मिसळ पाव RECIPE / पाककृती
साहित्य
- मोड आलेले मूग ……………………………………………..१ कप
- मोड आलेली मटकी …………………………………………..१ कप
- तेल ……………………………………………………………..२ टेबल स्पून
- हिंग …………………………………………………………….१ चिमुट
- मोहरी …………………………………………………………..अर्धा चहाचा चमचा
- कढी पत्ता …………………………………………………….५,६
- बारीक चिरलेले कांदे …………………………………………..२ मोठे
- उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या ……………………………..२
- लसूण वाटलेली ……………………………………………………..१ चहाचा चमचा
- आले वाटलेले ……………………………………………………….१ चहाचा चमचा
- हळद …………………………………………………………………अर्धा चहाचा चमचा
- लाल तिखट (मिरची पूड )…………………………………………..दीड चमचा
- धणे जिरे पूड …………………………………………………………१ चहाचा चमचा
- मीठ ………………………………………………………………….चवीनुसार
- गरम मसाला ………………………………………………………१ चहाचा चमचा
- बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर ………………………………२ टेबल स्पून
- फरसाण ……………………………………………………………..अर्धा कप
- लिंबाचा रस ………………………………………………………….चवीनुसार
- लिंबाच्या फोडी …………………………………………………..आवश्यकते नुसार
- पाव ……………………………………………………………….८
कृती
प्रथम चरण
मोड आलेली कडधान्ये एकत्र करून चाळणीतून पाण्यातून चांगली धुवून घ्यावी .
द्वितीय चरण
कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी व कढी पत्ता व हळद घालून फोडणी करावी व त्यात चिरून घेतलेल्या कांद्यान्पैकी अर्धे घालावे. थोडा वेळ परतून त्यात हिरव्या मिरच्या, व आले लसूण पेस्ट घालून चांगले ढवळावे. थोडे पाणी शिंपडावे व त्यात लाल तिखट, धणे जिरे पूड घालून परतून त्यात कडधान्ये घालावी.
तृतीय चरण
आता मीठ व ३ कप पाणी घालावे. उकळी आली कि गरम मसाला व चिरलेली कोथिंबीर ( थोडी सजावटीसाठी वगळून ) घालावी. झाकण लावून १०,१२ मिनिटे शिजू द्यावे.
चौथे चरण
वाढताना एका खोलगट बाऊल मध्ये पळी भर ही उसळ घालावी त्यावर भरपूर फरसाण घालावे. वरून चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे. खायला देताना लिंबाची फोड व पाव बरोबर द्यावा .
मिसळ पाव तयार!