चॉकलेट केक RECIPE / पाककृती
साहित्य
१. २५ ग्रॅम लोणी (बटर )
२. १४० ग्रॅम मैदा
३. 25 ग्रॅम कोको पावडर (चाळून घेणे )
४. दीड चहाचा चमचा बेकिंग पावडर
५. ५० ग्रॅम हलकी मास्कॉवाडो साखर
६. ७५ ग्रॅम सोनेरी कॅस्टर शुगर
७. २५ ग्रॅम बदाम पूड
८. १७५ ग्रॅम दही
९. १/४ चहाचा चमचा वॅनिला इसेंस
१०. २ मोठी फेटलेली अंडी
११. २ टेबल स्पून ( चमचे ) रॅपसीड / वेजिटेबल तेल
वरुन आइसिंग साठी
१. २५ ग्रॅम डार्क चॉकलेट
२. ५० ग्रॅम आइसिंग शुगर
३. 1 टेबल स्पून चाळलेली कोको पावडर
४. २५ ग्रॅम खोलीच्या तापमानाचे लोणी (बटर)
५. १ चहाचा चमचा स्किम्ड मिल्क (दूध)
६. १०० ग्रॅम हलके क्रीम चीज .. फ्रीज मधील थंड
७. १०० ग्रॅम क्वार्क चीज
८. १० साखरेत घोळवलेले बदाम (ऐच्छिक)
कृती
- भट्टी (ओवन) १८० से. – १६० से. तापमानावर तापवून घेणे.
- २ X १८ से.मी. वर्तुळाकार सॅंडविच केकच्या टिन्सना बेकिंग करता तयार करुन घ्या. लोणी वितळवून घ्या. थोडे थंड करत ठेवा. मैदा व कोको एका मोठ्या बाऊल मध्ये घेऊन मिसळा. त्यातच बेकिंग पावडर, दोन्ही प्रकारची साखर आणि दळलेले बदाम ही मिसळा. दही आणि वॅनिला इसेंस फेटलेल्या अंड्यांमध्ये मिसळून घ्या व हे मिश्रण सुक्या मिश्रणात मिसळा. त्याच बरोबर वितळलेले लोणी व तेल ही मिसळा. आता हे मिश्रण हलक्या हातानी ढवळा. जास्त फेटू नका. व्यवस्थित गुळगुळीत असे मिश्रण तयार करा.
- आता चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण दोन्ही टिन्स मध्ये भरून सपाट करा. आता २० मिनिटे भट्टी मध्ये मिश्रण फुलून येईपर्यंत भाजा. कडा सुटू लागल्यावर भट्टीतून बाहेर काढा व टीनमधून सोडवा, आतील कागद(parchment) ही सुटे करा आणि तारेच्या रॅकवर गार करत ठेवा.
- यादरम्यान आइसिंग तयार करा. पॅनमधे उकळते पाणी घ्या व त्यात एका बाऊल मधे चॉकलेट वितळवून घ्या. वितळलेले चॉकलेट पॅनमधून बाहेर काढा. वेगळ्या बाऊल मध्ये आईसिंग शुगर आणि कोको एकत्र चाळून घ्या. त्यात बटर व दूध मिसळा. भरपूर फेटा आता त्यात क्रीम चीज व क्वार्क मिसळून फेटा. शेवटी वितळलेले चॉकलेट घाला व मिसळा.
- दोन्ही केक थंड झाल्यावर वरील आईसिंग मधील अर्धे मिश्रण दोन्ही केक्सच्या मध्ये लावून सँडविच तयार करा व उरलेले मिश्रण वरून लावून केक झाकून टाका. त्यावर साखरेतले बदाम लावून सजावट करा.