Benjamin Franklin Information in Marathi
बेंजामिन फ्रँकलिन माहिती
बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकेचा अनाभिषिक्त अध्यक्ष आणि एक बहुआयामी व्यक्तिमत्व :
बेन्जामिन फ्रँकलिनचे नाव आपण फक्त विजेच्या शोधाच्या संदर्भात ऐकले होते. पण हा मनुष्य इतक्या गुणांनी युक्त होता आणि त्याने एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या विषयात एव्हडे कार्य करून ठेवले होते ते सुद्धा फक्त दोन वर्ष शाळा शिकलेला असतांना. हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हंटला पाहिजे. त्याला येत नव्हते अशी गोष्टच नव्हती.तो शास्त्रज्ञ, संशोधक, राजदूत, राजकार्य नेता, सुधारणावादी, अर्थतज्ञ, हवामान तज्ञ, समाजकारणी, लेखक, संपादक असा बहुआयामी होता. ते सुद्धा प्रत्येक गोष्ट त्याने समाजाला गरज पडली तेंव्हा शोधली. देवाने त्याला समाजाच्या मानवजातीच्या हितासाठीच जन्माला घातले असावे इतके त्याचे मानवजातीवर विशेषत: अमेरिकेवर उपकार आहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याला त्याने केलले योगदान इतके मोठे आहे की लोक त्यालाच जॉर्ज वॊशिंग्टन ऐवजी अमेरिकेचा पहिला अध्यक्ष असे मानत होते. इंग्लंड मध्ये मूळ असलेला बेन्जामिन अमेरिकेच्या मातीत असा मिसळला की त्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचलला.
जन्म आणि बालपण
- बेन्जामिनचे आई वडील इंग्लंडचे राहिवासी होते. त्याच्या वडिलांचा साबण आणि मेणबत्त्या यांचा धंदा होता.
- पहिल्या बायकोपासून सात मुले झाल्यानंतर तो अमेरिकेला आला आणि फिलाडेल्फिया येथे त्याने धंदा टाकला.
- पहिली बायको गेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि त्याला दहा मुले झाली त्यातला बेन्जामिन हा एकूण मुलांमध्ये सतरावा आणि शेवटचा.
- त्याचा जन्म 17 जानेवारी 1706 मध्ये बोस्टन येथे झाला. आईचे नाव अबिहा आणि वडिलांचे नाव जोशिहा.
- वडिलांना त्याने शिकावे असे वाटत होते पण पैसे नसल्याने तो फक्त दोनच वर्षे शाळेत जाऊ शकला आणि त्यानंतर तो त्याच्या मोठ्या भावाच्या प्रेसमध्ये कामाला लागला.
लेखक म्हणून यशस्वी
- भावाने एक वर्तमान पत्र काढले, त्यात पंधराव्या वर्षी त्याने दुसऱ्या नावाने [सायलेन्स डू गुड] लेखन सुरु केले.ते सर्वत्र चर्चिले गेले. भावाला तुरुंगात टाकल्यावर त्याने प्रेसचे काम आपल्या हाती घेतले.पण स्वतंत्र मते मांडण्याचा स्वभाव असल्याने त्याने सरकारचा कधीच तोंडपुजेपणा केला नाही.
- त्याने त्याच्या सायलेन्स डूगुड च्या तोंडी हे वाक्य टाकले होते “Without freedom of speech there can be no such thing as wisdom and no such thing as public liberty without freedom of speech” त्याने भावाची परवानगी न घेता बोस्टन सोडले आणि फिलाडेल्फियाला गेला.
- वयाच्या 17 व्या वर्षी तेथील महापौराच्या सांगण्यावरून लंडनला वर्तमान पत्र काढायच्या सामग्रीसाठी गेला. आणि लंडनला टाईप सेटर म्हणून काम केले. तेथे घर मालकिणीच्या मुलीशी डेबोराशी त्याचे प्रेम जमले.
- पण त्याला स्थेर्य नव्हते म्हणून आईने नकार दिला आणि मुलीचे दुसऱ्या माणसाबरोबर लग्न लावून दिले. पण तो वाईट निघाल्यामुळे मुलीने बेन्जामिन बरोबर लग्न केले. पण हे वैध नव्हते.पुढे त्याने ते वैध करून घेतले.
