Skip to content

Chicken Biryani Recipe in Marathi | चिकन बिर्याणी

marathi recipe chicken biryani

चिकन बिर्याणी RECIPE पाककृती 

 

साहित्य

. २०० ग्राम / बासमती तांदूळ

२. (चहाचा) चमचा मीठ

. टेबल स्पून ( २ चमचे) तेल

. छोटे कांदे (बारीक चिरून)

. मध्यम कांदे (बारीक चिरून)

लसणीच्या पाकळ्या (बारीक चिरून)

. २(चहाचे) चमचे किसलेले आले

८. चीकन ब्रेस्ट फिले किंवा २ चिकन ब्रेस्ट…लांबट कापून घेणे( चिकन फिले हे चिकन ब्रेस्ट च्या   आतील बाजूस असलेले मांस….काही सुपर स्टोर्स मध्ये उपलब्ध असते.)

९. १ (चहाचा) चमचा लाल तिखट

१०. १ (चहाचा) चमचा जिरेपूड

११. २ (चहाचे) चमचे धने पूड

१२. अर्धा चमचा दालचिनी पूड

१३. अर्धा चमचा हळद

१४. चिमुट भरून जायफळ पूड

१५. ३/४ कप साधे दही

१६. २ (चहाचे) चमचे पिठी साखर

१७. ४,५ मुठी बेदाणे

कृती

  • स्वच्छ पाणी येईपर्यंत तांदूळ धुवून घ्यावेत व थोड्या पाण्यात मीठ घालून ३० मिनिटे भिजू द्यावेत.
  • त्यानंतर तांदळातील पाणी निथळून त्यांना एका पातेल्यात पाण्यात बुडवून ठेवावे. पाणी तांदळाच्या वर २ से.मी./ ३/४ इंच तरी असावे.
  • आता हे तांदूळ घातलेले पातेले तापत ठेवावे. पाण्याला उकळी आली कि मंद आंचेवर झाकून भात १० मिनिटे शिजू द्यावा. भातात भोके दिसू लागतील सर्व पाणी शोषले जाईल.
  • आता फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवा त्यात चिरलेले छोटे कांदे, मोठे कांदे ,लसूण आणि आले घालून सोनेरी रंगावर परता. यातील चमचाभर मिश्रण सजावटी करता बाजूला काढून ठेवा.
  • आता चिकन घालून ते ४ मिनिटे परता.
  • आता सर्व मसाले घालून १ मिनिट परता. आता त्यात दही मिसळून १-२ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. आता त्यात साखर, बेदाणे व अर्धवट शिजलेला भात मिसळा. आता हे पॅन स्वच्छ टी टॉवेल ने झाकून त्यावर घट्ट झाकण लावावे. (यामुळे वाफ आतच राहिल)
  • अशा रीतीने १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे.
  • आंच बंद करून ५ मिनिटे तसेच राहू द्यावे.
  • बाजूला काढून ठेवलेल्या कांद्याच्या मिश्रणाने सजवून बिर्याणी सर्व्ह करा (वाढा).

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !

6 thoughts on “Chicken Biryani Recipe in Marathi | चिकन बिर्याणी”

  1. छान प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता!!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *