ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधील टॉप १० महाराष्ट्र मंडळे
माणूस हा कुटुंबाने, कल्पने राहणार प्राणी आहे. जिथे जाईल तिथे त्याला आपल्या लोकांची गरज असते. म्हणूनच महाराष्ट्रातून देशविदेशात स्थाईक झालेल्या लोकांनी अनेक मराठी/ महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. जिथे मराठी कुटुंब एकत्र येतात, सण आणि समारंभ साजरे करतात. परदेशात राहून सुद्धा मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि आपल्या मुलांना आपली संस्कृती माहिती व्हावी यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आज आपण बघुयात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे स्थाईक झालेल्या मराठी बांधवानी स्थापन केलेले टॉप १० महाराष्ट्र मंडळ.
१. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया :
- व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलीया मधील दुसरे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. मराठी भाषिकांची संख्या येथे मोठी आहे.
- येथे राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया ची स्थापना केली.
- मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि मुलांना मराठी लिहिता वाचता यावी यासाठी त्यांनी मराठीचे क्लास घेतले जातात.
- तसेच मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे, हितगुज हा त्यांचा मराठी दिवाळी अंक आहे. ज्यामध्ये त्यांच्या मंडळाच्या सदस्यांचे लेख ते प्रसिद्ध करू शकतात. तसेच योग क्लास देखील मोफत घेतले जातात.
- मराठी पूजा क्लास हा यांचा एक मस्त उपक्रम आहे. तसेच अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेल्लनामध्ये यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. आणि मराठी नाटक, सिनेमे आणि गाण्याच्या मैफिली यांची पर्वणी तर कायमचीच.
२. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ :
- ब्रिम म्हणून प्रसिद्ध असणारी हे संस्था २००५ साली ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन मध्ये स्थापन झाली.
- ब्रिस्बेन आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक नाट्य आणि संगीत प्रेमींना एकत्रित ठेवण्याचे काम या संस्थेने केले.
- मराठी संस्कृती टिकवताना गणेश उत्सोव, दिवाळी, होळी असे सर्वच सण येथे अतिशय उत्साहात साजरे होतात.
- मराठी भाषा शाळा हा यांचा अतिशय अभिमानास्पद उपक्रम आहे जेथे मुलांना मराठी बद्दल गोडी निर्माण केली जाते.
- अनेक मराठी कलाकारांना बोलावून त्यांच्या अभिनयाचे आणि गायनाचे कार्यक्रम ठेवले जातात.
३. वेस्ट मेलबर्न मराठी :
- मेलबर्न च्या पश्चिम भागात राहणाऱ्या मराठी समुदायाने स्थापन केलेली हि संस्था आहे.
- येथे राहणाऱ्या मराठी बांधवांचा व्यवसाय वाढवणे हे या संस्थेचे मुख्य उद्देश आहे.
- तसेच मराठी कुटुंबाना एकत्र आणणे, सण साजरे करणे आणि भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे हे हेतू आहेत.
- लहान मुलांसाठी नाटक कार्यशाळा, मोठ्यांचे सण समारंभ असे सतत काही ना काही येथे चालू असते.
४. अॅडलेड मराठी मंडळ :
- मराठी भाषा, जेवण, संगीत, नाट्य असणाऱ्या लोकांची ही मराठी संस्था आहे.
- घरापासून दूर असलेले घर अशी जाणीव हे संस्था करून देत असते.
- आपले घर सोडून नवीनच ऑस्ट्रेइलिया मध्ये स्थाईक झालेल्या कुटुंबाना आपुलकीची भावना देणे, काही हवे नको ते बघणे हे यांचे कौतुकास्पद काम आहे.
- मंडळाचे मायबोली नावाचे एक संकेतस्थळ २००५ पासून आहे. ज्याद्वारे ते नेहमी आपल्या मराठी बद्दल प्रेम व्यक्त करत असतात.
- तसेच मराठी मधून असणारे विविध विषयाचे आणि माहितीपर लेख प्रसिद्ध होत असतात.
५. मराठी असोसिएशन सिडनी :
- सिडनी येथे राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी हे मंडळ बनले आहे. यांच्याद्वारे अनेक स्तुत्य उपक्रम घेतले जातात.
