benefits & Fayde Mahiti अननस
all information
I am small farmer working 3 acres land I am interested dragon fruit technology please