ढोकळा Recipe / पाककृती
साहित्य :
- ढोकळ्याकरता
१ बेसन / चणा डाळीचे पीठ …….दीड कप
२ सुजी / रवा ………………………दीड टेबल स्पून
३ दही ……………………………………….. १ कप
४ पाणी …………………………………पाव ( १/४ ) ते अर्धा (१/२)कप
५ मीठ ………………………………….चवीनुसार
६ साखर …………………………………..१ टेबल स्पून
७ हळद ………………………………..१ चहाचा चमचा
८ लिंबाचा रस …………………………..१ टेबल स्पून
९ ईनो फ्रुट सॉल्ट………………………….दीड टेबलस्पून
- वाटण
१ . आले …………………………….१ टेबलस्पून
२ .हिरव्या मिरच्या ……………….३
३ . पाणी ……………………………..३ टेबलस्पून
- फोडणी करता
१ . तेल……………….. ३ टेबलस्पून
२ . मोहरी ………………………१ चहाचा चमचा
३. हिरवी मिरची ……………१. बारीक चिरून
४. हिंग ………………………..पाव (१/४) चमचा
५. पाणी ……………………….४ टेबल स्पून
- वरून सजावटीसाठी
१. बारीक चिरलेली कोथिंबीर ……..३ टेबलस्पून
२. किसलेले खोबरे ………………..३ टेबलस्पून
- हिरवी चटणी
१. कोथिंबीर …………………………….१. कप
२. पुदिना ………………………………..१ कप
३. हिरव्या मिरच्या ……………………२,३
४ . साखर ………………………………………..१ चहाचा चमचा
५. मीठ ……………………………………चवीनुसार
६. लिंबाचा रस………………………………१ टेबलस्पून
७. पाणी ………………………………….वाटणाला लागेल तितकं
कृती
- प्रथम चरण
मिरची व आल्याची २ चमचे पाणी घालून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी.व बाजूला ठेवावी .
- द्वितीय चरण
एक कडा असलेली (वाफवण्यासाठी) थाळी तेल लावून बाजूला ठेवावी.
- तृतीय चरण
आता इडली पात्रात वा कुकर मध्ये पाणी घालून उकळावे (यातच ढोकळा वाफवायचा आहे )
- चौथे चरण
आता एका बाऊल मध्ये दही व पाणी घ्यावं त्यात मीठ, साखर आणि हळद घालून चांगले मिसळावे. आता त्यात बेसन, रवा घालून छान मिश्रण करावे व १० मिनिटे झाकून ठेवावे.
१० मिनिटांनी त्यात आले मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस मिसळावा.
या मिश्रणाला वाफवण्यापूर्वी ईनो फ्रुट सॉल्ट घालून भरपूर फेटावे . आता या फेसाळ मिश्रणाला जराही वेळ न दवडता तेल लावलेल्या थाळीत पसरावे व पाणी उकळत असलेल्या इडली पात्रात / कुकर मध्ये ठेवावी. झाकण लावून १५ ते २० मिनिटे वाफू द्यावे. टूथ पिक खुपसून पहा …ती स्वच्छ बाहेर आल्यास ढोकळा तयार झाला असे समजावे. पण तिला पीठ लागले असल्यास ढोकळा आणखी थोडा वेळ वाफवून घ्यावा.
- पाचवे चरण
ढोकळा वाफत असताना हिरवी चटणी करून घ्यावी. चटणी साठीचे सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घ्यावे व चटणी करावी. व वाढताना घेण्याकरता बाजूला ठेवावी.
- सहावे चरण
२० मिनिटे वाफाव्ल्यावर ढोकळा इडली पात्रातून बाहेर काढावा.
- सातवे चरण
आता फोडणी करून घ्यावी. एक कढलं घ्यावं त्यात तेल गरम करावे. मोहरी, मिरचीचे तुकडे, हिंग घालावे व तडतडल्यावर गॅस वरून खाली काढावे व त्यात पाणी घालावे. हे फोडणीचे पाणी धोक्ल्यावर शिंपडावे.
- आठवे चरण
वरून खोबरं कोथिंबीरिची सजावट करावी .
आता धोक्ल्याच्या कापून वड्या पाडाव्या व हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावा.
Recipe / रेसिपी आवडली तर जरूर SHARE करा !
Khup chhan mahiti dilit thanks…step by step information aslyamule chuka hot Nahi. Thanks again
Osm recipe step nusar chan ahe