Parli:
At Nathra, Post Kauthali Tq. Parli, Dist. Beed
Pune :
४०२, 4th Floor, Aryaman Group,
City Tower, Dhole Patil Road
Pune – 411001
Birthday / Childhood and Education जन्म आणि शिक्षण
पंकजा पालवे-मुंडे दिवंगत केंद्रीयमंत्री गपीनाथराव मुंडे यांची मोठी मुलगी, पंकजाचा जन्म
२६ जुलै १९७९ रोजी परळीला झाला. त्यांनी आपलं प्रार्थमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्रातचं घेतलं. पंकजा मुंडे यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली. त्यानंतर न्यूजर्सी सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीमधून
एमबीए केलं.
पंकजा मुंडे यांचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला होता. प्रमोद महाजन भाजपचे केंद्रातले अत्यंत प्रभावशली नेते, पंकजा मुंडेंचे मामा होते. तर त्यांचे वडील गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून पंकजाला राजकीय वारसा मिळाला. घरात लहानपणापासून राजकीय वातावरण असल्यामुळे पंकजाचा ओढा राजकारणाकडे असणं अत्यंत स्वाभाविक होते.
Political Journey सुरवात राजकीय प्रवासाची
पंकजा सुरवातीला थेट राजकारणात आल्या नाही. त्या सामाजिक कार्यातून, आपल्या वडलांसाठी काम करत होत्या. गोपीनाथराव मुंडे यांच्या मतदारसंघाच काम त्या बघायला लागल्या लागल्या. प्रमोद महाजन यांच्या अकस्मात मृत्यूनंतर गोपीनाथराव राज्याच्या राजकारणात काहीसे एकाकी पडले होते. अशावेळी पंकजा आपल्या वडलांच्या पाठिशी भक्कमपणे उभ्या ठाकल्या. गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या शिक्षणाबाबत आणि विद्यापिठाच्या पदवीवरुन जेंव्हा वाद निर्माण झाला तेंव्हा पंकजाने तो प्रश्न योग्यपणे हाताळला. तर निवडणूक आयोगानं जेव्हा गोपीनाथराव मुंडेंना नियम मो़डल्याबाबत विचारणा केली तेंव्हाही पंकजा मुंडेंनी तो प्रश्न तळीला लावला. आपल्या वडलांच्या सोबतीनं त्यांची राजकीय जडण-घडण होतहोती.
पण पंकजा मुंडेंचा राजकारणात थेट प्रवेश झाला तो २००९ मध्ये, २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावळी परळी हा नवा मतदारसंघ तयार झाला. आणि गोपीनाथ मुंडेंनी पंकजाला निवडणुकीच्या रिंगणाक उतरवलं. पण ही निवडणूक दोघांसाठीही सोपी नव्हती. पंकजा मुंडेंचे सख्खे चुलतभाऊ धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर पंकजाच्या विरोधात उभे होते. पण पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय हुशारीची पहिली झलक दखली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांच्या घरी जेवणे, चहा घेणे यातून आपण तुमच्यातले एक आहोत अशी प्रतिमा त्यांनी तयार केली. आणि परळी विधानसभा मतदारसंघातून निवडूण येणाऱ्या त्या पहिला नेत्या ठरल्या.
त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या वडलांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. २०१४ मध्ये मोदी लाट असतांना, गोपीनाथ मुंडेंनी आपली ताकद दाखवून देऊन मोठा विजय मिळवला. त्यानंतर त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली. पण हा आनंद अल्पजीवी ठरला. लवकरच एका कार अपघातात गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला. आणि पंकजा मुंडे-पालवे राजकारणात एकाकी पडल्या. पण त्यांनी हिम्मत हरली नाही.
Assembly Parly Constituency Elections 2014 / Cabinet Minister
त्यांच्या वडलांनी १९९४-९५ मध्ये ‘संघर्ष यात्रा’ काढली होती. त्याच धर्तीवर त्यांनी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जी संघर्ष यात्रा निघणार होती. ती फक्त मराठवाड्यापुरती मर्यादीत करण्यात आली. पण या सर्वांवर मात करत २९ ऑगस्ट २०१४ रोजी जिजामातांचं जन्मस्थान सिंदखेडराजा पासून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. २१ जिल्ह्यांमधून ३ हजार किलोमीटरचा प्रवास या संघर्ष यात्रेनं केला. आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी राज्याच्या राकजकारणात आपला दबदबा निर्माण केला. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की पंकजा मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्या. त्यांच्याही नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा झाली. त्यांना ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण खातं देण्यात आलं. पण वयाच्या तिशीत असणाऱ्या पंकजा मुंडेंसाठी ही मोठी संधी होती. त्यांच्या शपथविधीच्यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या जल्लोषावरुन त्यांच्या लोकप्रियतेची सर्वांना पुन्हा एकदा प्रचिती आली. आपल्या वडलांच्या मृत्यूनंतर त्यांनी यशस्वीपणे आपल्या कुटुंबाची आणि राजकारणाची धुरा सांभाळली.
Mission and Work / ध्येय आणि कार्य
महिला सक्षमिकरण हे पंकजा मुंडे यांच्या पुढचं मोठं ध्येय आणि आव्हान आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकरित्या स्वावलंबी बनवण्याचं काम त्या करतायत. तसंच स्त्रीभ्रूण हत्येविरोधातही त्या काम करतायत. त्यांच्याकडे आता कॅबिनेट मंत्रिपद असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Family / कुटुंब
पंकजा मुंडे यांचा विवाह अमित पालवे यांच्याशी झाला. त्यांचा प्रेमविवाह होता. अमित पालवे हे डॉक्टर आणि उद्योगपती आहेत.पंकजा आणि अमित यांना एक मुलगा आहे आर्यमन. पंकजा मुंडे यांना दोन बहिणी आहेत.प्रितम मुंडे या डॉक्टर आहेत. तर यशश्री मुंडे या वकील आहेत. खासदार पुनम महाजन या त्यांच्या माम बहिण आहेत. पंकजा मुंडे यांनी आपल्या वडलांवर फोटोबायोग्राफीही काढली आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये ही फोटोग्राफी प्रकाशीत करण्यत आलीये. लोकनेता गोपीनाथ मुंडे असं या फोटोबायोग्राफीच नाव आहे.
सार
पंकजा मुंडेंच्या राजकीय प्रवासाची ही सुरवात आहे. त्यांच्या वडलांनी तयार केलेल्या पार्श्वभूमिचा त्यांना उपयोग झाला. तसंच गोपीनाथराव मुंडेंच्या मृत्यूमुळे पंकजा मुंडेंना एक भावनिक पाठिंबाही मिळाला. पण इथून पुढे त्यांना आपली राजकीय कारकिर्द घडवावी लागणार आहे. येणारा काळ हा पंकजा मुंडेंच्या कसोटीचा काळ असेलं.
Well qualified and great women and leady…
my fevrate women mrs. pankja tai
I am waiting for your response
When you are coming to meet me from Bangalore
Address
Indian institute of plantation management Bangalore near about AIT (ambetkar institute of technology)
Nagarbhavi malathali
Send me your contact number on mail