- Chala Hawa Yeu Dya – Guest Star
- Shala (2012)
- Aarohi (2012)
- Kaksparsh (2012)
- Taani (2013)
- Timepass (2014)
- Timepass 2 (2015)
- Phuntroo (2015)
केतकी माटेगावकर ….मराठी सिने सृष्टीच्या नभावर नुक्तीच अवतरलेली तारका.
सुंदर लोभस चेहऱ्याची, गोड गळ्याची इनोसंट लुक असणारी हि तारका आज मराठी सिनेसृष्टीतील भावी सुपर स्टार म्हणून पाहिली जात आहे.
केतकी माटेगावकर हिचा जन्म २२ फेबृवारी १९९४ साली झाला. नागपुरात जन्मलेली केतकी ला संगीटाचा आणि
गोड गळ्याचा वारसा तिच्या आई कडून…सुवर्णा माटेगावकर कडून मिळाला आहे. सुवर्ण माटेगावकर स्वतः उत्तम गातात व केतकीला तिच्या बालवयातच संगीताची आवड वाटू लागली ते तिच्या आईमुळेच. आई हाच प्रथम गुरु असतो हे केतकीच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले. लहानपणापासूनच आई सुवर्णा व वडील पराग माटेगावकर यांनी केतकी वर संगीताचे संस्कार घडवले.
प्रसिद्धीच्या झोतात :
सुरुवातीला छोटी केतकी अनेक कार्यक्रमातून आई सुवर्णा माटेगावकर बरोबर लहान मुलांची गाणी गात असे. पुढे तिने झी मराठीच्या सा रे ग म प लिटील चॅम्प्स या संगीताच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात भाग घेतला आणि ती जगातील मराठी प्रेक्षांसमोर आली आणि छोट्या पडद्यावरून घरा घरात पोचली. दुर्दैवाने ती या स्पर्धेतून काही कारणाने अंतिम फेरीपर्यंत न पोचता लवकरच बाहेर पडली. तिचे अनेक चाहते त्या वेळेस हळहळले होते. तिने जर अंतिम फेरी गाठली असती तर ही स्पर्धा तिनेच जिंकली असती असे त्याही वेळेस प्रेक्षकांना वाटत होते.
मराठी चित्रपटातील कारकीर्द :
केतकीने २०१२ मध्ये शाळा या मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका केली. मिलिंद बोकिलांची अतिशय गाजलेली ही कादंबरी असल्याने त्यावरील हा चित्रपट ही तुफान गाजला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यात त्या पौगंडावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल हा या चित्रपटाचा विषय. वयात एणारी मुलं आणि त्यांच्या मनात उमलणार्या नाजूक भावना अतिशय हळुवार पणे या चित्रपटात चित्रित झाल्या आहेत .
या पाठोपाठ केतकी आरोही…गोष्ट तिघांची या चित्रपटात मृणाल कुलकर्णी व किरण करमरकर या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. हा एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट होता. यात केतकीने एका बाल गायिकेची भूमिका केली होती. एका कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगात त्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.
त्यानंतरचा तानी हा चित्रपट सर्वस्वी केताकीचाच चित्रपट होता. एका निम्न वर्गातील हुशार मुलगी विपरीत परिस्थितीत ही आपले शिक्षण पूर्ण करते व कलेक्टर च्या पदावर पोहोचते, या कथानकात केतकीच्या भूमिकेला शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीची अशी अनेक रूप दाखवायची संधी मिळाली व तिने तिचे सोने केले.
यानंतरचा महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्ष या चित्रपटात केतकीने नायिकेच्या …प्रिया बापट हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटाचा काळ साधारणपणे विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा आहे त्यामुळे त्य्काल्ची वेशभूषा आणि त्याकाळचे एकूण राहणीमान दर्शवणारया या चित्रपटात इतर कलाकारांसोबत केतकी नऊ वार साडीत फारच सुंदर दिसली आहे. अभिनयाच्या दृष्टीने ही हा चित्रपट केताकीसाठी फारच महत्वपूर्ण ठरला आहे.
२०१४ मध्ये आलेला टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे प्रथमेश परब हा नवोदित कलाकार. किशोरवयातील प्रेम कथा हे कथानक असलेला हा चित्रपट प्रेमात पडलेल्या किशोरवयातील मुला मुलीं विषयी सांगतो. अल्लड प्रेमाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला.
नाटक :
मीना नेरुरकर लिखित अवघा रंग एकचि झाला या नाटकात केतकीने मध्यवर्ती भूमिका केली आहे. संगीत प्रधान या नाटकात प्रसाद सावकार सारख्या उत्तम गायकांबरोबर केतकीने अभिनय केला. शास्त्रीय संगीतावर आधारित अशी काही गाणी ही केतकीने या नाटकात सादर केली आहेत. ज्यांनी हे नाटक बघितले असेल ते सर्वच केतकीच्या अभिनयाची प्रशंसा करतील.
पार्श्व गायन :
केतकीने अनेक चित्रपटात पार्श्व गायन हि केले आहे. तिच्या स्वतःच्या सर्व चित्रपटातील स्वतः ची गीते तिनेच गायली आहेत. या शिवाय काही हिंदी व काही मराठी चित्रपटात हि तिने आपला स्वर दिला आहे. अशी ही गुणी मुलगी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो हीच शुभेच्छा.
Her height is around 5 feet 1 inch.
HIII,
KETKI I LIKE YOU SO MUICH,
I AM A BIGGEST FAN,
I LOVE YOU
Hii ketk
Nice acctar and nice singer
Ketu Happy birthday I am your biggest fan u
Ketu fakt tu
Hi Ketaki my Self Aniket Zadgavkar
Leave In Ratnagiri Maharashtra
I like you_____ You Are So Cute And Lovely………
Hi, ketu I’m Yogesh Maske, Tu mala khup khup avadte really I miss you so much
Good luck…………
All The best
Ketaki
There is only one girl…of Marathi industry…She will able to make history.
That girl is you!
love you ketu
Ketki Madam salute to your personality and your great family I highly respect and like you All the best ahead with love from Sudeep. D. Phadnis
Best of luck……!
Ketki Madam salute to your personality and your great family I highly respect and like you All the best ahead with love from Sudeep. D. Phadnis I had viewed all your popular films very inspiring personality
I am also your biggest fan…Ketki mam, I hope in future I can meet each other and I can listen my fav
Song with you…
Love you mam
Hi Ketaki. I like you