Thomas Alva Edison Information in Marathi
थॉमस अल्वा एडिसन माहिती
थॉमस अल्वा एडिसन-एक महान संशोधक आणि यशस्वी उद्योजक :
- आपण बटन दाबले की घरात लख्ख उजेड पडतो.आज विज्ञान प्रचंड प्रगति करीत आहे. पण एक काळ असा होता की सूर्य मावळल्यावर कंदील किंवा मेणबत्त्या किंवा मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात काम करावे लागे. पण मानवाच्या कल्याणासाठी झटणारे संशोधक सर्व अडचणींवर मात करून, रात्रंदिवस एक करून प्रकाशाला कैद करण्याचा प्रयत्न करीत होते.
- सर हंफ्रे डेव्ही आणि इतर यांनी असा एक दिवा शोधला होता. अठराव्या शतकात विजेचा शोध लागला होता. पण तिचा उपयोग सर्वसामान्य माणसांना होत नव्हता. मग बल्बचा शोध लागला. पण हे बल्ब फार काळ टिकत नसत.
- महान अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसनने अथक प्रयत्न करून हल्लीच्या बल्बचा पूर्वज तयार केला. अपयशाला न जुमानता तो म्हणत असे “I have not failed. I now know 10,000 ways that won’t work.” आणि त्यामुळे जनसामान्यांची घरे उजळून निघाली. त्याने जास्त विद्युत विरोधक आणि कमी व्होल्टेज वापरणारा कार्बन असलेला बल्ब शोधला. त्याला ‘इंकांदेसंट लाईट बल्ब’ असे नाव दिले.
- एडिसनच्या नावावर १०९३ अमेरिकेचे आणि १२०० पेक्षा जास्त इतर देशातील पेटंट आहेत. एका सामान्य घरातून कुठलेही शालेय शिक्षण न घेता एक व्यक्ती एव्हडे शोध लाऊ शकते हे आश्चर्यजनक आहे. त्यासाठी त्याच्यावर काय संस्कार झाले ते बघू.
जन्म आणि बालपण :
- थॉमस एडिसनचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ मध्ये मिलान ओहिओ येथे झाला. वडील सॅम्युएल राजकीय चळवळीत होते आणि आई नॅन्सी शिक्षिका होती. एडिसन सात मुलांपैकी शेंडेफळ होता.
- एडिसन कुपर युनियन फॉर अडव्हान्स्मेंट फॉर सायन्स अंड आर्ट्स मध्ये आणि ‘R.G.Parker स्कूल ऑफ नॅचरल फिलोसोफी’ येथे फक्त कांही महिने शालेय शिक्षण झाले. त्याच्या अती चळवळ करण्याच्या स्वभावामुळे तो हाताबाहेर गेल्याचे समजण्यात आले. आणि म्हणून आईने त्याला घरीच शिकविले. त्यामुळे तो स्वावलंबी झाला आणि स्वत: वाचून तर्कशुद्ध विचारांनी निर्णय घेण्यास शिकला.
- लहानपणी स्कार्लेट फिव्हर नावाच्या रोगामुळे त्याच्या कानाला जंतुसंसर्ग झाला होता. आणि त्याला नीट ऐकू येत नव्हते.
- नंतर १२ व्या वर्षी तो ग्रँड ट्रंक ट्रेन मध्ये वर्तमानपत्र विकायला लागला. आणि स्टेशनच्या ऑफिस मध्ये शिरकाव करून स्वत: चे ग्रँड ट्रंक हेराल्ड नावाचे वर्तमानपत्र सुरु केले.
- त्याचवेळी त्याला गरज आणि संधीचा फायदा घेण्याचे उमगले. तसेच रेल्वेच्या बॅगेज डब्यामध्ये रसायन शास्त्राचे प्रयोग करायला सुरुवात केली. दिवसभर काम करून तो रात्री प्रयोग करीत असे. पण एकदा रसायनाचा स्फोट झाल्याने कंडक्टर धावत आला आणि त्याने एडिसन च्या कानावर थप्पड मारली. आणि त्याचे त्या कानाने ऐकणे बंद झाले.
- ते काम बंद पडले पण एका लहान मुलाला रुलावून गाडीपुढून वाचविल्याने त्याच्या वडिलांनी कृतज्ञतेने थॉमसला “टेलिग्राफ ओपरेटरचे” काम दिले. आणि वयाच्या १५ व्या वर्षी तो टेलिग्राफ ऑपरेटर झाला. तेंव्हाच त्याला संकटातून संधी शोधण्याचे शिक्षण मिळाले.
ओपरेटर ते संशोधक :
- ऑपरेटरची नोकरी करतांना एडिसनला मोर्स कोडचे भाषांतर करतांना त्रास व्हायला लागला, म्हणून त्याने एका प्रेस मध्ये नोकरी धरली आणि रात्रपाळी घेतली. त्यामुळे तो दिवसा काम आणि रात्री प्रयोग करीत असे. पण नंतर त्याने वेस्टर्न युनियन, बोस्टन येथे नोकरी पकडली.
- बोस्टन मध्येच फावल्या वेळचा सदुपयोग करून त्याने इलेक्ट्रोनिक व्होटिंग रेकोर्डर तयार केला. तेही वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी.अमेरिकेतील असेम्ब्ली मध्ये मतदान रेकॉर्ड करणारे यंत्र असल्याने कांही कायदेपंडितांनी त्याला विरोध केला. पण एडिसन ने त्याचे पेटंट मात्र घेऊन ठेवले.
- एडिसनने हार मानली नाही. तो न्यूयॉर्कला गेला आणि त्याने स्टॉक टिकरची सुधारित आवृत्ती, “युनिव्हर्सल स्टॉक टिकर” शोधला जो बऱ्याच स्टॉक टिकरच्या नोंदी एकाच वेळी करू शकेल.
- गोल्ड अँड स्टॉक टेलिग्राफ कंपनीने ४०,००० डॉलर ला ते विकत घेतले. एव्हडे प्रचंड भांडवल मिळाल्यावर त्याने नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ संशोधनाला वाहून घेतले.
उद्योजक :
- शोध विकून आपण चांगला धंदा करू शकतो हे पाहिल्यावर एडिसनने शोधांचे पेटंट घेणे आणि ते विकणे हा धंदा सुरु करायचे ठरविले.
- एकट्याने हे जमणार नाही म्हणून आणि त्याच्या शिक्षणाच्या त्रुटी माहित असल्याने त्याने ‘मन्लो पार्क, न्यूजर्सी’ येथे एक प्रयोगशाळा आणि उत्पादन युनिट सुरु केले. आणि तंत्रज्ञ कामाला ठेवले.
- एडिसनच्या प्रयोगशाळेने एका पाठोपाठ एक बरेच शोध लावले आणि त्यांचे पेटंट घेतले – टेलिग्राफ पासून फोनोग्राफ, कार्बन टेलीफोन ट्रान्समीटर, वीज वितरण फ्लुरोस्कोपी, मोशन पिक्चर, खाण काम, बॅटरी, टेसिमिटर
- वेस्टर्न युनियन इथली नोकरी सोडली तरी त्याचे संबंध चांगले होते आणि एडिसनचा पहिला टेलिग्राफ त्यांनी १०००० डॉलरला विकत घेतला तेंव्हा एडिसन चा आनंद गगनात मावेना.
- त्याने मन्लो पार्क मध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट चे काम सुरु करून तेथे इंजिनियर, गणितज्ञ इत्यादी कुशल लोक कामाला ठेवले.
- ते सर्व एडिसन च्या सांगण्याप्रमाणे काम करीत. त्यामुळे त्याला हे सर्व शोध लाऊन त्याचे पेटंट घेता आले ही पहिली रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रयोगशाळा होती जी ओद्योगिक संशोधन आणि विकास करण्याचा पाया बनली.
- त्याचे बरेच संशोधन विलियम जोसेफ हॅमर ह्या इंजिनियर ने मेहनत घेऊन केलेले होते. एडिसन स्वत: त्या संशोधनावर देखरेख करीत असे.
- त्याचे फोनोग्राफचे संशोधन लोकांनी एव्हडे डोक्यावर घेतले की त्याला “Wizard of Manlo Park” हा किताब मिळाला.त्याचे संशोधन जुन्या संशोधनात सुधारणा अशा प्रकारचेच होते.
- ग्राहम बेल च्या टेलीफोन मध्ये त्याने कार्बन मायक्रोफोनची सुधारणा केली आणि डायरेक्ट प्रवाहाला भाजलेल्या कार्बन कणा वरून जाऊ देऊन आवाजात रुपांतर केले.
- १८९० मध्ये चालू केलेली ती पद्धत १९८० पर्यंत चालू होती. १८८० मध्ये त्याने इलेक्ट्रिक डिस्ट्रिब्युशन साठी ‘एडिसन इल्ल्युमिनेटिंग कंपनी’ स्थापन केली आणि वीज वितरणाचे हक्क घेतले. त्याचे लोकांशी संबंध पण चांगले असायचे.
- त्यामुळे फोर्ड सारखा उद्योजक त्याचा मित्र बनला. त्याने आणि फोर्ड आणि हार्वे फायरस्टोन ह्यांनी रबर च्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी एडिसन बोतानिकाल रिसर्च कॉर्पोरेशन हि कंपनी काढली.
- फोर्ड कार साठी त्याने इलेक्ट्रिक वर चालणारी कार शोधली. ज्याची आज खूप गरज आहे. गरज पडल्यावर थांबून न राहता अथक परिश्रम करून शोध लावण्याच्या त्याच्या गुणांमुळे त्याचे शोध कुठल्या एकाच विषयात मर्यादित न राहता सर्वव्यापी झाले.
- फ्लोरोस्कॉपीचा पण शोध असाच लागला.मूळ रोंटजेन च्या क्ष किरणांच्या यंत्रात बेरियम प्लॅटिनो सायनाईड होते त्या ऐवजी कॅल्शियम टगस्तेन जास्त भेदक किरणे देतात हे शोधले आणि अजूनपर्यंत हे चालू आहे.
- चलत चित्र हा त्याचा मोठा शोध जो आजच्या सर्वात मोठ्या उद्योगाचा पाया आहे. त्याने कायनाटोग्राफ हे यंत्र शोधले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आवाज आणि हालचाली वर शोध लावले आणि असा पहिला सिनेमा तयार झाला. जे आज प्रोजेक्टर म्हणून वापरले जाते.
लग्न आणि संसार
- एडिसन ने २४ व्या वर्षी मेरी स्तील्वेल ह्या १७ वर्षाच्या, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या मुली बरोबर लग्न केले आणि त्यांन ३ मुले झाली. पण अल्पशा आजाराने तिचे निधन झाले.
- मग त्याने ३९व्या वर्षी २० वर्षाच्या मीना मिलर ह्या संशोधकाच्या मुलीबरोबर लग्न केले. त्यांना पण ३ मुळे झाली.
- त्याने तिच्यासाठी न्यू जर्सी येथे लेवेलिनपार्क, वेस्ट ऑरेंज येथे मोठा बंगला घेतला.
कार्याचा गौरव
- एडिसन ने मानव जातीवर एव्हडे उपकार केले त्याचा अमेरिकन सरकारने उचित गौरव केला.
- त्याला बरच मेडल आणि सन्मान मिळाले –
- १८८१ : मिनिस्ट्री ऑफ पोस्ट आणि टेलिग्राफ कडून ‘Officer of Legion of Honor’ हा किताब मिळाला.
- १८८७ : Member of Royal Swedish Academy of Science हा सन्मान मिळाला.
- १८८९ : ‘John Scott medal’ हा फिलाडेल्फिया चा सन्मान मिळाला.
- १८९९ : Franklin Institute -Edward Longstreth Medal
- १९०८ : John Fritz Medal American Association of Engineering Society
- १९२७ : National Academy of Science
- १९२८ : Congressional Gold Medal
- अमेरिकेने त्याचा जन्मदिवस हा National Investors Day म्हणून घोषित केला. त्याला Hall of fame मधेही स्थान मिळाले.
- असा हा अगदी सामान्य थरातून काहीही शालेय शिक्षण नसलेला मनुष्य आपल्या अथक प्रयत्न आणि आई वडिलांच्या संस्कारामुळे एक महान शास्त्रज्ञ झाला.
१८ ऑक्टोबर १९३१ ला मधुमेह आणि चुकीच्या आहार प्रणाली ने त्याचा मृत्यू झाला. वयाच्या ८४व्या वर्षी अगदी समृद्ध आयुष्य जगून हे महान व्यक्तिमत्वाने ह्या जगाचा निरोप घेतला.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV