शाकाहारी बिर्याणी RECIPE / पाककृती
साहित्य :
१ बासमती तांदूळ ( निवडून, धुवून अर्धा तास पाण्यात भिजवलेला)……..१ कप
२ साजूक तूप ……………………………………………………………………..१/४ कप
३ तेल ……………………………………………………………………………..१/४ कप
४ दही ………………………………………………………………………………१/४ कप
५ जिरे ……………………………………………………………………………..१/२(चहाचा)चमचा
६ हळद पूड ……………………………………………………………………….१/४ (चहाचा)चमचा
७ हिरव्या मिरच्या(उभ्या चिरून)……………………………………………….२
८ धणे पूड …………………………………………………………………………१ (चहाचा)चमचा
९ लाल मिरची पूड ……………………………………………………………….१/४ (चहाचा)चमचा(कमी)
१० मीठ ……………………………………………………………………………….१/२(चहाचा)चमचा
११ केशर ………………………………………………………………………………२० -२५ काड्या
१२ काजू ……………………………………………………………………………..२ टेबल स्पून
१३ बेदाणे …………………………………………………………………………..१ टेबल स्पून
खडा / आक्खा मसाला :
१ दालचिनी ……………………………अर्धा इंच तुकडा
२ काळी इलायची ……………………२
३ जायफळ …………………………..२ चिमुट
४ तेज पत्ता ………………………..१
५ लवंगा ……………………………..४-५
६ हिरवी इलायची ……………………३
७ काळी मिरी ……………………….८-१०
भाज्या :
१ फ्लॉवर ची फुलं ……………………..१ कप
२ बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर ……………….२ टेबल स्पून
३ एका हिरव्या शिमला मिरचीचे १ इंची तुकडे
४ एका गाजराचे १ इंची तुकडे
५ १०- १२ फरसबी शेंगांचे १ इंची तुकडे
६ बटाटे ……………….२
७ पुदिन्याची पाने …………..१०-१२
पूर्व तयारी :
- भात शिजवणे
प्रथम एका पातेल्यात ५ कप पाणी उकळणे त्यात उकळताना तेज पत्ता, लवंगा,दालचिनी, सोललेली काळी इलायची घालावी .पाणी उकळू लागल्यावर त्यात तांदूळ घालून ते ८०% शिजवावे कारण ते नंतरही थोडे आणखी शिजवले जाणार आहेत.
- भाज्या परतणे
प्रथम एका पॅन मध्ये तेल तापवून त्यात बटाट्याचे उभे लांबट काप मोठ्या आंचेवर परतावे,
ब्राऊन रंग येऊ द्यावा त्यात फ्लोवर ची फुलं व गाजराचे तुकडे घालून १.५ मिनिट परतावे व काढून घ्यावे. आता शिमला मिरचीचे तुकडे मिनिट भर परतून काढून घ्यावे. सर्व भाज्या मऊ होता कामा नये.थोड्या कच्चटच ठेवाव्या.
आता भातातून राहिलेले पाणी भात चाळणीत ओतून काढून टाकावे. भात थंड होऊ द्यावा. त्यातील तेजपत्ता व इलाय्चीची साले काढून टाकावी .
भाज्या परतलेल्या पतेलीतच तेल गरम करून त्यात जिरे, मग आले लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद आणि धणेपूड घालून थोडे परतावे. बारीक चिरलेला टोमेटो ही या मसाल्यात घालावा व टोमेटो चांगला शिजून त्याचा लगदा होईपर्यंत शिजू द्यावे. त्यात मग मीठ, लाल तिखट आणि जाडसर दळलेला गरम मसाला (२ लवंगा, काळीमिरी, दालचिनी १ इंच व हिरवी इलायची ) घालावा.
मसाला परतल्यावर त्यात दही घालावे व थोडे परतावे. या तयार मसाल्यात परतलेल्या भाज्या घालाव्या व चांगल्या मिसाळाव्या. भाजी तयार व भात ही थंड झाला असेल.
- बिर्याणीला दम लावणे :
एक मोठे जड बुडाचे पातेले घ्यावे त्यात इ चमचा साजूक तूप घालावे त्यावर भाताची एक परत घालावी त्यावर तयार भाजी घालावी. भाजी सगळीकडे सारखी पसरावी. त्यावर उरलेला भात सगळीकडे व्यवस्थित पसरेल असा घालावा.
भातावर काजू व बेदाणे पसरावेत. या शिवाय बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिनाही घालावा. ४ चमचे तूप वरून सोडावे. २ चमचे दुधात भिजवलेले केशर वरून शिंपडावे. आता हे पातेलं घट्ट झाकून १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. प्रेशर कुकर मध्ये ही दम देता येईल.
वाढण्यापूर्वी झाकण उघडून बिर्याणी चांगली ढवळून घ्या. खायला देताना बरोबर दही ,चटणी वा रायता द्या.
Recipe / रेसिपी आवडली तर जरूर SHARE करा !