- तेथून एका माणसाच्या सहायाने परत फिलाडेल्फियाला आला कारण महापौरांनी वचन फिरविले. मग तो त्या माणसाकडे क्लार्क, अकौंटट वगैरे कामे करू लागला.
- 21 व्या वर्षी त्याने सम विचारांच्या म्हणजे जे स्वत: बरोबर समाजाचा उत्कर्ष करू इच्छित होते अशा माणसांचा “जन्तो” नावाचा ग्रुप काढला.
- त्यांना वाचनाची आवड होती. आणि पुस्तके कमी असल्याने त्यांनी एकमेकांना पुस्तके देऊन तसेच वर्गणी काढून पुस्तके घेऊन त्याची लायब्ररी सुरु केली. हि पहिली लायब्ररी. आणि तेंव्हापासून नेतेपण आणि नवीन गोष्टी करण्याची सुरुवात झाली.
- 23 व्या वर्षी त्याने पेनसिल्वानिया गॅझेट नावाचे वर्तमानपत्र काढले आणि त्यात त्याने आपल्या विनोद बुद्धीचे ,व्यंगचित्र काढण्याचे, उपहासात्मक लेखांचे प्रदर्शन केले. आणि पुअर रिचर्डस अल्मानक नावाचे मासिक काढले ज्यात महिन्याचे शहराचे कार्यक्रम, हवामान शेती इत्यादी खमंग मसाला होता.
- त्याच्या दरमहा 10,000 प्रती खपू लागल्या आणि तो गडगंज श्रीमंत झाला.
- त्याने पेनसिल्वानिया क्रॉनिकल मध्ये रिचर्ड सौन्डर्स नावाने ब्रिटीश सत्ते विरुद्ध लिहायला सुरुवात केली.
- ब्रिटिशांना हे माहित नव्हते. गम्मत म्हणजे तो ज्या क्षेत्रात गेला तिथे तो अद्वितीय कामगिरी करून गेला. ह्या काळात तो पोस्टात चिकटला आणि चढत चढत असिस्टंट पोस्ट मास्तर जनरल झाला आणि नंतर पहिला पोस्टमास्तर जनरल झाला.
- हे काम करतानाच त्यने ओशिओनिक करंट वर अभ्यास केला आणि प्रबंध लिहिला. हे अपघातानेच घडले कारण इंग्लंडहून पेन्सिल्वानियाला येणारे पार्सल उशिरा का येतात ह्याचा शोध घेतांना खालाशांकडून त्यांना विरुद्ध प्रवाहांची माहिती मिळाली आणि त्याने ह्यावर अभ्यास केला.
- त्या प्रवाहांना गल्फ स्ट्रीम असे नाव दिले ते आजतागायत आहे. त्याचे समाजाला मदत करण्याच्या स्वभावामुळे असे चमत्कार घडत गेले.
- 1730 ते 40 च्या दरम्यान पत्रकारिता करतांना त्याला हि जाणीव झाली की अमेरिकेची लोकसंख्या बाहेरून येणाऱ्या मुळे खूप वाढू शकते आणि तेव्हडा अन्नपुरवठा करणारी शेती असणे आवश्यक आहे. त्यावर त्याने लोकसंख्येवर लेख लिहिले ते आजही वाचले जातात.
शोध आणि विज्ञान
- 1746 मध्ये आर्चिबाल्ड बिशपचे विजेवर असलेले भाषण ऐकल्यावर त्याने विजेवर प्रयोग करण्यस सुरुवात केली आणि वीज ही प्रवाही असते आणि तिच्यात घन आणि ऋण बाजू असतात हे सिध्द केले.
- मुख्य म्हणजे वीज अणकुचीदार पृष्ठ्भागाकडे जास्त आकर्षित होते म्हणून घराच्या वर अणकुचीदार खांब बसवला आणि त्याचे एक टोक जमिनीत पुरले तर वीज घरावर न पडता जमिनीत जाईल हे शोधून काढले.
- त्याला इलेक्ट्रिकल रॉड असे म्हणत. त्याबरोबरच त्याला दुरचा आणि जवळ चा पण दृष्टीदोष होता म्हणून त्याने चष्म्याचे बायफोकल ग्लास, फ्रान्क्लीन स्टोव्ह, ग्लास अर्मोनिका असे अनेक शोध लावले.
