Engagement Wishes in Marathi
साखरपुड्याची शुभेच्छा
Example 1
प्रिय गौरव,
तुझा आणि निशाचे लग्न ठरल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोघानापण खूप खूप शुभेच्छा. काल काकूंकडून तुझे लग्न ठरल्याबद्दल कळले कित्ती छान जोडी आहे तुमची…एकदम ‘एक दुजे के लिये’ सारखी. ऐकून खूप आनंद झाला, काकू सुद्धा खूप खुश वाटत होत्या. लग्न कधी आहे? आणि आमच्या वहिनींची आणि आमची भेट कधी घालून देणार आहेस??
लग्नाला आम्हाला बोलवा बरे का नवरोबा…अरे माझ्या लहानपणीच्या मित्राचे लग्न आहे आणि वारातीमध्ये बेभान नाचायचं पण आहे मला. पण या सर्वात महत्वाच्या क्षणी मी तुला काय भेटवस्तू देऊ ते मला सुचत नाहीये, तर आता तूच मला सांग कि तुला काय हवे आहे? म्हणजे ते मी येताना घेऊन येईल.
लवकरच मी गावी येतोय तेव्हा भेटू.
परत एकदा तुमच्या दोघांना शुभेच्छा.
तुझा प्रिय मित्र,
राहुल.
Example 2
प्रिय ताई,
काल तुझा साखरपुडा झाला, तू आणि भाऊजी खूप छान दिसत होतात. कालचा कार्यक्रम अगदी मस्त झाला. किती छान जोडी आहे तुमची. तुझे लग्न ठरले मला खूप आनंद झाला, आता त्रास द्यायला आम्हाला आणखी एक जण मिळणार. आमची तर सगळी प्लॅनिंगपण झाली आहे कि लग्नात आम्ही काय काय धम्माल करणार आहोत, भाऊजींचे बूट चोरणार आहोत! सगळी मज्जा मस्ती!
तुझ्या साखरपुड्याच्या निम्मिताने संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते, कित्ती दिवसांनी अशी धम्माल केली आम्ही भावंडानी. लगाच्या वेळेस मला सुट्ट्याचं आहे, तेव्हा मी महिनाभर तिथेच असणार आहे.
पण, लग्न झाल्यावर तू आम्हाला सोडून भाऊजींच्या घरी जाणार ना? तेव्हा मला तुझी खूप आठवण येईल ताई. घरात तर आम्हाला किती सुने सुने वाटेल. सतत तू असल्याचा भास. आणि ताई तू तिकडे गेल्यावर आमची काळजी करू नकोस हान. मी आता मोठा झालो आहे, आईबाबांची काळजी आता मी घेईल. त्यांना काय हवे नको ते सगळं अगदी तुझ्यासारखा बघेल.
पण तू आम्हाला अधून मधून भेटायला येशील ना ??
तुझा प्रिय,
पीयूष.
Example 3
प्रिय निशा,
सर्वात आधी तर लग्न ठरल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. आज मी खूप खुश आहे माझ्या भाचीचे लग्न ठरले आहे आणि आता मीपण सासूबाई होणार आहे. मस्त एकदम, मजेचा भाग वेगळा पण गौरव खरोखरच एक चांगला मुलगा आहे. तो माझ्या मैत्रिणीचाच मुलगा असल्यामुळे लहानपणापासून मी त्याला बघत अली आहे. तो तुला खूप सुखी ठेवेल. तुझी सगळी काळजी घेईल. तुझे आईबाबा पण खूप खुश आहेत. त्यांना तर कित्ती चांगले वाटत आहे म्हणून सांगू, नशीब काढलास पोरी तू, एवढा छान सासर, नवरा चांगला, एकुलता एक, सासू सासरेपण हौशी. एका आईबाबाना यापेक्षा अधिक काय हवे असते. आता तुला फक्त ही सगळं नीट सांभाळायचा आहे, आणि ते तू उत्तमरीत्या करशील अशी मला खात्री आहे.
तुमच्या आयुष्याची ही नवीन सुरवात होत आहे, एकमेकांना भेटा समजून घ्या आणि सुखाचा संसार करा.
आमच्या सदिच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
तुझी मावशी,
शैला.
Example 4
प्रिय गौरव,
तुझ्या लग्नाचे कळल्यापासून मला कित्ती आनंद झाला आहे काय सांगू. काल दादाने तझे लग्न ठरल्याचे सांगितल्यापासून आमच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. तुझ्या काकूने तर तयारीपण सुरु केली आहे. तुला आणि निशाला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. आता तुझ्यावर जवाबदारी वाढणार आहे त्यामुळे तर शहाण्या मुलासारखा जवाबदार मुलासारखा वाग. हो हो मला माहित आहे कि तू हुशार आणि जवाबदार आहेस पण अजून हो असे माझे म्हणणे आहे.
बाकी लग्नाची खरेदी करायला मात्र तू मुंबईला ये आपण सगळी खरेदी इकडेच करू तसेपण पुण्याहून तुला जवळ पडेल. मग आपण आईबाबांना सुद्धा बोलावू. सगळे मिळून आपण खरेदी करू आणि धम्माल करू. घरातलं आता तुझा शेवटचा कार्य आहे ना!
आम्ही लवकरच तिकडे येणार आहोत तेव्हा निशाचीपण भेट होईल अशी अशा करतो. पुनश्च एकदा दोघांचेपण अभिनंदन, आमचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहेत.
तुझा काका
मनोज