96 Kuli Maratha Information in Marathi
९६ कुळी मराठा इतिहास : History
९६ कुळी मराठा – एक लढाऊ क्षत्रिय समाज
महाराष्ट्रातील कडवे लढवय्ये म्हणून मराठा जातीतील लोकांची ओळख आहे. चार वर्णांपैकी क्षत्रिय समाज जो महाराष्ट्रात आहे त्यांना मराठे म्हणतात. साऱ्या भारतात मात्र, मराठी बोलणारे म्हणजे मराठे असे म्हणतात. परंतु मराठे ह्या नावाला मोठा इतिहास आहे. हे मुळच्या राजपूत वंशाचे महाराष्ट्रातील क्षत्रिय लोक आहेत. त्यांची घराणी उत्तर प्रदेश, राजस्थान अगदी रामाच्या वंशापर्यंत नाळ जोडलेली आहे. महर्षि व्यासांनी वामदेव आणि शुक ह्यांच्या मदतीने लढणारे क्षत्रिय समाजाची यादी तयार केली. महाभारताच्या संहारक युद्धानंतर धर्म राखण्यासाठी शिल्लक राहिलेल्या राजांच्या यादीमध्ये ह्यांची पण नावे आली. त्यात ९६ कुळे प्रमुख होती.
९६ Kuli Maratha Surname List :
हि ९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे-
१. यादव / जाधव
२. सोलंकी/ सोळंके
३. चव्हाण
४. मोरे
५. भोसले
ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत. ह्यांच्या आडनावांचा शोध घेतलेला आहे. जवळ जवळ ३४८७ आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला ९६ कुळी समजतात : अहिर, भाटी, भोसले, चालुक्य, चव्हाण, चंदेल, गायकवाड, गुज्जर, कदंबस, काकतिया कालचुरी, हेहेया, मराठा, मौर्य {मोरे}, नाला, निकुंब, निकम, पल्लव, परिहार, पवार पाल्मर,राष्ट्रकुट, शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन, सिंदिया, शिंदे, सिलहारा, सिसोदिया साळुंके, ठाकूर, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी.
९६ कुळी मराठ्यांची एक वेगळी अशी परंपरा आहे. ह्यांच्यामध्ये लग्नासाठी हे कुळ महत्वाचे असते. त्यामध्ये काही ठराविक आडनावाच्या मराठ्यांचे दुसऱ्या ठराविक आडनावाच्या मराठ्यांशी रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. त्यामुळे लग्न ठरविताना आडनाव आणि गाव महत्वाचे असते.
मराठी आणि कुणबी :-
काही वेळा मराठे आणि कुणबी समाजामध्ये आडनाव साधर्म्यामुळे गल्लत होते. पण कुणबी म्हणजे ९६ कुळी मराठा असतातच असे नाही. लढणारे म्हणून ते क्षत्रिय आणि शेती करणारे ते कुणबी अशी वर्गवारी केली गेली. तरीही जातींच्या चार आश्रमातील वर्गवारीत ते उच्च वर्णीय म्हणून गणले जातात.
सतराव्या शतकात बरेच मराठे सरदार मोगलशाही आणि दक्षिणेतील पाच शाही राजांकडे सरदार होते आणि ते त्या मुस्लिम अंमलासाठी एकमेकांमध्ये लढून शौर्य वाया घालीत होते. शहाजी राजांच्या मनाला ते आवडत नव्हते. शहाजीँचे पुत्र शिवाजी महाराजांनी त्यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुरे केले. त्यांच्या मृत्युनंतर संभाजी, राजाराम आणि नामांकित मराठे सरदारांनी २७ वर्षे औरंगजेबाशी झुंज देऊन महाराष्ट्राला मोगलांच्या तावडीतून वाचवले आणि मोगलांचा दक्षिणेकडेचा मार्ग रोखला.
शिवाजी नही होते तो सबकी सुंता होती :-
कवी भूषण ह्यांनी महाराजांची थोरवी गाताना हे सत्य सांगितले. त्यांचे सरदार फक्त एव्हड्या वरच थांबले नाही तर उत्तर आणि दक्षिणेकडे त्यांनी राज्य विस्तारले. त्यांचे अजून त्या प्रदेशांवर अधिराज्य आहे. ते म्हणजे- बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, देवासचे पवार, नागपूर चे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे. पानीपतच्या लढाईत मराठ्यांनीच आघाडीवर राहून प्रखर तोंड दिले होते ह्यावर अहमदशहा अब्दालीने त्यांचे कौतुक केले होते. दत्ताजी शिंदेंचे बचेंगे तो और भी लडेंगे हे उद्गार अजरामर ठरले.
ब्रिटीश राजवटीत मुंबईला मराठे लोकांची पलटण होती त्याला जंगी पलटण म्हणत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये हि मराठ्यांनी शौर्य गाजविले. कॉंग्रेस मध्ये त्यांनी दबदबा निर्माण केला आणि त्यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त मुख्यमंत्री ९६ कुळी मराठेच होते. त्यांचे सहकार क्षेत्रातील काम, साखर कारखाने, शिक्षण संस्था इत्यादी मुळे त्यांच्या हातात राज्य कारभाराच्या नाड्या राहिल्या. स्थानिक स्वराज्य संस्था, पत पेढ्या ह्यापण त्यांच्याच हातात राहिल्या. जिल्हा सहकारी बँकांवर पण त्यांचेच वर्चस्व राहिले.
