पाव भाजी RECIPE पाककृती
साहित्य
- बटाटे …………………………………………………..४ मध्यम
२ टोमॅटो …………………………………………………४ मध्यम
३ फूल गोभी (फ्लॉवर)………………………………….१/४ लहान
४ कांदे …………………………………………………..२ मध्यम
५ आले …………………………………………………..१ इंच
८ लसूण ………………………………………………….८ – १० पाकळ्या
९ हिरवी शिमला मिरची …………………………………..१ मध्यम
१० हिरव्या मिरच्या ………………………………………….३-४
११ ताजी कोथिंबीर ……………………………………………..१/४ कप
१२ सोललेले मटार ……………………………………………..१/४ कप
१३ लिंब ……………………………………………………………२
१४ तेल ………………………………………………………………३ टेबल स्पून (चमचे)
१५ मीठ ……………………………………………………………….चवीनुसार
१६ पाव भाजी मसाला ………………………………………………..१ १/२ टेबल स्पून (चमचे)
१७ बटर (लोणी)……………………………………………………………३ टेबल स्पून (चमचे)
१८ पाव …………………………………………………………………८
पूर्व तयारी
- प्रथम चरण
सर्व प्रथम बटाटे उकडून, थंड करून, सोलून घ्यावेत. फ्लॉवर धुवून किसून घ्यावा. कांदे सोलून, धुवून बारीक चिरून घ्यावेत. आले लसूण सोलून धुवून त्याची वाटून पेस्ट करावी.
- द्वितीय चरण
शिमला मिरची धुवून त्यातील बिया काढून टाकून ती बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे हिरव्या मिरचीला ही धुवून, देठ काढून बारीक चिरून घ्यावे.
- तृतीय चरण
ताजी कोथिंबीर निवडून, धुवून बारीक चिरून घ्यावी.मटार चे दाणे धुवून मिठाच्या पाण्यात मऊ उकडून घ्यावेत व नंतर पाण्यातून काढून हलके कुटून घ्यावेत. लिंबाच्या फोडी कराव्यात.
कृती
- प्रथम चरण
एका पॅन मध्ये तेल गरम करावे व त्यात ३/४ एव्हढे कांदे घालावेत. १/४ कांदे बाजूला ठेवावेत.
गुलाबी रंगावर परतल्यावर त्यात हिरव्या मिरच्या व आले लसूण पेस्ट घालावी.मिनिट भर परतावे.
- द्वितीय चरण
आता त्यात चिरलेल्या टॉमेटोंपैकी अर्धे घालावे व ३ ते ४ मिनिटे हलवत शिजू द्यावे. तेल सुटू लागले कि शिमला मिरची, व उकडलेले मटार, फ्लॉवर आणि बटाटे ही घालावे व उकळी आल्यावर १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे. मध्ये मध्ये चमच्याच्या मागील बाजूने दाबत एकजीव करत राहावे. सर्व भाज्या एकजीव होईस्तो असे करावे.
- तृतीय चरण
आता यात पाव भाजी मसाला, मीठ, उरलेले टोमेटो घालावे व हे मिश्रण २ मिनिटे मंद आंचेवर ठेवावे. मध्ये मध्ये ढवळत राहावे.
- चतुर्थ चरण
आता एकूण बटर मधील अर्धे जाड तापलेल्या तव्यावर/ पॅनवर घालावे. प्रत्येक पावाचे २ काप करून ते या बटर वर परतावे. आलटून पाल्टून फिरवावे म्हणजे ते सोनेरी व कुरकुरीत होतील .
- अंतिम चरण
आता ही तयार भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर व उरलेले बटर याने सजवून गरमागरम वाढा.
भाजलेले पाव ,चिरलेला बारीक कांदा व लिंबाची फोड ही बरोबर द्या.
Pavbhaji best
At Kolad, Shivaji nagar
Thanks parfect recipe
You are the best archarya taste; but I make it- thanks, thnx.