- अनेक मराठी नाटके आणि संगीताचे कार्यक्रम देखील होतात. मराठी असोसिएशन सिडनी. इंक असे या मंडळाचे संकेतस्थळ आहे ज्यामध्ये त्यांनी आकाशवाणी ची सुविधा उपलब्द करून दिलेली आहे त्यावरील कार्यक्रम हे मराठीमध्ये असतात.
- तसेच काही मराठी वृत्तपत्र देखील तुम्ही या संकेतस्थळावर वाचू शकता. तसेच यांचा दिवाळी अंक देखील आहे.
६. ऑकलंड मराठी असोसिएशन :
- न्यूझीलंड मधील ऑकलंड येथील हे मराठी संस्था आहे. १९९५ साली तिथे राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे.
- शिवाजी महाराजांच्या मूल्यावर आधारित असे हे मंडळ आहे. झुंजूमुंजू हा त्यांचा दिवाळी अंक आहे. किवी – इंडियन मुलांना मराठी भाषेची संस्कृतीची ओळख निर्माण केसाचे यांचं ध्येय आहे. अनेक सण ते अगदी उत्सहाने एकत्रित साजरे करतात.
७. वेलिंग्टन महाराष्ट्रीयन असोसिएशन :
- वेलिंग्टन न्यूझीलंड येथे राहणाऱ्या मराठी लोकांचे हे मंडळ आहे.
- अनेक दिग्गजांच्या भेटी या मंडळाला होत असतात. मंडळाचे एक फेसबुक पेज आहे ज्यावरून झालेल्या कार्यक्रमांची तसेच येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली जाते.
- तसेच कार्यक्रमातील काही क्षण चित्रे देखील सर्व एकमेकांना दाखवू शकतात.
- दिग्गजांचे व्हिडिओस यावर असतात ज्यावरून त्यांचे विचार सर्वांपर्यन्त पोहचवले जातात.
- तसेच आयुष्यवे बोलू काही सारख्या मराठी गाण्याचा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेतला जातो. सर्व मराठी सिनेमे नाटक यांची माहिती दिली जाते.
८. महाराष्ट्र मंडळ पर्थ :
- पश्चिमी ऑस्ट्रेलिया मध्ये महाराष्ट्रीयन लोकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरज भागवणे हे या मंडळाचे मूळ उद्दिष्ट आहे.
- २००० ना नफा ना तोटा तत्वावर काही मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन या संस्थेची थापना केली आहे. हे मंडळ भागीदारी तत्वावर चालते.
- या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्ही आपली जाहिरात देखील करू शकता ज्या मुले तेथे राहणाऱ्या मराठी लोकांच्या व्यवसायास मदत होते.
- तसेच गणेश चतुर्थीसाठी असलेले यांचे एक खास ढोल ताशा पथक देखील आहे.
९. राजधानी मराठी मंडळ कॅनबेरा :
- ऑस्ट्रेलिया ची राजधानी असलेल्या कॅनबेरा मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठी लोक राहतात.
- मराठी संवर्धनासाठी त्यांनी या मंडळाची स्थापना केलेली आहे.
- अनेक मराठी कलाकारांना बोलावून त्यांच्या कलेचा आनंद घेणे, मराठी सण उत्सव सोबत साजरा करणे, मराठी मुलांना वाचता लिहितील यावी यासाठी प्रयत्न करणे हे यांचे हेतू आहेत.
१०. ऑस्ट्रेलिया मराठी विद्यालय :
- ऑस्ट्रेलिया मध्ये राहणाऱ्या मराठी मुलांना किमान मराठी लिहिता वाचता यावी, बोलता यावी त्याविषयीची गोडी लागावी म्हणून महाराष्ट्र मंडळाकडून ऑस्ट्रेलिया मराठी विद्यालय स्थापना करण्यात अली.
- ही शाळा इतर शाळांप्रमाणे नसून हे फक्त मातृभाषेवर लक्ष देणारी एक शाळा आहे. या शाळेच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड मध्ये अनेक शहरांमध्ये शाखा आहेत.
- मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून यांची लायब्ररी देखील आहे.
- मराठी संस्कृतीची आणि सणांची येथे माहिती सांगितली जाते. महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांकडूनच या शाळेचे वर्ग घेतले जातात.