मराठ्यांची एकजूट :
स्वातंत्र्यानंतर मराठे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण असे समीकरण झाले. ते मोठ्या अधिकारावर आणि महत्त्वाच्या राजकीय पदांवर असल्याने महाराष्ट्रात त्यांचेच वर्चस्व झाले. काँग्रेसच्या व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली त्यांनी ६७ वर्षे महाराष्ट्रात राज्य केले. त्याबरोबर सत्ता भोगण्याची सवय पण लागली. पण भाजप च्या २०१४ च्या निवडणुकीच्या यशामुळे त्यांच्या हातून सत्ता गेली. ते विरोधक झाले. अशातच एक अप्रिय घटना घडली.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ ला आजीकडे सायकल वरून जाणाऱ्या १५ वर्षाच्या एका मराठा मुलीला चार इसमांनी पकडून शेतात तिच्यावर बलात्कार केला ती कबड्डीपटू असल्याने खूप प्रतिकार केला म्हणून तिचे हाल हाल करून तिला मारून टाकले. ह्या मुलीची ती मुले छेड काढीत होते आणि शेवटी त्यांनी बदला घेतला. घटना निश्चितच माणुसकीला काळिमा आणणारी होती. त्यावरून दिल्लीला झालेल्या निर्भयाची आठवण व्हावी अशी. जन प्रक्षोभ झाला आणि जेंव्हा गुन्हेगारांना पकडले गेले तेंव्हा आणखीच आगडोंब उसळला. कारण ती मुले म्हणजे जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे दलित वस्तीतील रहिवासी होते. हा परिसर अहमदनगर आणि मराठवाडा ह्या भागात असून तेथे दलित जन संख्येचे बाहुल्य आहे.
Maratha Kranti Morcha :
लवकरच…राजकारणी लोकांना सरकारला पेचात पकडण्यासाठी मुद्दा मिळाला. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला म्हणून सर्व थरातील लोकात संतापाची लाट उसळली आणि त्याचे रूपांतर सरकार विरोधी मोर्चे काढण्यात झाले. संपूर्ण मराठा जात एक झाली आणि एक मराठा लाख मराठा ह्या घोषाने बरोबर तब्बल ५८ मोर्चे काढले गेले. मुंबई, मुंबई-नाशिक महामार्ग, पुणे, नागपूर, अहमदनगर इत्यादी ठिकाणी रस्ते जाम झाले. कामकाज थंडावले. शाळांना सुट्टी द्यावी लागली. सरकार नीट तपास करीत नाही म्हणून सरकारवर टीका झाली. म्हणून ही केस गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आली.
सर्व राजकारणी कोपर्डीला भेट द्यायला लागले. मुख्यमंत्र्यांनी तिच्या कुटुंबाला भेट देऊन गुन्हेगारांना क्षमा केली जाणार नाही असे आश्वासन दिले आणि विशेष सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम ह्यांना सरकार तर्फे केस चालवण्यास दिली. ह्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतील कामकाजात होऊन ते बंद पाडण्यात आले. घटनेला जातीय रंग लागल्यामुळे सगळीकडे अशांतता निर्माण झाली. गुन्हेगारांच्या फाशीची मागणी जोर धरू लागली. कोर्टात नेताना व आणताना गुन्हेगारांवर हल्ले झाले.
वकील उज्ज्वल निकम ह्यांनी अतिशय कुशलतेने सर्व केस चालवून दोषींना फाशीची शिक्षा देवविली. आणि वातावरण निवळले. ह्या सर्व प्रकरणात पिडीत मुलीच्या आईचे उद्गार बोलके आहेत, ती म्हणाली “माझ्या मुलीचा जीव गेला पण मराठा समाज एकत्र आला”!!
मराठा समाजात सुद्धा कोकणी मराठा आणि घाटी मराठा असे दोन भाग पडले. कोकणी मराठ्यांमध्ये पण आरमारी मराठा, मराठा कोळी असे मराठा आणि कुणबी ह्यांच्यासारखे भाग पडले. जितके जितके जाती मध्ये भाग पडत गेले तसे तसे वाद निर्माण होत गेले. आज मराठे पण आरक्षण मागत आहेत. सर्व भारतात ही लढाऊ जमात आरक्षणासाठी मैदानात उतरली आहे. गुजरातेत पाटीदार, उत्तर प्रदेशात कूर्मी, दक्षिणे कडे नायडू ह्या सगळ्या क्षत्रिय समाजाच्या पोटजाती आहेत. उच्च वर्णीय असूनही त्यांना पण आरक्षण हवे आहे कारण आता वर्णावर अधिष्ठित कामे राहिलेली नाहीत. आता नोकरी हा एकच अर्थार्जनाचा स्रोत राहिलेला आहे. तरीही भारतीय सैन्यात मराठे अजूनही आदरणीय स्थान मिळवून आहेत. ब्रिटीशांच्या काळापासून निर्माण झालेली मराठा लाइफ इन्फंट्री ही आपली सैन्याची शाखा नामांकित आहे. ले.ज. एस.पी.पी. थोरात हे त्यातील आदरणीय नाव.
आशा करूया की ९६ कुळी मराठे महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करून देतील.
चांगली,
माहीती, कोणत्याही जातीकडे,
न झुकलेली, खरी वाटते.
Thanks. Like it.
खूपच चांगली माहिती आहे, धन्यवाद.