My Father Essay in Marathi
माझे बाबा निबंध
आई हा नेहमीच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. क्वचितच अश्या व्यक्ती सापडतील ज्यांना आई विषयी माया नाही. अनेक लेखक आणि कवींसाठी आई हा असा विषय आहे कि जिच्यावर ते अनेक काव्य किंवा लेख लिहू शकतात. परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य काव्य किंवा लेखन केलेलं कधी माझ्या वाचनात आले नाही. आई हि मायाळू, दयाळू, प्रमाची मूर्ती सर्व काही आहे परंतु आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे ह्या बद्दल आपण जास्त विचार का नाही करत? वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपल घर उभं असत हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. मित्र-मैत्रिणींच्या घरी जाताना आई आहे म्हटलं तरी बिनधास्त जातो पण जर त्यांच्या घरी बाबा आहेत असं म्हटलं तर आपण सांगतो कि ‘तू खालीच ये, बाहेरच भेटूया.’ का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात?
मला वाटत याची सुरवात तेव्हापासून होते, जेव्हापासून घरातले सर्वजण सांगायला लागते ‘पसारा आवर बाबा येतील, आभ्यास कर नाही तर बाबांना सांगेन, हे केलस तर बाबा ओरडतील, ते नाही केलस तर बाबा रागवतील.’ हे सर्व ते आपल्याला शिस्त लावण्यासाठी करत असतील कदाचित पण त्यामुळे नकळत आपल्या मनात वडिलांविषयी आदर सोबत भीती सुद्धा तयार होत असते. ज्या गोष्टींसाठी आपण आईकडे बिनधास्त हट्ट करतो, बाबांना त्याविषयी विचारायला सुद्धा घाबरतो.
प्रत्येकाच्या घरी असते तीच परिस्थिती आमच्या घरीही आहे. सकाळी बाबा ऑफिससाठी निघेपर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत करायचे; आणि जस बाबांचं पाउल घराबाहेर पडले की मग आपण घरचे राजे. मग आई कितीही ओरडू देत किंवा कितीही रागवू देत आपण मात्र आपल्या सवडीने, टंगळ-मंगळ करत काम करणार. संध्याकाळी बाबांची घरी यायची वेळ झाली कि मग लगेच पुस्तक समोर घेऊन आभ्यासाला बसायचं. क्लास टीचर समोर आपण निर्धास्तपणे वागतो पण प्रिन्सिपल आले कि कसे शिस्तीत राहतो अगदी तसच असती घरीसुद्धा. आई कडे सगळे लाड चालतात पण बाबांसमोर मात्र गुणी बाळ बनून राहायचं.
पण धाकासोबतच बाबांचा आपल्या सर्वाना किती आधार असतो. जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा नकळत उच्चार निघतात “आई ग” पण जेव्हा प्रचंड भीती वाटते तेव्हा आपण काय बोलतो? “बाप रे” कारण भीती वाटत असली कि आपल्याला नकळतच वडिलांच्या आधाराची गरज भासते. घरात किंवा कुटुंबात काहीही प्रोब्लेम झाला कि बाबा म्हणायचे ‘तुम्ही काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते.’ एक साधसं वाक्य पण किती धीर मिळतो या वाक्याने. असं वाटत कि आता सर्व काही ठीक होईल. बाबा आहेत तो पर्यंत काळजी करायची काही गरज नाही. आई जर संपूर्ण घराची सेवा करत असेल तर बाबांच्या आधाराने संपूर्ण घर चालत असते.
एकदा माझे बाबा बाहेरगावी गेले होते. मला वाटले की बाबा घरी नसतील म्हणजे किती मज्जा! काहीही करा, कसंही वागा, आई काय जास्त रागावणार नाही. पण जस जशी संध्याकाळ होऊ लागली तशी बाबांची कमी जाणवू लागली. कधी वाटलंही नव्हती एवढी बाबांची उणीव जाणवली. सारखं असं वाटू लागलं कि आता बाबा येतील, आता बाबा येतील. रात्र झाली तरी शांत झोप येईना. बाबा घरी नसल्यामुळे एक विचित्र अशी भीती वाटू लागली. जेव्हा दोन दिवसानंतर बाबा घरी आले तेव्हा घर पुन्हा पूर्ववत झाले. बाबांच्या आधाराचे महत्व तेव्हा जाणवले.
पण बाबा म्हणजे फक्त आधारच नव्हे ते आईचे कडक स्वरूप असतात. माझ्या छोट्या बहिणीला श्रीखंड खूप आवडते म्हणून माझं पोट भरलं आता असं म्हणत आपल्या ताटातील श्रीखंड तिच्या ताटात वाढतात. खरंतर बाबांनाही श्रीखंड खूप आवडत पण त्यापेक्षा मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव जास्त आवडतो. कोणत्याही सणासुदीला, समारंभाला घरातील सर्वाना कपडे घेतात पण स्वतःला मात्र घेत नाहीत, ‘अरे माझ्याकडे बरेच कपडे आहेत.’ असा बहाणा करतात. घरचाच नव्हे तर त्यांच्या भावा-बहिणींचाही विचार करतात आणि सर्वांनाच आधार देतात. आजही माझे काका, बाबांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतेही मोठे काम करत नाहीत.
बाबा फक्त आमच्या वर्तमानाचाच नाही तर आमच्या भविष्याचा विचारसुद्धा आमच्यापेक्षा जास्त तेच करतात. आमच्या भविष्यासाठी ते आज काटकसरीने जगतात आणि आमच्या शिक्षणासाठी पैसे जमा करून ठेवतात. जेवढे शक्य आहेत तेवढे आमचे लाड पुरविण्याचा प्रयत्न करतात, पण वाजवीपेक्षा जास्त हट्ट पुरे करत नाहीत. अवास्तव लाडामुळे आम्ही बिघडू नये म्हणून सारखे बोलत असतात, कडक वागतात कारण त्यांची अपेक्षा फक्त आमची प्रगती व्हावी एवढीच नसून आमचे व्यक्तिमत्व चांगले व्हावे अशी आहे. माझे वडील माझ्यासाठी उत्तम आदर्श आहेत. समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला पुढे जाऊन माझ्या वडिलांसारखे व्हायला नक्कीच आवडेल ज्यांनी कधी मायेने तर कधी शिस्तीने आमचे चांगले व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न केला.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
essays are superb
Yeah…these are the best essays ever
my village cha Eassy khup chan aahe I like it It is so beautiful
Vadilanchi mahati sangannara, ani hrUday galgalun taknara sundar nibhand.babana sashtang namaskar.
Very nice eassys are there. I like your eassys superb mind blowing excellent It has touched my heart
all essays are superb
how beautiful essay it is. I like it so much.
The essay was nice
but there is some default in it i.e.There was some spelling mistakes in the essay.
Superb really touched my heart deeply I have never read such a wonder full and heart touching essay that also on maje baba and I really feel very bad the way I talk to my father and think about him
Maze baba was a good nibandh I was heartly touched by it. it is really very superb
Really this essay very deeply touched my heart I never read such a wonderful and beautiful and such a heart touching essay that also on maje baba and I really feel very bad the way I talk to my father and think about him
Nice
Good essay