युरोप मधील टॉप १० महाराष्ट्र मंडळे
महाराष्ट्रातील लोक अनेक देशांमध्ये लोक नोकरी व्यवसायासाठी स्थलांतरित झालेले आहेत. जिथे जातील तिथे मराठी बाणा आणि कणा त्यांनी जपला आहे. मराठी भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत. ज्या ठिकाणी जातील तिथल्या मराठी लोकांना घेऊन त्यांनी मराठी मंडळे स्थापन केली आणि संस्कृतीचा प्रचार केला. असेच युरोपात देखील अनेक मराठी कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत. चला तर मग बघुयात युरोप मधील टॉप १० महाराष्ट्र मंडळे –
१. महाराष्ट्र मंडळ लंडन :
- भारताबाहेर स्थापन झालेल्या कोणत्याही मराठी मंडळामध्ये हे मंडळ सर्वात जुने आहे, १९३२ साली लेखक आणि राजकारणी एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. बॅरिस्टर जयकर, दिवाण सुर्वे अशा काही दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये या मंडळाची स्थापना झाली.
- स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा इतिहास असलेल्या या मंडळाने अनेक घटना बघितलेल्या आहेत. महिलांसाठी यांचे एक महिला मंडळ आहे ज्यामध्ये दार महिन्याला महिला एकत्र जमतात आणि गप्पा गोष्टींचा आनंद घेतात.
- वर्षभरात हे मंडळ १० – १२ उत्सव अगदी थाटात साजरे करते. जेष्ठांसाठी डे केअर, मुलांसाठी उन्हाळ्यातली मज्जा, खेळाडूंसाठी बॅटमिंटन प्रशिक्षण असे अनेक उपक्रम यांच्या मार्फत राबवले जातात.
- गणेशउत्सव हा यांचा आवडता उत्सव जो अतिशय जोरदार साजरा होतो. यावेळी कला आणि साहित्यामध्ये रुची असणार्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
- तसेच जो काही निधी जमा होईल तो भारतात आणि महाराष्ट्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची मदत निधी म्हणून पाठवला जातो.
२. मराठी मित्र मंडळ जर्मनी :
- युरोपमधील जर्मनी मध्ये अनेक भारतीयांनी नोकरी साठी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर केलेले आहे, तिथं जाऊन त्यांनी मातीशी नाळ तुटू दिलेली नाही उलट तिथे जाऊन आपल्या लोकांना एकत्र करण्यासाठी मराठी मित्र मंडळ जर्मनी याची त्यांनी स्थापना केली आहे.
- २०१४ साली या मंडळाची स्थापना झालेली आहे. दरवर्षी यांचे एक वार्षिक अधिवेशन असते ज्यामध्ये १५० पेक्षा जास्त मित्र एकत्र येऊन पुढील वर्षी साजरा करायच्या सणांची प्लांनिंग करतात.
- तसेच भारतातील आदिवासी मुलांसाठी यांचे निधी गोळा करण्याचे काम आहे.
- मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी पुस्तके अत्यंत वाजवी दारात यांच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच विविध विषयांवर व्याख्याने नेहमीच चालू असतात.
- मराठी हौशी सदस्यांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम या मित्र मंडळाचे सदस्य अगदी उत्तम रित्या पार पडतात।
३. बृहन्महाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड :
- स्विझर्लंड मधील मराठी लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. मराठी परंपरा प्रदेशातही जपणे हे यांचे उदिष्ट आहे. मराठी सोबतच भारतातील इतर कॉम्युनिटी च्य मंडळासोबत यांचे चांगले संबंध आहेत.
- वर्षातून २ – ४ वेळा हे सर्व मराठी बांधव एकत्र येतात. मराठी नाटक आयोजित केले जाते, गाण्याच्या मैफिली भरवल्या जातात, खास अस्सल मराठी पदार्थ जेवणासाठी वाढले जातात.
- स्विझर्लंड मधील विविध भागात हे दरवर्षी आपले सण साजरे करतात. तिथल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा देखील याना तेवढा आदर आहे.
- यांच्या अधिकृत संकेत स्थळावर येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली जाते. तसेच आपल्या मराठी सणांचं महत्व सांगणारे लेख देखील आहेत.
- तसेच मंडळाच्या सदस्यांनी विविध विषयावर लिहिलेले ब्लॉग्स सुद्धा आपण येथे वाचू शकतो.
४. महाराष्ट्र मंडळ फ्रान्स :
- पॅरिस मध्ये दिवाळी ?? ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरा आहे।. त्यावेळी आपण पॅरिस मध्ये आहोत कि महाराष्ट्रात आहोत हे कलणेसुद्धा मुश्किल झाले होते।. असा दिवाळीचा जल्लोष आपल्या या महाराष्ट्र मंडळ फ्रांस ने केला लो आयफेल टॉवर सुद्धा बघत राहिला.
- या मंडळाने २०१९ मे मध्ये १२ वर्षे पूर्ण केली आहेत. गणेश उत्सव असो व दिवाळी, गुडीपासव असो किंवा दशहरा यांचा उत्साह बघनासारखा असतो.
- अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलेलं असते. सर्वजण पारंपरिक मराठी कपड्यांमध्ये असतात. यांचा दिवाळी अंक सुद्धा अतिशय छान असतो, फ्रान्समधील पर्यटन स्थळे, आपले संस्कृती, पाककला अशा अनेक विषयांचे लेख यामध्ये असतात.
- तसेच आपण साजरे केलेले सण आपल्याला कसे वाटले हे आपल्या शब्दात आपण यांच्या संकेतस्थळावर मांडू शकतो असे अनेक भावनिक पात्र येथे आहेत।
५. बेल्जियम मराठी मंडळ :
- मराठी संस्कृती संपूर्ण जगातील विविध भागांमध्ये पसरवणे आणि प्रचार करणे हे यांचे उद्दिष्ट आहे.
- या मंडळाचा सदस्य होण्यासाठी मराठीच असायला हवे अशी अट नाही. मराठी संस्कृती आणि भाषेबद्दल प्रेम असणारे कुणीही या मंडळाचे सदस्यत्व घेऊ शकते.
- मराठी सण उत्सव अगदी थाटामाटात साजरे केले जातात, ढोल ताशा लेझीम पथक यांच्या साथीने गणरायाचे स्वागत अगदी मराठमोळ्या पद्द्धतीने होते. मराठी गायनाचे कार्यक्रम, नाटके सिनेमे हा तर नित्याचेच।
६. महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क :
- २०१० साली या मंडळाची स्थापना झाली आहे, मराठी भाषा समजणारे, बोलू शकणारे आणि मराठी शिकू इच्छणाऱ्या सर्वांसाठी हे मंडळ आहे. गणेशउत्सव, कोजागिरी दिवाळी अशा अनेक प्रसंगांना हे सर्व लोक एकत्र येत असतात.
- यांच्या वेबसाइटच्या मदतीने आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसे जवळपास असणारे भारतीय हॉटेल्स, त्यामध्ये काय सुविधा दिल्या जातील, जेवण कसे आहे वगैरे.
- तसेच जवळपास खरेदीसाठी कोणते मार्केट आहे याची देखील माहिती मिळेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झालेल्या आणि पुढे येणाऱ्या इव्हेंट्सची इतंभूत माहिती इथे बघायला मिळते.
७. महाराष्ट्र मंडळ स्टोकहोल्म:
- स्वीडन मध्ये अगदी तोड्या प्रमाणात असणाऱ्या मराठी कुटुंबांनी हे मंडळ बनले आहे.
- महाराष्ट्राबद्दलची माहिती एकमेकांना देणे, घडामोडी सांगणे, मराठी पुस्तके वाचन गायन हे या मंडळाचे उद्देश आहे. तसेच व्यवसायात मदत करणे, दिवाळीचा फराळ विकत घेणे, गणपती बसवणे आणि सोबत उत्सव साजरा करणे असे सर्व काम या मंडळामध्ये होत असते.
- तसेच विविध लेखकांनी लिहिलेले अनेक ब्लॉग्स यांच्या संकेतस्थळावर वाचता येतात.
८. मराठी मंडळ नॉर्वे :
- मराठी मंडळ नॉर्वे ची स्थापना २००५ मध्ये करण्यात अली. नॉरजे ओस्लो आणि जवळपास राहणाऱ्या मराठी लोकांसाठी त्यांना एकत्र येण्यासाठी मंडळाची स्थापना झाली. गणपती उत्सव, गुडी पाडवा, दिवाळी हे सर्व सण सार्वजनिकरित्या साजरा करतात.
- मराठी परंपरा, संस्कृती, जेवण सर्व टिकवण्यासाठी आणि जपण्यासाठी हे मंडळ विशेष उपक्रम राबवत असता. वार्षिक भेटीगाठी पण नेहमी होत असतात.
९. महाराष्ट्र मंडळ म्युनिक :
- हे मध्य युरोपातील सर्वात मोठे मंडळ आणि जर्मनी मध्ये स्थापन होणाऱ्या पहिल्या काही मंडळांपैकी एक आहे. २०१५ साली याची स्थापना करण्यात आली होती.
- येथे राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांना एकत्र आणणे हे या मंडळाचे ध्येय आहे. स्थानिक मराठी कलाकारांना प्रात्साहन देणे, विविध नाटक आयोजित करणे, पिकनिक ला जाणे, मूवी नाईट आयोजित करणे असे सर्वकाही करणे जेणेकरून मराठी कुटुंबामधील मैत्रीचे संबंध अजून घट्ट होतील.
१०. मराठी मंडळ नेदरलँड :
- युरोप मधील हे आणिकही एक मंडळ आहे. मातीपासून दूर राहून मातीच्या अजून जवळ येत. अस्खलित मराठी बोलणाऱ्या या मंडळाचे नाटक प्रेम बघून चकित व्हायला होते.
- कित्तीतरी नाटके, किती गायनाचे कार्यक्रम यांनी आयोजित केले आहेत.
- मराठी भाषेच्या वाढीसाठी मदत करणे, वाचन संस्कृती रुजवणे यासाठी अनेक उपक्रम यांच्यामार्फत राबवले जातात. रश्मीन ही यांची सामाजिक भावना जपणारी चळवळ आहे.