- शिक्षण नसतांना केवळ वाचनाच्या आधारे तो महान संशोधक झाला. त्याला हार्वर्ड आणि एल ह्या युनिव्हर्सिटीनी ऑनररी डॉक्टरेट दिली. आता तो डॉक्टर बेन्जामिन झाला. आणि जगभर त्याच्या संशोधनाची वाहवा झाली.
- त्याने उष्णतेवर पण शोध लावले. इथर मुळे थंडावा येतो हे फ्रीज चे तत्व त्याने शोधून काढले. आणि विशेष म्हणजे फिरे सेफ्टी म्हणजे अग्नी सुरक्षेचे पण त्याने काम केले.
- 1751 मध्ये त्याने “ अकादमी अँड कॉलेज ऑफ फिलाडेल्फिया” ह्या युनिव्हर्सिटी ची स्थापना केली आणि अमेरिकन फिलोसोफिकाल सोसायटी ची पण स्थापना केली .प्रथम सेक्रेटरी आणि नंतर चेअरमन झाला.शिक्षांची आवड असल्याने शाळा न शिकताही तो डॉक्टर झाला.त्याला पोहाण्य्ची पण आवड होती.
क्रांतीची सुरुवात
- हे सर्व चालू असतांना त्याचे राजकीय महत्व पण वाढू लागले. पेनसिल्व्हानिया हि पेन ह्या वंशाच्या लोकांची जहागीर होती आणि ते लोकांना स्टॅम्प ऍक्टच्या नावाखाली लुबाडत होते.
- आधीच जन्मात त्यांच्या विरुद्ध होते. तेंव्हा बेन्जामिन ब्रिटन मध्ये गेला आणि तिथल्या पार्लमेंट मध्ये त्याने ह्याविरुद्ध आवाज उठवला आणि तो रद्द करावयास लावला.
- त्यामुळे इकडे पेन्न्सिल्वानियामध्ये तो होरो झाला. त्याच बरोबर कुठे ही मध्यस्थी व राजदूत म्हणून जायचे असेल तर त्याला ते काम सांगण्यात येऊ लागले.
- हळूहळू अमेरिकेतल्या 13 ब्रिटीश कॉलनी मध्ये ब्रिटीश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे ठरू लागले. त्यात ही बेन्जामिंचे लेखांच्या आधारे योगदान होतेच.
- हे आपल्याकडील आगरकर आणि टिळकांच्या सारखेच झाले. फरक इतकाच की ज्यावेळी आपण तलवारी आणि तोफांनी युद्ध करीत होतो तेंव्हा ते वीज आणि प्रकाशावर संशोधन करीत होते आणि संसदेत लढा देत होते.
- बेन्जामिन ने सगळ्या 13 कॉलनीना एकत्र आणले आणि फ्रांसची मदत घेण्यासाठी ते फ्रांस ला राजदूत ह्या नाह्याने गेले. हा पहिला राजदूत म्हणतात. योग्य वेळी स्वातंत्र्य मिळाल्यावर बेन्जामिन अमेरिकेच्या जडणघडणीत एक मुख्य व्यक्ती बनला.
- अमेरिकेची घटना लिहिणे, फ्रांस बरोबर च्या करारावर स्वाक्षरी करणे इत्यादी महत्वाच्या घटना मध्ये त्याचे योगदान होते. अमेरिका स्वतंत्र झाली हे डिक्लरेशन पण त्याने केले.
ओळख, आणि सन्मान
- त्याला सगळीकडे आदर मिळाला. सरकारने त्याच्यासाठी पहिले पोस्टाचे तिकीट काढले.
- विद्युत प्रभार मोजताना 1 फ्रान्क्लीन =1 स्टेट कुलंब असे लिहिले जाऊ लागले.
- लंडन ला तो जिथे भाड्याने रहात होता ते ऐतिहासिक स्थल बनवले गेले.
- बरेच मानववंश शास्त्रज्ञ अर्थतज्ञ आणि फिजिक्स चे शास्त्रज्ञ त्याच्या शोधांवर अवलंबून आहेत.
असा हा देवाचा चमत्कार असलेला मानव 17 एप्रिल 1790 मध्ये निधन पावला पण त्याच्या शोधांमुळे आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यातील सहभागामुळे अजरामर झाला.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV