Pizza Recipe in Marathi , पिझ्झा
साहित्य :-
पिझ्झाचे पीठ बनविण्यासाठी:
- ३ कप गव्हाचे पीठ
- १ ते १.२५ कप पाणी
- १,५ छोटे चमचे इनस्टंट यीस्ट
- १/४ छोटा चमचा साखर
- १/२ छोटा चमचा मीठ
- २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल
पिझ्झाच्या टोमेटो सॉससाठी :
- ३ मोठे टोमेटो किंवा २ कप टोमेटोची चटणी
- ५ लसणाच्या पाकळ्या – बारीक चिरलेल्या
- १ छोटा चमचा बारीक चिरलेली तुळशीची ताजी पाने
- १ छोटा चमचा सुका ओरेगानो
- अर्धा छोटा चमचा काळी मिरी
- २ छोटा चमचा ऑलिव्ह तेल
- मीठ आणि काळी मिरी स्वादानुसार
पिझ्झाच्या सजावटीसाठी:
- ६ ते ८ छोटे चमचा पिझ्झा सॉस
- १ मध्यम कांदा – बारीक चौकोनी कापलेला
- १ मध्यम सिमला मिरची – बारीक चौकोनी कापलेली
- ७ कापलेले मशरूम्स – १ छोटा चमचा तेलात तळलेले
- ७-८ ऑलिव्ह – कापलेले
- किसलेले चीज आवश्यकतेनुसार
- थोडेसे ऑलिव्ह तेल
- गव्हाचे पीठ लाटण्यासाठी
How to make Pizza in Marathi ?
कृती
पिझ्झाचे पीठ बनविण्यासाठी:
- १ कप पाणी एका वाडग्यात घेऊन थोडेसे गरम करा. जास्त गरम करू नका, कोमट करा.
- नंतर त्यात १/४ छोटा चमचा साखर घाला आणि साखर विरघळेपर्यंत ढवळा.
- दीड छोटा चमचा इनस्टंट यीस्ट घाला.
- यीस्ट विरघळेपर्यंत ढवळा.
- १ कप गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि १/४ छोटा चमचा मीठ घाला आणि चांगले एकजीव करा.
- परत १ कप पीठ घाला आणि एकजीव करा.
- उरलेले एक कप पीठ टाका आणि चांगले एकजीव करा आणि नंतर मळा.
- पीठ लवचिक आणि मऊ होईपर्यंत मळले पाहिजे. गरज वाटल्यास अजून पाणी घालून मळा. कमीत कमी ८-९ मिनिटे तरी पीठ मळले पाहिजे.
- पिठाला थोडे ऑलिव्ह तेल लावून त्याच भांड्यात ठेवा.
- किचन टॉवेलने पीठ झाका आणि दोन तास आंबवण्यासाठी ठेवा.
- पीठ येईपर्यंत पिझ्झा सॉस तयार करा.
पिझ्झा सॉस तयार करणे:
- ३ टोमेटोची प्युरी मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये तयार करा.
- छोट्या भांड्यात ऑलिव्ह तेल गरम करा.
- लसूण बारीक कापा आणि मंद आचेवर १०-१२ सेकंद परता.
- टोमेटोची प्युरी घाला आणि ४-५ मिनिटे मंद आचेवर परता.
- टोमेटो शिजल्यानंतर, चिरलेली कोथिंबीर, सुका ओरगेनो, मीठ आणि मिरपूड टाका.
- ढवळा आणि १-२ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या.
- गरज वाटल्यास मीठ आणि मिरी अजून घाला.
- थंड झाल्यावर पिझ्झा सॉस वाडग्यात काढून ठेवा.
पिझ्झा बनवण्याची कृती:
- पीठ आल्यानंतर, पीठाचे दोन समान भाग करा. हलक्या हाताने प्रत्येक भाग मळून घ्या आणि १५-२० मिनिटे अजून झाकून ठेवा. दोन भागांचे ८-१० इंचाचे पिझ्झा बनवा.
- पिझ्झा बनविण्यासाठी १० इंचाच्या तव्याला ऑलिव्ह तेल लावा. तव्यावर थोडे गव्हाचे पीठ शिंपडा. ओव्हनला २५० डिग्री तापमानाला गरम करा.
- मळलेल्या पिठाचा एक भाग घ्या आणि त्याला थोडे पीठ लावा.
- लाटण्याच्या सहाय्याने ८-९ इंचाची पोळी लाटून घ्या.
- पिझ्झाची पोळी सावधानतेने उचलून तयार तव्यावर ठेवा.
- त्यावर थोडे ऑलिव्ह ठेवा.
- ३-४ मोठे चमचे पिझ्झा सॉस घेऊन पिझ्झावर एकसमान पसरा.
- ३ मोठे चमचे किसलेले चीज पसरा.
- तुमच्या पसंतीच्या टोपिंग्जने सजवा.
- सुक्या मिरचीचा कुट आणि सुका ओरेगेनो पसरवा.
- परत ५ मोठे चमचे किसलेले चीज पसरवा.
- बेकिंग ट्रे मधल्या खणात ठेवा आणि वरचा आणि खालचा हिटिंग रॉड चालू ठेवा. १२-१५ मिनिटे, चीज वितळेपर्यंत भाजू द्या. जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर अजून जास्त वेळ भाजू द्या. मायक्रोवेव्ह मध्ये, कन्वेक्शन मोडमध्ये भाजण्यासाठी, ओव्हन ज्या तापमानाला प्रथम गरम केला होता त्याच तापमानाला, म्हणजे – २०० डिग्री सेल्सियस तापमानाला ठेवावे.
- सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजल्यानंतर पिझ्झाचे तुकडे करून गरमागरम खायला द्या.