Lata Mangeshkar Information in Marathi
गान कोकिळा लता मंगेशकर मराठी माहिती
लता मंगेशकर : एक लीजंड एक आख्यायिका !
- सचिन तेंडुलकरची मानलेली आई, दिलीप कुमारची मानलेली बहीण आणि सर्व संगीतकारांची लता दीदी. कुठल्याही नावाने ओळखण्यापेक्षा ती लता आहे हीच ओळख पुरेशी होते. जसे कुठल्याही क्रिकेटियर बद्दल सांगताना सचिन हे परिमाण ठरवलं जाते तसे कुठल्याही गायिकेबद्दल बोलताना तिची लता दीदींच्या तुलनेत योग्यता ठरवली जाते. तिचा स्वर्गीय आवाज हे भारतीयांच्या कानात ठाम बसलेले आहे. कोणाबद्दल हि सांगताना प्रति लता हुबेहूब लता असे म्हंटले जाते. पण लता ती लताच!
बालपणीच घराची जबाबदारी :
- २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदूरला गोमंतकीय मराठा घरात सुप्रसिद्ध गायक आणि नट दीनानाथ आणि माई उर्फ शेवन्तीबाई मंगेशकरांना हे कन्या रत्न झाले. लता पाच भावंडात सगळ्यात मोठी! नंतर आशा,उषा, मीना आणि हृदयनाथ ही भावंडे!
- दीदींचे खरे नाव हेमा ठेवले होते पण दीनानाथांच्या भावबंधन नाटकातील लतिका ह्या नावावरून त्यांना लता म्हणायला लागले. वडील उत्तम गायक असल्याने लताला पण गायन येत होते. लता शाळेत इतर मुलीना शिकवायला लागली म्हणून बाई ओरडल्या आणि नंतर लता शाळेत गेली नाही.
- त्यातच तिच्या १३व्या वर्षी दीनानाथांचा देहांत झाला आणि मोठी असल्याने घराची जबाबदारी त्याच्यावर येऊन पाडली. लताला मास्टर विनायक यांनी मदत करून गाण्याचे काम मिळवून दिले आणि अशा रीतीने तिचा गायनाचा प्रवास सुरु झाला.
- मास्टर विनायक ह्यांच्या नवयुग फिल्म मधील “पहिली मंगळागौर” ह्या सिनेमात तिने काम केले आणि गाणे पण म्हंटले. मंगेशकर कुटुंब काम धंद्यासाठी मुंबईला आले. लताने उस्ताद अमर आली खा ह्यांच्याकडे गाणे शिकायला सुरुवात केली. मा. विनायक ह्यांनी वसंत देसाई ह्यांच्याशी लताची ओळख करून दिली. वसंत देसाई संगीतकार होते.
खडतर वाटचाल :
- त्यातच मा. विनायक पण वारले. लता ला आता स्वत:च हातपाय हलविणे भाग होते. तिला गुलाम हैदर ह्यांनी ‘मजबूर’ ह्या चित्रपटासाठी गाणी दिली. त्यांनीच भाकीत केले की भविष्यात सारे संगीतकार ह्या मुलीचे पाय धरायला येतील आणि तसेच झाले. पण तेंव्हा मात्र कसोटी होती. पैसे खूप कमी मिळत होते आणि घरात पाच जण अवलंबून होते. त्यामुळे लता आणि नंतर आशा ह्यांना ट्राम, बस चे भाडे परवडत नव्हते. त्या चालत पळत गोरेगाव च्या फिल्मीस्तान स्टुडीओत पोहोचायच्या.
- १९४८ मध्ये बऱ्याच मुसलमान गायिका पाकिस्तानात गेल्या नुरजहान त्यातलीच एक. सुरुवातीला लता त्यांची नक्कल करीत असे. नंतर तिने तिची स्वत:ची स्टाईल निर्माण केली. मात्र त्या दोघींची गाढ मैत्री होती. असे म्हणतात की भारत पाकिस्तान हद्दीवर नुरजहान पाकिस्तानात जाण्या आधी दोघी कडकडून भेटल्या रडल्या आणि मग ती गेली. उच्च कोटीच्या कलावंतांची हीच तर ओळख असते.
- “आयेगा आनेवाला “ हे महाल मधील खेमचंद प्रकाश ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी लताला अफाट प्रसिद्धी मिळाली. लताचा आवाज, मधुबालाचे सौंदर्य नी खेमचंद ह्यांचा साज त्यामुळे ते गाणे अमर झाले आणि मग लताने मागे वळून पहिलेच नाही. तथापि तिच्या गाण्यावर दिलीप कुमारने टिप्पणी केली की महाराष्ट्रीय मुलीना नीट उर्दू उच्चार येत नाही. त्याबरोबर तिने शफी नावाच्या उर्दू शिक्षकाची शिकवणी लावली. आणि परफेक्ट उर्दू उच्चार असलेली गाणी म्हटली. तिची हि परफेक्शन ची ओढ पाहून दिलीप कुमार खुष झाला आणि तिला बहीण मानले.
गान समृद्ध काळ : भरपूर यश आणि प्रसिद्धी
- लतादिदिनी १९५० नंतर अनिल विश्वास, शंकर जयकिशन ,नौशाद एस.डी.बर्मन,हुस्नलाल भगतराम, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सलील चौधरी, सी. रामचंद्र, मदन मोहन हेमंत कुमार आणि उषा खन्ना अशा अनेक संगीतकारांबरोबर आणि मधुबाला, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, माला सिन्हा, नूतन नर्गिस, मीना कुमारी अशा अनेक आघाडीच्या नात्यांना आवाज दिला.
- ह्यापैकी मधुबाला, वहिदा, मीना कुमारी, नर्गिस वगैरे नाट्य तर लताचाच आवाज पाहिजे असा हट्ट धरून बसायच्या आणि डायरेक्टर ला ते ऐकावे लागायचे. त्यांना असे वाटत होते की आपण संवाद नी गाणी ह्यांचा ताळमेळ फक्त लाटच करू शकेल. दिदीपण गाण्याच्या आधी विचारायच्या “कोण नटी आहे?” आणि त्याप्रमाणे हुबेहूब तिच्याच आवाजात गाणे म्हणायच्या. दीदी नकला पण खूप छान करायच्या. आपली गळ्यात जे स्वर तंतू असतात. त्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरींची संख्या (फ़्रिक़्वेनसी)लतादीदींच्या गळ्यात सर्वात जास्त आहेत.
- राज कपूर, लता, शंकर आणि जयकिशन ही राज कपूर च्या आर. के. फिल्म ची चौकडी होती, ज्यांनी एका पाठोपाठ उत्तमोत्तम सिनेमे दिले. आग, बरसात, संगम, इत्यादी. १९६० ते १९८० चा काळ संगीताचा सुवर्णयुग होते.
- एक संगीतकारांची पिढी जाऊन दुसरी आली पण त्यांचीही पसंती लता दीदीच होती. रोशन चा मुलगा राजेश रोशन, एस.डी.चा मुलगा आर. डी. बर्मन, सरदार मलिक चा मुलगा अनु मलिक इत्यादी. लतादीदी ध्रुव तार्यासारखी आढळ होती.
- ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गाण्याने प्रत्यक्ष पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रु आले होते. अनारकली आणि मुघल ए आझम ची गाणी तर आज च्या पिढीला पण वेड लावतात.
- १९४८ ते १९९८ इतका लांबचा हा सुरांचा प्रवास त्यांनी केला. लता दिदींनी प्रेमगीत, विरहगीत अवखळ गाणे,भक्तीगीत, कॅब्रे राष्ट्र भक्तीचे गीत, संस्कृत स्तोत्रे,अशी विविध गाणी म्हणून आपल्या आवाजांनी अजरामर केली आहेत.
- लता दीदींचे स्वर्गीय सूर साऱ्या सिनेमाक्षेत्रात दुमदुमले. ती सुंदर गाणी आजही स्मरणात आहेत आणि आपल्याला उदास किंवा एकटेपणात साथ देत आहेत. सचिन म्हणतो “मला दौर्यावर असताना दीदींची गाणी साथ देतात.”
अढळ स्थान आणि सन्मान :
- लताला आयेगा आनेवाली ह्या गाण्याला फिल्म फेयर अवॉर्ड मिळाले आणि अवॉर्ड ची मालिकाच सुरु झाली. 3 राष्ट्रीय सन्मान, १२ बंगाली सन्मान, 4 फिल्म फेयर अवॉर्ड, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, दादासाहेब फाळके अवॉर्ड, पद्म भूषण, राजीव गांधी सद्भावना अवॉर्ड, आणि सर्वात शेवटी भारत रत्न अवॉर्ड मिळाले. फ्रांस चे सन्मान मिळाले.
- इंग्लंड च्या रॉयल अल्बर्ट हॉल मध्ये त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
कृतार्थ पण कृतीशील जीवन :
- लता दीदी जरी आता निवृत्त आहेत तरी त्यांचे समाज कार्य चालू आहे. आपल्या वडीलांच्या नावाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बांधले आहे. त्यांनी संगीत पण दिले आहे आनंदघन ह्या नावाने चार मराठी सिनेमाना. तसेच भक्तीगीत स्वामी समर्थ महामंत्र ह्यांच्या अल्बम काढला आहे. आज ८८व्या वर्षी पण त्या कोल्हापूर, लंडन इथे फिरत आहेत.
- खरच, लता दीदींच्या रूपाने मिळालेली ही गंधर्व गानची देणगी देवाने अशीच आपल्या करिता सुरक्षित ठेवावी. त्यांना उदंड आयष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना.
Lata Mangeshkar Mahiti in Marathi Language Wiki / Nibandh Essay / Composition
Related posts
Adarsh Shinde Biography, Wiki, Songs, Wife, Bhim Geete
Mangesh Padgaonkar Information in Marathi : Kavita, Poems, Songs
Kusumagraj Information in Marathi | Kavita, Kusumagraj Poems & Books
Usha Mangeshkar Biography, Husband, Wiki, Marriage, Age, Songs
Ajay Gogavale Wiki, Caste, Biography, Family, Wife
Shrinidhi Ghatate Age, Biography, Boyfriend, Marriage, Wiki, Height
Juilee Joglekar Age, Biography, Husband, Marriage, Wiki Bio, Wedding
Vaishali Mhade Age, Biography, Husband, Marriage, Wiki, Bio, Wedding
Aparna Aparajit Biography, Husband, Age, Wiki Profile, Height
my fav singer