पालक पनीर RECIPE / पाककृती
साहित्य :
- पालक ……………………………….१ अक्खी जुडी / ४ कप चिरलेला
- पनीर ………………………………..अर्धा कप चौकोनी तुकडे
- आले ……………………………………..अर्धा इंच बारीक चिरून
- हिरव्या मिरच्या ………………………..१,२ बारीक चिरून
- मोठा कांदा ……………………………..१ बारीक चिरून
- लसूण पाकळ्या ………………………………….४,५ बारीक चिरून
- लिंबाचा रस ……………………………………..१ चहाचा चमचा
- कसुरी मेथी ………………………………..अर्धा चमचा ( ऐच्छिक)
- ताजी साय ( क्रीम)……………………………..३ टेबलस्पून
- पाणी ………………………………………१/३ – १/४ कप.
पूर्व तयारी व कृती
- पालक पाण्यातून धुवून घ्यावा, व मिठाच्या पाण्यात २ मिनिटे उकळून घ्यावा.
- उकळलेला पालक चाळणीत घालून पाणी काढून टाकावे.
- पाणी काढल्यावर पालक थंड पाण्यात १ मिनिट बुडवावा.
- पाण्यातून काढून पालक मिक्सर च्या जार मध्ये घालावा.. त्यातच आले, हिरव्या मिरच्या आणि पाव कप पाणी घालून पेस्ट करून घ्यावी.
- आता एका नॉन स्टिक पॅन मध्ये २ टेबल स्पून तेल किंवा तूप तापवून घ्या. त्यात पनीर चे तुकडे घालून लालसर होईपर्यंत परतून एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवा.जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी दिश मध्ये पेपर नॅपकिन ठेवा आणि त्यावर तळलेले पनीर चे तुकडे काढा.
- आता त्याच पॅनमधे उरलेले तेल/तूप गरम करा व त्यात चिरलेला कांदा पारदर्शक होईपर्यंत परता. आता त्यात चिरलेला लसूण घाला व २० ते २५ सेकंद परता .
- आता पालक ची वाटलेली पेस्ट आणि मीठ घालून २ ते ३ मिनिटे परता.
- १/३ कप पाणी घालून उकळी आणा. सतत ढवळत रहा.
- ग्रेवी उकळू लागली कि त्यात परतलेले पनीर चे तुकडे घाला व ३,४ मिनिटे मंद आंचेवर शिजू द्या.
- यात लिंबाचा रस व कसुरी मेथी चुरून घाला व चांगले मिसळा. गॅस बंद करून क्रीम घाला.
- एका चांगल्याशा बाऊल मध्ये हा पदार्थ घाला व तंदुरी रोटी, पराठा व बटर नान बरोबर सर्व्ह करा.